शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

धावायची वेळ आली आहे, आता रांगणे पुरेसे नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 06:47 IST

एक संपले की, दुसरेच अशी संकटांची मालिका सध्या सुरूच आहे. फक्त कोरोनाच नव्हे, तर उद्योग, शिक्षण, पर्यावरण, राजकारण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रांत आजारपण आले आहे.

गेल्या दोन वर्षांत आपण शिकलो, की काही प्रश्नांना उत्तरे नसतात! आहे ते, जैसे थे स्वीकारावे लागते. ही नवी शिकवणच आपल्याला तारून नेणार आहे.

एक संपले की, दुसरेच अशी संकटांची मालिका सध्या सुरूच आहे. फक्त कोरोनाच नव्हे, तर उद्योग, शिक्षण, पर्यावरण, राजकारण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रांत आजारपण आले आहे. इथे तक्रारीला अर्थ नाही. एकमेकांना दोष देण्यातही अर्थ नाही. प्रश्न  पुढे जाण्याचा, आहे त्या परिस्थतीत मार्ग शोधण्याचा आहे ! 

जग थांबलेले नाही. ते थांबणारही नाही. माणसाने बुद्धीच्या, आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर यापूर्वीदेखील अनेक संकटांवर मात केली आहे. पूर्वीच्या तुलनेत नवनवे तंत्रज्ञान आपल्या मदतीला आहे, ही केवढी जमेची बाजू! कल्पना करा, इंटरनेट कम्युनिकेशन, वाय फाय, स्मार्ट फोन नसते तर काय झाले असते? ऑनलाइन प्रक्रियेत पूर्णत्व नसेल. कमतरता असेल; पण तरीही या गेल्या दोन वर्षांत बरेचसे उद्योग, शिक्षण यंत्रणा, दळणवळण, संवाद हे सारे या यंत्रणेच्या बळावरच सुरू आहे. कसे तरी का होईना; पण शिक्षण सुरू राहिले. 

शिक्षणाच्या संकल्पना आता बदलाव्या लागतील. मूल्यमापनाच्या नव्या पद्धती शोधाव्या, स्वीकाराव्या लागतील. शिकविण्यापेक्षा, शिकणे शिकवावे लागेल. स्वयंअध्ययनासाठी विद्यार्थ्यांची मनोवृत्ती घडवावी लागेल. त्यासाठी शिक्षकाची भूमिकाच बदलावी लागेल. 

नीती अनीतीच्या संकल्पना, जीवनमूल्ये, विवाहसंस्था, कुटुंब पद्धती, सामाजिक, राजकीय व्यवस्था यात सातत्याने होणारे बदल स्वीकारावे लागतील. सध्या एकमेकांना दोष देणे, दुसऱ्याच्या चुका शोधणे, परस्परांचे पाय खेचणे, जाती धर्माच्या आधारावर द्वेष पसरविणे यातच आपली शक्ती खर्च होतेय.जगभरातली सत्ताधारी मंडळी जास्तच भरकटलेली दिसतात. अनिर्बंध, असामाजिक, अविचारी वर्तन खपवून घेतले जाणार नाही असे दंडक निर्माण करावे लागतील. हा बदल एकाएकी होणार नाही; पण तो मंद गतीनेही होता कामा नये. जागतिक स्पर्धेत टिकून राहायचे तर रांगून चालणार नाही. अक्षरशः धावावे लागेल. एकट्याने नव्हे, सर्वांनी मिळून. हातात हात घालून.

प्रत्येक क्षेत्रात नीती नियम आहेत. ते इतरांनी पाळावे, आम्ही पाळणार नाही, अशी मग्रुरी, बेशिस्त चालणार नाही. बेशिस्तीतूनच बेदीली निर्माण होते. अतिरेकी, समाजकंटक निर्माण होतात. शिस्त, शांतता ही सर्वांनी समान पद्धतीने समान पातळीवर अंगीकारायला हवी. 

गेल्या दोन वर्षांत आपण सारे नवीन गोष्ट शिकलो. ती ही की काही प्रश्नांना उत्तरे नसतात! आपल्याला आहे ते, जैसे थे स्वीकारावे लागते. ही नवी शिकवण आता आपण अंगीकारली पाहिजे. गेल्या दोन वर्षांच्या परिणाम स्वरूप अन् येत्या दशकातील तांत्रिक बदलामुळे आपल्याला मानसिक आरोग्याकडे, शारीरिक आरोग्यापेक्षाही जास्त लक्ष द्यावे लागेल. शिक्षणव्यवस्थेतील मरगळ, परिणामस्वरूप भविष्यातील करिअरविषयीची चिंता, सारखे घरात कोंडून राहिल्यामुळे आलेले नैराश्य, ज्याचे पोटपाणीच घराबाहेर निघण्यावर अवलंबून आहे अशा कामगार, कलाकार, अत्यावश्यक सेवार्थी यांची झालेली होरपळ याचा एकत्रित परिणाम आपल्या सर्वांच्या मानसिक आरोग्यावर होणार आहे. याचे उत्तर डॉक्टरजवळ नसणार. ‘ते तुझे आहे तुजपाशी’ या न्यायाने आपल्याजवळच आहे.

- डॉ. विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठvijaympande@yahoo.com

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या