शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आता पद्म पुरस्कारांनाही ‘आधार’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:24 IST

- हरीश गुप्ता(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर)‘आधार’ कार्डचा वापर करणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतके आवडले आहे की दररोज नव्या गोष्टी आधारशी जोडण्यात येत आहेत. पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष केबिनेट सचिव पी.के. सिन्हा यांनी पद्म पुरस्कारासाठीची सर्व नामनिर्देशने ‘आधार’ कार्डशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत. गृहमंत्रालयाने पद्म शिफारशींसाठी नवीन पोर्टल तयार केले असून ...

- हरीश गुप्ता(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर)‘आधार’ कार्डचा वापर करणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतके आवडले आहे की दररोज नव्या गोष्टी आधारशी जोडण्यात येत आहेत. पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष केबिनेट सचिव पी.के. सिन्हा यांनी पद्म पुरस्कारासाठीची सर्व नामनिर्देशने ‘आधार’ कार्डशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत. गृहमंत्रालयाने पद्म शिफारशींसाठी नवीन पोर्टल तयार केले असून पद्म पुरस्काराच्या सर्व शिफारशी ‘आॅनलाईन’नेच पाठविण्यास सांगितले आहे. ही शिफारस करणाºया व्यक्तीकडे आधार कार्ड असणे अनिवार्य करण्यात आले आहे. शिफारस करणाºयाने सर्वप्रथम ओ.टी.पी. क्रमांक मिळवायचा आहे. हा ओ.टी.पी. क्रमांक यंत्रणेत टाकल्यावरच त्या व्यक्तीला कुणाच्या नावाची शिफारस करणे शक्य होणार आहे. कॅबिनेट मंत्री, राज्यपाल आणि महत्त्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तींनी नेहमीच्या पद्धतीने शिफारशी पाठवू नयेत, असे त्यांना कळविण्यात आले आहे. केंद्रशासित प्रदेशाच्या राज्यपालांनी आपल्या शिफारशी राज्य सरकारच्या मार्फत पाठवाव्यात असे त्यांना कळविण्यात आले आहे. निर्वाचित सरकारांनाच हा अधिकार आहे असे एकप्रकारे पुदुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांना सुचविण्यात आले आहे!रुडींचा राजीनामा कसा घेतला?मंत्रिमंडळात बदल करण्याचे ठरविल्यानंतर कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांचा राजीनामा कशा पद्धतीने घेण्यात आला, याविषयी गंमतीदार गोष्ट ‘भिंती’ने ऐकली आहे. ३ सप्टेंबरला हा बदल होण्यापूर्वी १ सप्टेंबर रोजी रुडी हे प्रवासात असताना त्यांना शहा यांनी बोलावून घेतले. सध्या शहा हे पक्षात दुसºया क्रमांकाचे नेते असून त्यांचाच आदेश पक्षात किंवा शासनातही चालतो. पक्षाचे सरचिटणीस रामलाल यांचेजवळ अमित शहा बसले असतानाच रुडींना खोलीत बोलावण्यात आले. कोणत्याही प्रकारची शाब्दिक कसरत न करता शहा यांनी रुडींना सरळ सांगितले. ‘‘तुमचा राजीनामा पंतप्रधानांना हवाय.’’ हे संकट ओढवणार आहे याची कल्पना रुडींना होती तरीही धीर एकवटून त्यांनी विचारले, ‘‘मी केव्हा राजीनामा द्यायचा आहे?’’ त्यावर क्षणाचीही उसंत न घेता शहा म्हणाले, ‘लगेच!’ त्यावर भुवया उंचावीत रुडींनी प्रश्न केला, ‘‘माझा राजीनामा मी तुमच्याजवळ देऊ की पंतप्रधानांना?’’ त्यावर शहा यांनी रुडींना आणखी एक धक्का दिला. ‘‘तुमचे राजीनामापत्र तुम्ही रामलालजींकडे सोपवा’’, त्यावर स्वत:ला सावरत रुडी म्हणाले, ‘‘माझे राजीनामापत्र मी इथेच लिहू का?’’ त्यावर शहा म्हणाले, ‘‘नको, बाजूच्या खोलीत बसून तुम्ही राजीनामा लिहा. रामलाल तो घ्यायला येतील.’’ त्यानंतर बºयाच वेळानंतर रामलाल बाजूच्या खोलीत गेले आणि रुडींनी आपले राजीनामापत्र त्यांच्या स्वाधीन केले!निर्मला सीतारामन २६ व्या क्रमांकावरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्मला सीतारामन यांना बढती देत संरक्षणमंत्री केल्यामुळे सारे राष्टÑ चकित झाले. संरक्षणमंत्री या नात्याने त्या आता संरक्षणाच्या कॅबिनेट कमिटीच्या महत्त्वाच्या सदस्य बनल्या आहेत. पण केंद्रीय मंत्र्यांची आणि त्यांच्या खात्यांची जी यादी सरकारच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रदर्शित करण्यात आली आहे, त्या यादीत त्यांचा क्रमांक २६ वा असून २७ व्या क्रमांकावर मुख्तार अब्बास नकवी यांचे नाव आहे. बाकीचे सर्व कॅबिनेट मंत्री जसे स्मृती इराणी, पीयूष गोयल, धर्मेन्द्र प्रधान, मनेका गांधी यांची नावे वरच्या क्रमांकावर आहेत त्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण कुणी दाद दिली नाही. पण भाजपामधील सूत्रांकडून समजले की पक्षातील ज्येष्ठताक्रम महत्त्वाचा असतो. तो पाहता निर्मला सीतारामन या उशिरा भाजपामध्ये दाखल झाल्या आहेत. ‘‘पण मग मुख्तार अब्बास नकवी यांचा क्रमांक त्यांच्यानंतर कसा?’’ यावर मात्र कोणतेच उत्तर मिळाले नाही. नकवींना तेवढाच दिलासा!माजी सीबीआय संचालकांचे दिवस भरलेदोघे माजी सीबीआय संचालक रणजित सिन्हा आणि ए.पी. सिंग यांना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे असे दिसते. रणजित सिन्हा यांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालय स्वत: हाताळत आहे. तर अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्डरिंगच्या प्रकरणात ए.पी. सिंग यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले आहेत. त्यांचा साथीदार मांस निर्यातदार मोईन कुरेशी हा सध्या ईडीच्या कस्टडीत आहे. बंगलुरू येथील सी.बी.आय. केसमध्ये अडकलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी रु. १७५ कोटी कुरेशी यांना दिल्यावरून ए.पी. सिंग अडचणीत आले आहेत. कुरेशी आणि सिंग यांच्या दरम्यान मोबाईलवर झालेली संभाषणे पुरावा म्हणून दाखल केल्यानंतर हा घोटाळा उघड झाला. त्यामुळे त्या दोघांचेही दिवस भरले असल्याचे संकेत मिळाले आहेत. लोकसेवा आयोगातून सिंग यांना मुदतीपूर्वीच हाकलण्यात आले असून त्यांना केव्हाही अटक होऊ शकते.आता पुतण्यांचे दिवस आले!वारसा हक्काने सत्तेत असण्याच्या काळात अविवाहित नेत्यांना मात्र या आरोपापासून स्वत:चा बचाव करता येत होता. पण आता तेही शक्य दिसत नाही. बसपाच्या नेत्या मायावती या लवकरच आपल्या पुतण्याला आकाशला राजकारणात उतरविणार आहेत. त्यांचा भाऊ आनंद हा ई.डी.च्या आणि आयकर विभागाच्या प्रकरणात अडकल्यामुळे आकाशही राजकारणात येण्याचे टाळत होता. पण त्याने लंडनहून मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपला वारसा त्याच्याकडे सोपविण्याचा मायावती विचार करीत आहेत. त्याचप्रमाणे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हेही प्रेम पटनायक या आपल्या मोठ्या भावाच्या अरुण पटनायक या मुलाला राजकारणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी सुरुवातीला आपली बहीण गीता मेहता हिचा विचार केला होता पण तिने अमेरिकेत राहणे पसंत केले. नवीन पटनायक यांचे आता वय झाले असून ते आजारीही असतात. त्यांच्याप्रमाणे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा आपला पुतण्या अभिषेक बॅनर्जी याच्यावर अवलंबून आहेत. तो सध्या खासदार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारBJPभाजपाNew Delhiनवी दिल्ली