शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
2
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
3
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; महिलांनी केला छांगुर गँगचा पर्दाफाश
4
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
5
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
6
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
7
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
8
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?
10
लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!
11
'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...
12
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
13
मार्क झुकरबर्गविरोधात खटला सुरू; ८ अब्ज डॉलर्सचं आहे प्रकरण, काय आहे कारण?
14
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
15
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
16
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
17
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
18
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
19
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
20
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'

आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 07:14 IST

सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराबद्दल तुम्हाला काही आस्था असेल तर बिहारमधील व्होटबंदीचे वास्तव नेमके काय आहे, हे तुम्हाला समजून घ्यावेच लागेल! 

- योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान सदस्य, स्वराज इंडिया

देशाच्या लोकशाहीची आपल्याला  काही काळजी वाटत असेल तर बिहारमध्ये आरंभलेल्या,  मतदार यादीचे ‘सखोल पुनरीक्षण’ नावाच्या मोहिमेवर बारीक  नजर ठेवलीच पाहिजे. निवडणूक आयोगाच्या इशाऱ्यावर चाललेली फसवणूक समजून घेतलीच पाहिजे. सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराबद्दल काही आस्था असेल तर बिहारमधील व्होटबंदीच्या वास्तवाला भिडलेच पाहिजे.

कारण बिहार ही पहिली प्रयोगशाळा आहे. आपलीही पाळी लवकरच येणार आहे. मतदार यादीचे हे सखोल पुनरीक्षण आता देशभर केले जाणार आहे.  हा शब्द नुसता नावाला. प्रत्यक्षात कोऱ्या पाटीवर नव्याने मतदार यादी बनविण्याचीच ही प्रक्रिया आहे. गेल्या वीस वर्षांत भले तुम्ही डझनभर निवडणुकांत मतदान केलेले असले तरी तुम्ही भारताचे नागरिक आहात, मतदार यादीत नाव असण्याचा तुम्हाला अधिकार आहे हे तुम्हाला आता नव्याने सिद्ध करावे लागेल. तुमच्या नागरिकत्वाचा  निवाडा करण्यासाठी अनामिक सरकारी अधिकारी कोणती प्रक्रिया राबविणार याचा कुणालाच पत्ता नाही. 

या योजनेचे इंग्रजी नाव आहे Special Intensive Revision. निवडणूक आयोगाने सुनिश्चित केलेल्या या योजनेची प्रक्रिया  समजून घ्या, आणि मग  प्रत्यक्ष काय घडत आहे हेही पाहा. निवडणूक आयोगाने २४ जूनला दिलेल्या आदेशानुसार  बिहारच्या मतदार यादीत नावे असलेल्या ७.९ कोटी लोकांना, त्यांच्या त्यांच्या घरी जाऊन बीएलओने एका फॉर्मच्या दोन दोन प्रती द्यावयाच्या होत्या. फॉर्ममध्ये व्यक्तीचे नाव आणि चालू मतदार यादीत असलेला फोटोही छापलेला असणार होता. संबंधित व्यक्तीने हा फॉर्म पूर्ण भरून,  त्यावर नवा फोटो लावून,  सही करून  त्याबरोबर काही कागदपत्रेही जोडायची होती. २००३ च्या मतदार यादीत नाव असलेल्यांनी केवळ त्या यादीच्या संबंधित पानाची प्रत जोडावयाची.  २००३ च्या मतदार यादीत नावे नसलेल्यांनी आपली आणि आपल्या आईची किंवा वडिलांची  जन्मतारीख, जन्मस्थानाचा पुरावा देणारा दाखला  जोडायचा. २००४ नंतर जन्म झाला असल्यास आई-वडील दोघांच्याही जन्मतारखेचा आणि जन्मस्थानाचा दाखला देणे बंधनकारक होते. आवश्यक कागदपत्रे २५ जुलैपर्यंतच जोडायची होती आणि पुढे ऑगस्टमध्ये त्यांची फक्त तपासणी केली जाणार होती.  

आठवड्याभरातच प्रत्यक्ष वस्तुस्थितीची  जाणीव आयोगाला झाल्यावर नवनव्या सवलतींची मालिका सुरू झाली. आई-वडिलांची नावे २००३ च्या मतदार यादीत आहेत त्यांना केवळ स्वतःचीच कागदपत्रे द्यावी लागतील, आई-वडिलांचे दाखले नको अशी पहिली सूट मिळाली. नंतर सांगितले की, दाखले नसतील तरी फॉर्म जमा करता येतील. गंमत अशी की त्याच दिवशी निवडणूक आयोगाने सांगितले की, मूळ आदेशात नमूद प्रक्रियेत कोणताही बदल केलेला नाही. असेही सांगण्यात आले की, फॉर्मच्या दोनदोन प्रती देणे अशक्य असल्याने सध्या अधिकारी एकच प्रत देतील आणि कालांतराने दुसरी देण्यात येईल. एवढ्यानेही भागेना तेव्हा सांगितले की, आता फोटो लावणे आवश्यक नाही; परंतु शहरात तर हेही पुरे पडेना. मग म्युनिसिपल कर्मचाऱ्यांकरवी वेगळ्याच प्रकारचे फॉर्म पाठवले गेले. त्यात मतदाराचे नाव, फोटो काहीच नव्हते. विशेष म्हणजे एवढे सगळे बदल होत असले तरी निवडणूक आयोगाच्या मूळ आदेशात कोणतीही दुरुस्ती जाहीर केली गेली नाही.   

 काही धाडसी यू-ट्यूबर्स, पत्रकारांनी वास्तव समोर आणले. निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर बीएलओंनी घरबसल्या आपल्या रजिस्टरवरून  लोकांचे फॉर्म भरायला सुरुवात केली. निवडणूक आयोगाला दररोज संध्याकाळी  माध्यमांना निवेदन देण्यासाठी भरलेल्या फॉर्म्सची केवळ संख्या हवी होती.  यंत्रणा फायली भरण्याच्या कामाला लागली. बहुतांश लोकांना फॉर्म मिळालाच नव्हता, तरीही त्यांचा फॉर्म भरला गेलाच. आकड्यांत भर पडलीच. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार पूर्ण भरून प्राप्त झालेल्या  बहुतेक फॉर्म्सबरोबर कोणतीही कागदपत्रे, फोटो, विचारलेले तपशील यातले काहीच नाही. कदाचित सह्याही खोट्याच असाव्यात. दुसरीकडे भांबावलेल्या गोरगरिबांची  नुसती धावपळ. कागदपत्रांसाठी रांगा. दाखल्यांसाठी पैसे.  निवडणूक आयोगाने मागितलेल्या कागदपत्रांपैकी एकही कागद बिहारमधील ४० टक्के लोकांकडे उपलब्धच नाही. 

आता काय घडेल? निवडणूक आयोग २५ जुलैपर्यंत  ९५ टक्क्यांहून अधिक फॉर्म्स आपल्याला मिळाल्याचे ढोल वाजवेल. १०० टक्के ही म्हणतील! पण मग नंतर पुन्हा ते कागदपत्रे मागतील काय? ज्यांनी कागदपत्रे जोडली नाहीत त्यांची नावे मतदार यादीतून वगळणार काय? की सर्वोच्च न्यायालय आयोगाला आपले तुघलकी फर्मान बदलायला भाग पाडेल? निर्णय आता सर्वोच्च न्यायालयानेच घ्यायचा आहे. ..आता ही तलवार अख्ख्या देशाच्या मानेवर लटकतच राहणार. आयोगाचा हा माथेफिरू आदेश पुरता रद्दबातल करून घेतला तरच ‘सार्वत्रिक प्रौढ मताधिकार’ या  देशात अबाधित राहील. yyopinion@gmail.com

टॅग्स :BiharबिहारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग