शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

आता अय्यर-खुर्शीद यांच्या प्रतिसादाची अपेक्षा

By admin | Updated: November 24, 2015 23:37 IST

पॅरीसमधील दहशतवादी हल्ल्यामुळे अमानुष हिंसाचाराची राक्षसी प्रवृत्ती पुन्हा एकदा उघड झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी जगातील मुस्लिमांनी

बलबीर पुंज, (माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजपा)पॅरीसमधील दहशतवादी हल्ल्यामुळे अमानुष हिंसाचाराची राक्षसी प्रवृत्ती पुन्हा एकदा उघड झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी जगातील मुस्लिमांनी भारतीय मुस्लिमांचे अनुकरण करण्याविषयीे केलेले आवाहन लक्ष्यवेधी ठरावे. पॅरीस हल्ल्यानंतर बोलताना ओबामा यांनी मुस्लिम जगताला उद्देशून एक मोलाचा प्रश्न विचारला आणि तो म्हणजे अशा अमानुष प्रवृत्ती बळावतात कशा व दहशतवादाच्या मार्गावर जाण्यासाठी मुस्लीम तरुणाना कोणती विचारसरणी प्रवृत्त करते? अमेरिकी अध्यक्षांनी दहशतवाद आणि इस्लामच्या संबधावर पहिल्यांदाच जाहीर भाष्य करताना मुस्लीम समाजातील भीती व न्यायिक असुरक्षिततेची भावना या अमानुष हिंसाचारामागे असल्याच्या युक्तिवादाचे खंडण केले. कोणताही धर्म लहान मुले आणि निष्पाप लोकांची हत्त्या करण्याचे समर्थन करूच शकत नसल्याचे त्यांनी तुर्कीतील एका पत्रकार परिषदेत बोलताना ठामपणे सांगितले. धर्मनिरपेक्ष नेते कमाल अतातुर्क यांच्या मुस्लीमबहुल राष्ट्रात आज राजकीय फायद्यासाठी विघातक प्रवृत्तींना खतपाणी घातले जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. १४ वर्षांपूर्वी अनेक परदेशी नागरिकांसह तीन हजार अमेरिक न ९/११ च्या हल्ल्यात इस्लामिक जिहादचे बळी ठरले होते. मात्र दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला तो भारतातील २००८ मध्ये झालेल्या मुंबईवरील हल्ल्यानंतर. या हल्ल्याच्या दृष्टीकोनातूनच पॅरिसमध्ये काय घडले याकडे विश्लेषक बघत आहेत. पॅरिसमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक मुस्लीम नेत्यांनी केलेली विधाने आणि पॅरिसमधील हिंसाचार यांचा परस्परांशी काहीही संबध नसल्याचे ओबामा यांनी स्पष्ट केले असून काही मुस्लिम नेत्यांनी त्यांचा हिंसाचारावर विश्वास नसल्याचे म्हटले आहे. पण आम्ही धोका पत्करण्यास तयार नाही, असेही ओबामांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे ओबामा जगभरातील मुस्लिमांना भारतीय मुस्लीम समाज आणि राजकीय पक्षांची धर्म निरपेक्षता यांचे अनुकरण करण्याचे आवाहन करीत असताना काही राजकीय पक्ष व आझम खान यांच्यासारखे नेते मात्र दहशतवादाची सांगड मुस्लीम समाजाचे शोषण आणि असुरक्षिततेची भीती यांच्याशी घालून अप्रत्यक्षरीत्या दहशतवादाचे समर्थन करीत आहेत. त्याच वेळी मणीशंकर अय्यर आणि सलमान खुर्शीद यांच्यासारखे नेते दुसरेच टोक गाठताना दिसतात. मुस्लिमांवरील अत्त्याचाराचा निषेध करण्यासाठीच पॅरीसमध्ये हिंसाचार घडवण्यात आल्याचे अय्यर यांनी पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याचीच री ओढत काँग्रेस नेते व माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी भारत-पाकिस्तानचे संबध मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होत नाहीत तो पर्यंत सुधारणार नाहीत, असे विधान प्रसारमाध्यमांच्या पुढ्यात केले. या दोहोंनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांना शांतता दूत अशी पदवी बहाल केली तर मोदी भारताचे पंतप्रधान असेपर्यंत भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारु शकत नाहीत, असे ठाम प्रतिपादन अय्यर यांनी केले. आपले पंतप्रधानपद कायम राखण्यासाठी सध्या भारत पाक संबधात वितुष्ट निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप होतो आहे. वास्तविक पाहता पाकिस्तान हेच जागतिक दहशतवादाचे मूळ केंद्र आहे. दहशतवाद्यांचे प्रशिक्षण व आर्थिक मदत करणारे केंद्र म्हणून उदयास आलेले पाकिस्तान गेल्या अनेक दशकांपासून भारताला लक्ष्य करीत आहे. अशा स्थितीत संपूर्ण जग दहशतवादाविरोधात लढा देण्यात व्यस्त असताना काँग्रेसचे नेते मात्र पाकिस्तानला प्राणवायूचा पुरवठा करीत आहेत. काश्मिरचे भारतात विलिनीकरण झाल्यापासूनच पाकिस्तानने भारतविरोधी वैमनस्याची भूमिका घेतली आहे. यातूनच पाकने आॅक्टोबर १९४७ मध्ये भारतावर आक्रमण केले. त्यावेळी पंतप्रधानपदी पंडित नेहरू होते. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना १९६५ मध्ये पाकिस्तान सोबत दुसरे युद्ध झाले. श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७१ मध्येही पाकिस्तानने खोडसाळपणा करुन भारतावर आक्रमण केले. परंतु तिन्ही वेळा पाकिस्तानला भारतासमोर नांगी टाकावी लागली. भारताचा समोरासमोर सामना करण्यात अपयश आल्याने पाकिस्तानने भारताविरोधात दहशतवादांच्या मदतीने पंजाब प्रांतामधून छुपे युद्ध आरंभले व त्यात इंदिरा गांधींना आपले प्राण गमवावे लागले. अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरु केलेल्या मैत्रीपूर्ण संबध स्थापण्याच्या प्रयत्नांनाही पाकिस्ताने कारगीलमध्ये घुसखोरी करुन उत्तर दिले. तर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात २००८ साली दहशतवाद्यांनी मुंबईवर सशस्त्र हल्ला केला. तेव्हा भारतीय पंतप्रधानांनी भारत पाक संबधावर घेतलेला निर्णय बिनमहत्वाचा आहे काय, यावर काँग्रेसच्या खुर्शीद आणि अय्यर यांच्या प्रतिसादाची प्रतिक्षा आहे. पॅरिसवरील हल्ल्याचा सूत्रधार अब्देलहमीद अबाऊद या बेल्जियम मुस्लिमाने एका वर्षापूर्वीच ‘वेळो वेळी काफिरांचे रक्त पाहणे आनंददायी आहे’ असे एका चित्रफितीत म्हटले होते. अशा क्रूर आणि दुष्टांचा पायबंद घालण्यासाठी वेळीच उपाययोजना केली नाही तर संपूर्ण समाजाला याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल.