शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Mount Everest : आता माउंट एव्हरेस्टला कोरोनाचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 06:16 IST

Mount Everest: ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि शारीरिक थकव्यामुळे अनेक गिर्यारोहकांना आपले प्राण गमवावे लागले. 

माउंट एव्हरेस्ट हे जगातलं एक अद‌्भुत आश्चर्य. निसर्गसौंदर्याचा अप्रतिम नजराणा. जगभरातल्या गिर्यारोहकांसाठी माउंट एव्हरेस्ट हे कायम आत्यंतिक आकर्षणाचं ठिकाण ठरलं आहे. त्यामुळे जगभरातून पर्यटक आणि गिर्यारोहकांची रीघ माउंट एव्हरेस्टकडे लागलेली असते. पण जगातलं हे सर्वात मोठं आश्चर्य सध्या अनेक कारणांनी धोक्यात आहे. गिर्यारोहकांनी फेकलेल्या कचऱ्यामुळे एव्हरेस्टवर हजारो टन कचरा साचला आहे. त्याच्याशी नेपाळ सरकार झुंजतं आहे. गेल्या वर्षी तर इतक्या गिर्यारोहकांना नेपाळ सरकारनं परवानगी दिली होती की, शिखरावर अक्षरश: चेंगराचेंगरी झाली. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि शारीरिक थकव्यामुळे अनेक गिर्यारोहकांना आपले प्राण गमवावे लागले. यंदा माउंट एव्हरेस्ट नव्याच संकटात सापडला आहे. माउंट एव्हरेस्ट कोरोनाच्या विळख्यात अडकतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. अर्थात, त्याला कारण आहे नेपाळ सरकार. कोरोनामुळे नेपाळ सरकारने माउंट एव्हरेस्टवरील चढाई सर्वांसाठी बंद ठेवली होती, पण हाच माउंट एव्हरेस्ट नेपाळला पर्यटनाच्या माध्यमातून सर्वाधिक पैसाही मिळवून देतो. कोरोनामुळे आधीच नेपाळची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. त्यात लॉकडाऊन आणि माउंट एव्हरेस्टवरील चढाईच बंद केल्यामुळे मोठीच पंचाईत होऊन बसली. कुठल्याही मार्गाने का होईना, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, यासाठी नेपाळ सरकार अक्षरश: कासावीस झालं आहे. त्यामुळेच माउंट एव्हरेस्टपासून मिळणारा पैसा सुखासुखी सोडण्यास नेपाळ सरकार तयार नाही. गेल्या वर्षी कोरोनामुळे बंद करण्यात आलेला माउंट एव्हरेस्ट यंदा नेपाळ सरकारनं नुकताच खुला केला आहे. मार्च ते मे हा तीन महिन्यांचा काळ माउंट एव्हरेस्टचा मुख्य सिझन असतो. जगातल्या या सर्वोच्च शिखरावर चढाई करणंही या तीन महिन्यांतल्या काळात तुलनेनं बऱ्यापैकी सोपं असतं. इतर वेळी गारठा आणि वादळी वारे, यामुळे मृत्यूची दाट छाया असते.  मुळातच सिझनचा सुरुवातीचा काळ वाया गेल्याने, आता राहिलेल्या काळातून तरी ‘पैसा वसूल करावा’ या निर्णयाप्रत नेपाळ सरकार आलं आहे. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत तीनशे गिर्यारोहकांना माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी परवानगी दिली आहे. येत्या काळात त्यात आणखी वाढ होईल. अर्थातच, एव्हरेस्टवर कोरोनाला अटकाव करण्यासाठी नेपाळ सरकारनं काही नियम केले आहेत. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला कोरोना निगेटिव्ह टेस्ट आणि त्या संदर्भाचं प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. मास्क गरजेचा आहे. सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य आहे. माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर मेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. यदाकदाचित कोणाला कोरोनाचा संसर्ग झालाच, तर त्यावर ही मेडिकल टीम देखरेख ठेवेल. कोरोना झालेल्या व्यक्तींना पुन्हा सुरक्षितपणे खाली आणण्याची सोयही नेपाळ सरकारने केली आहे. लोकांना एव्हरेस्टवर घेऊन जाणाऱ्या संस्थांसाठीचे नियमही कडक करण्यात आले आहेत, पण तरीही एवढी खबरदारी पुरेशी नाही. जगातल्या या नितांत सुंदर ठिकाणाला कोरोनापासून वाचविण्यासाठी तो बंदच ठेवला पाहिजे, असं मत अनेक जाणकारांनी व्यक्त केलं आहे. नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर असलं, तरीही २६,२०० फुटांपेक्षाही जास्त उंची असलेली आणखी सहा शिखरं नेपाळमध्ये आहेत. पैशांसाठी ही सारी शिखरं नेपाळनं आता खुली केली आहेत. माउंट एव्हरेस्टला ‘डेथ माउंटन’ म्हणून ओळखलं जातं. कोरोनाचा शिरकाव तिथे झाला, तर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आणखीच वाढेल.  नेपाळनं काेरोनाच्या काळात बरंच काही गमावलं आहे. नेपाळची नुसती अर्थव्यवस्थाच नाही, तर लाखो लोकांना जगण्याचा उदरनिर्वाहही माउंट एव्हरेस्ट त्यांना मिळवून देतो. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या सिझनवरच अनेकांचा संपूर्ण वर्षभराचा उदरनिर्वाह चालतो. नेपाळ सरकारच्या आकडेवारीनुसार तीन कोटी लोकांपैकी १५ लाख लोकांचा रोजगार कोरोनानं हिरावून घेतला. माउंट एव्हरेस्टवर येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या आधाराने चालणारे इथले अनेक लहान-मोठे उद्योगही बंद पडले आणि त्यांचं मोठं नुकसान झालं. कामगार देशोधडीला लागले.  त्यामुळे मोठा धोका पत्करून नेपाळ सरकारनं माउंट एव्हरेस्ट पर्यटकांसाठी पुन्हा खुला केला आहे, पण आधीच जीवघेणा असलेला माउंट एव्हरेस्ट आता कोरोनामुळे अधिक जीवघेणा झाला आहे.

शेरपांवर आली बटाटे विकायची वेळ!एव्हरेस्ट चढाईसाठी आलेल्या पट्टीच्या गिर्यारोहकांपैकी अनेकांचं म्हणणं आहे, घरात बसून आम्हाला डिप्रेशन आलं आहे. पुन्हा जर एव्हरेस्ट, गिर्यारोहणाकडे वळलो नाही, तर त्या नैराश्यानेच आम्हाला मृत्यू येईल. दुसरीकडे कोरोनामुळे माउंट एव्हरेस्ट परिसरातील अनेक शेरपा आणि कामगारांना आपापल्या गावी परतावं लागलं आहे. शेती करून आणि भाजीपाला, बटाटे विकून हे लोक कशीबशी गुजराण करत आहेत.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश