शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

हेल्मेट ओझे नव्हे, आवश्यक स्वसंरक्षण!

By admin | Updated: February 11, 2016 03:54 IST

सध्या हेल्मेट सक्तीला होणारा विरोध वृत्तपत्रात येणाऱ्या लेखांवरून व वाचकांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होतो. परंतु हा विरोध संभाव्य अडचणींचा कल्पनाविलास आहे, असे म्हणावेसे वाटते.

- दिलीप श्रीधर भट(मुक्त लेखक)सध्या हेल्मेट सक्तीला होणारा विरोध वृत्तपत्रात येणाऱ्या लेखांवरून व वाचकांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होतो. परंतु हा विरोध संभाव्य अडचणींचा कल्पनाविलास आहे, असे म्हणावेसे वाटते. संपूर्ण जगात व भारतातील काही राज्यात हेल्मेट वापरणे अनिवार्य आहे. हेल्मेट वापरण्याची सक्ती सरकारला करावी लागते याचे कारण, हेल्मेटमुळे होणारे संरक्षण जनतेला माहीत असूनही ते वापरत नाहीत. महाराष्ट्रात दरवर्षी हेल्मेट न वापरल्याने (दुचाकी चालक) डोक्याला गंभीर दुखापत होऊन अंदाजे दीड ते दोन हजार जण मरत पावतात. हे प्रमाण हेल्मेट वापरले गेले नाही तर वाढतच जाणार आहे.दुचाकी गाड्या वेगवान, चालकाला सोयीच्या व सुटसुटीत असतात. त्यावर बसल्यावर चालकाला अधिक गतीने चालवण्याचा मोह होतो. जेव्हा अपघात घडतो तेव्हा चालक एकदम फेकला जातो. माणसाच्या शरीरात डोके जड असल्यामुळे ते जमिनीवरती वेगाने आदळते. डोके फुटून मेंदूला धोका पोहोचतो. मेंदूच्या रक्तवाहिन्या तुटतात. नाका-कानातून रक्तस्त्राव सुरू होतो व चालक तत्काळ मरण पावतो. चुकून वाचला तर त्याला विस्मरण होते, कमी ऐकू येते. स्वत:ला सरळ न उभे राहता येणे, कशाचा तरी आधार घेऊन चालणे व चालताना तोल जाणे इत्यादी व्याधी निर्माण होऊन जन्मभर कायम राहतात.सध्या उपलब्ध असलेले हेल्मेट विचारपूर्वक विकसित केलेले आहे. ते फायबर ग्लासचे असते. फायबर ग्लासमध्ये कोणताही आघात सहन करण्याची शक्ती (क्षमता) असते. हेल्मेटची रचना गोल असल्यामुळे आघात झाला असताना तो घसरतो. या फायबर ग्लासच्या कवचाच्या (आवरणाच्या) आत पोकळी असते. ही पोकळी टाळूच्या वर येते. त्यामुळे मेंदूला धक्का बसत नाही. उष्णता, थंडी यापासून बचाव व्हावा म्हणून थर्माकोल, स्पंज यांचा योग्य ठिकाणी वापर केला जातो. यावर उभे-आडवे नायलॉनचे पट्टे असतात. या सर्वांवर उत्तम कापडाचे अस्तर लावून बंद करण्यात येते. त्यामुळे चालक दुचाकीवरून अपघाताने फेकला गेल्यास त्याच्या डोक्याला आणि मेंदूला धक्का बसत नाही आणि बसल्यास त्याची तीव्रता अत्यंत कमी असते. विकसित हेल्मेटमुळे अपघात होऊनही दुचाकीचालक जिवंत राहतो.हेल्मेट वापरल्यास स्पॉँडिलायटिस होतो, हे म्हणणे अशास्त्रीय आहे, असे अनेक अस्थिरोगतज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे. स्पॉँडिलायटिस मानेच्या व पाठीच्या कण्याच्या चुकीच्या हालचाली व बैठकीमुळे होतो. विकेटकीपरचे हेल्मेट सर्वसाधारण हेल्मेटपेक्षा अधिक वजनदार असते. तो ते हेल्मेट मॅचच्या वेळेस चार-पाच तास वापरतो. तरीसुद्धा त्याला स्पॉँडिलायटिस होत नाही. हेल्मेट वापरताना येणाऱ्या अडचणी यादेखील अशास्त्रीय व अव्यवहार्य आहेत. हेल्मेट वापरल्यावर आॅफिस, दुकान किंवा इतर ठिकाणी ते कसे सांभाळून ठेवावे, या प्रश्नाला उत्तर म्हणजे, पावसाळ्यात रेनकोट, छत्री जसे काळजीपूर्वक सांभाळले जाते तसे सांभाळावे. दुचाकीला हेल्मेट लॉक करून ठेवण्याची व्यवस्था करून ठेवली जाते. तशी करून घेतल्यास हेल्मेट सांभाळावे लागणार नाही. हेल्मेटमुळे ऊन लागत नाही व थंडी वाजत नाही. कारण, त्याची रचना तशी केली जाते.हेल्मेट नसताना दुचाकी गाडी घसरल्यास डोक्याला दुखापत होते. वळणावरती गाडी घसरल्यास दुखापत गंभीर स्वरूपात होते. दुचाकीची गती २० कि.मी. प्रति तास असेल व गाडीवरून चालक पडला तर त्यास होणारी दुखापत एका मजल्यावरून पडल्यावर होणाऱ्या दुखापतीएवढी असते. ३० कि.मी. प्रतितासावर अपघात झाल्यास डोके फुटते. ४० कि.मी. प्रतितासावर मेंदूला मोठा आघात व मान मोडून मृत्यू येतो. हेल्मेट वापरल्यास हे घडत नाही. जर महिलानी, मुलींनी हेल्मेट वापरले तर त्यांना अतिरेक्याप्रमाणे चेहरा झाकून घ्यावा लागणार नाही.बंदिस्त हेल्मेटमुळे हवा कमी मिळून गुदमरल्यासारखे होते हे म्हणणे बरोबर नाही. उच्छवासामुळे फक्त हवा कमी मिळून गुदमरल्यासारखे होते, हेही बरोबर नाही. कारण, हेल्मेटमध्ये व्हेंटिलेशनची व्यवस्था असते. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या चालकांची संख्या स्वत:ला प्रगत (?) समजून घेणाऱ्या महाराष्ट्रात प्रचंड आहे. अशा चालकास दंड न करता पोलीस यंत्रणेने त्या चालकास हेल्मेटची अधिकृत पावती देऊन विकावे म्हणजे त्यावेळेपासून ती व्यक्ती हेल्मेट वापरणे सुरू करेल. ही पद्धत महाराष्ट्रात त्वरित सुरू होण्यासाठी योग्य ती पावले टाकणे आवश्यक आहे.आरटीओ व ट्रॅफिक पोलीस स्वत:च हेल्मेट वापरत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरणे सुरू केले तर त्याचा परिणाम जनतेवर होऊन प्रत्येक दुचाकीस्वार हेल्मेट वापरेल, असा संपूर्ण विश्वास आहे.दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याचे छापून येते. पोलीस तसा पंचनामाही करतात. अपघाताच्या बातमीत दुचाकीस्वाराचे डोके फुटून मेंदू बाहेर आला होता, ते हेल्मेट वापरत नव्हते असे छापून आल्यास लाखो वाचकांचे डोळे उघडून ते ताबडतोब हेल्मेट विकत घेतील, असा विश्वास आहे आणि पोलीस पंचनाम्यातदेखील तसा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक झाले पाहिजे. अपघात झाल्यास हेल्मेट घालणाऱ्या दुचाकी चालकास, तसेच त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीच्या हाताची, पायाची, बरगडीची हाडे आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार साधली जाऊ शकतात, पण हेल्मेटमुळे त्यांच्या डोक्यावर गंभीर इजा, दुखापत होत नाही हे महत्त्वाचे आहे.हेल्मेट बनवणाऱ्या कंपन्यांकडे लाखो हेल्मेट गोदामात पडूत आहेत. त्यांचा खप व्हावा, हेल्मेटचा स्टॉक संपावा म्हणून सर्व कंपन्या शासनाला पटवत आहेत, अशा अर्थाचा अपप्रचारही केला गेला कारण तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हेल्मेटचे महत्त्व व आवश्यकता जनतेस समजावी, पटावी म्हणून ‘रोड शो’ केला होता.दुचाकी वाहन चालकापाशी हेल्मेट नसल्यास त्यास मध्य प्रदेशात पेट्रोलपंपावर पेट्रोल देणे दिनांक १ फेब्रुवारी २०१६ पासून बंद झाले आहे.नागपूरला जुलै २००८ ला तत्कालीन पोलीस कमिशनर डॉ. सत्यपालसिंह (वर्तमान लोकसभा सदस्य) यांनी दुचाकी चालकांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य केले होते. काही महिन्यातच त्यांची पुण्यात बदली करण्यात आली. अशा पद्धतीचे प्रकार अनेकदा झाले आहेत. त्यामुळे हेल्मेट विरोधी राजकीय लॉबी आहे व ती सक्रीय आहे, हे उघड गुपित आहे. हेल्मेटची उपयुक्तता समजून न घेता, ती जाणून न घेता त्यास विरोध करणे, हा बौद्धिक आडमुठेपणा नाही का?