शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
2
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
3
बिहार फत्ते; आता 'या' दोना राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
4
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
5
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
6
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
7
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
8
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
9
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
10
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
11
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
12
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
13
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
14
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
15
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
16
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
17
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
18
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
19
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
20
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo olympics: पदक नाही, तरी सिमॉन जिंकली; ती कशी??

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 06:19 IST

Tokyo olympics Live Updates:यंदाचं ऑलिम्पिक विशेष तणावपूर्ण आहे. मेंदूतल्या संप्रेरकांचे झरे आटत असतानाच रिंगणात उतरण्याची वेळ आली! हा तणाव खेळाडूंना असह्य झाला.

- डॉ. राजेंद्र बर्वे(ख्यातनाम मानसरोग तज्ज्ञ) 

जीवन म्हणजे काय? - आपण आपल्या यशाचं आणि सुखा-समाधानाचं नियोजन करीत असताना, आपल्याच नकळत जे उलगडत असतं, त्याला जीवन ऐसे नाव! टोकियोकडे झेपावणारी अमेरिकन जिम्नॅस्ट सिमॉन बाइल्सच्या डोळ्यासमोर कदाचित ती चकाकणारी सुवर्णपदकं चमकत असतील. टाळ्यांचा आभासी कडकडाट, साथीदार खेळाडूंचे आणि प्रतिस्पर्ध्यांचे उत्फुल्ल चेहरे दिसत असतील. पण खचितच एखाद्या क्षणी तिचं कोवळं मन बावरलं असेल.यावर्षी ऑलिम्पिकच्या रिंगणात खेळाडू उतरत होते, तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके फक्त उत्सुकतेनं वाढलेले नव्हते, त्यांच्या मनात  चिंतेच्या काळ्या ढगांमधला गडगडाट होता. अशाच एका क्षणी सिमॉननं  ‘तो’ निर्णय घेतला आणि तिच्या मनातलं कभिन्न सावट हटलं असेल. ऑलिम्पिकमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करताना ती म्हणाली, ‘मी पदकं, अत्युच्च मानसन्मान, गौरवाची झगझगीत वलयं, या सर्वांपेक्षा माझ्या मनाच्या स्वास्थ्याला जपण्याचा निर्णय घेते आहे. मी या रिंगणातून निवृत्त होते आहे ’ - सगळं जग सध्या तिची चर्चा करतं आहे.सिमॉन ही केवळ प्रतिनिधी आहे. खेळ, क्रीडा स्पर्धा, त्यातले संघर्ष, अत्युत्तम कामगिरीची जीवघेणी धडपड या सर्वांचं जे विदारक दर्शन घडतं आहे, त्या जगातल्या ठसठसत्या वेदनेची प्रतिनिधी!

कोणे एकेकाळी, राज्या राज्यातल्या लढाया टाळण्यासाठी हे खेळ सुरू केले. खिलाडू वृत्ती, उत्कृष्टतेचा ध्यास आणि कठोर मेहनतीचे धडे गिरवण्यासाठी ही स्पर्धा घडवून आणली जाते. पण शेकडो वर्षांनी त्या उच्च मूल्यांचा गळा स्पर्धेनं, ईर्षेनं, अतीव महत्त्वाकांक्षेनं, जीवघेण्या राष्ट्रप्रेमानं घोटला. 

इतका तणाव का असतो? तणाव म्हणजे मोटिव्हेशनच्या (ध्येय गाठण्याची सहज प्रवृत्ती) पलीकडली मानसिक अवस्था. जितकी ध्येयासक्ती प्रखर तितकी  कामगिरी उत्तम असा आलेख वाढत जातो; पण तो गगनाला भिडत नाही. प्रत्येक ध्येयप्रेरणेबरोबर आपला मेंदू चेतना निर्माण करणारी संप्रेरकं  रक्तात सोडतो. स्नायू सळसळतात, नजर तीक्ष्ण होते, एकाग्रता सूक्ष्मतम बिंदूवर स्थिरावते, ही सारी या संप्रेरकांची किमया. (याच संप्रेरकांचा कृत्रिम वापर म्हणजे डोप टेस्ट) परंतु, या संप्रेरकांना मर्यादा आहे आणि असणारच. संप्रेरकांच्या अतीव स्त्रावामुळे शारीरिक थकवा, मनाचा संभ्रम आणि आत्मविश्वासाचा र्‍हास होतो. आपल्या नकळत आपण होरपळतो, यालाच   ‘बर्न आउट’ म्हणतात. तो क्षण अतिघातक. कारण यातूनच आत्मघातकी विचार सुरू होतात. मनाचं खच्चीकरण आणि आत्मनाशाची भावना बळावते.

सर्वसामान्य माणसांना विशेषकरून सातत्याने संघर्षमय जीवन जगणार्‍या, पदोपदी महत्त्वाचे आणि जबाबदारीचे निर्णय घेणार्‍या लोकांवर बर्न आउटची पाळी येऊ शकते. सीमेवर लढणार्‍या सैनिकांचा शक्तिनाश,  एअर ट्रॅफिक नियंत्रक (एटीसी), ड्यूटीला जुंपलेले पोलीस, सर्जन आणि विशेषकरून मानसोपचारक यांवर हा प्रसंग उद‌्भवतो. यंदाचं ऑलिम्पिक विशेष तणावपूर्ण आहे. वेळापत्रकातील अनिश्चितता, प्रेक्षकांचा अभाव आणि सर्वांच्या वाढलेल्या अपेक्षा यांचा अतीव ताण हे खेळाडू वर्षभर सहन करीत आहेत. मेंदूतल्या संप्रेरकांचे झरे आटत असतानाच रिंगणात उतरण्याची वेळ आली. उंटाच्या पाठीवरच्या ओझ्यात फक्त एका काडीची भर पडली आणि सिमॉनच्या बरोबरचे अनेक भारतीय खेळाडूही खेळण्यापूर्वीच मनातनं हरले, त्यांनी कदाचित त्या तणावापुढेच हात टेकले.  पण एक खरं, सिमॉनने खर्‍या अर्थानं सुवर्णपदकाच्या पलीकडचं यशाचं पदक मिळवलं आहे!  खेळापेक्षा जीवन मोठं, यशापेक्षा सुखशांती मोलाची मानली आहे!

आता सिमॉनच्या या विशेष निर्णयाचे अनेक अर्थ लावले जातील, त्याची चर्चा आणि चर्वितचर्वण होईल. क्रीडा क्षेत्राला हा सर्वसामान्य अनुभव होत आहे का? प्रसिद्ध क्षेत्राला मानसिक उदासीनतेचा ज्वर पसरतोय? ही वस्तुस्थिती त्या क्षेत्रातल्या काहींनी स्वीकारलेली दिसते आहे,  हे मोठं सुलक्षण म्हटलं पाहिजे. पुन्हा मज्जामानसशास्त्राकडे वळू. 

प्रत्येकाने आपला मोटिव्हेशन आणि कामगिरीचा आलेख तपासला पाहिजे. उत्तम मोटिव्हेशन आणि सर्वोच्च  आपलं धैर्य, चिकाटी, कुटुंबीयांनी दिलेलं निरपेक्ष सहृय प्रोत्साहन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर आपण मानसिकरीत्या स्थिर राहतो. उत्तेजित संप्रेरकांना नियंत्रित ठेवतो... मग  तो क्षण येतो जेव्हा या साऱ्याचा विरस पडतो आणि संप्रेरकांचं कारंजे थुईथुई नाचत येतं आणि आपल्या नकळत खेळाडू त्याच्या पूर्वीच्या कामगिरीपेक्षा अद्वितीय कामगिरी दाखवतो. यालाच ‘पीक परफॉर्मन्स’ म्हणतात.  ध्येय आणि प्रेरणेसोबत कामगिरीची गुणवत्ता वाढते, स्थिरावते. प्रेरणा टिकल्यास कामगिरी उत्तम होते, मात्र ती न टिकल्यास शरीरिक मनासिक बळ खालावते.

यशस्वीतेचा उच्चांक गाठण्याकरता एकाग्रता, धीर आणि चिकाटीचं शिखर गाठलं जातं. मोठं धीराचं काम आहे मनाचं स्वास्थ्य जपणं! यशस्वी माघार घेणारा माणूस पराभूत नव्हे तर धीट असतो. धोरणी असतो. स्वत:ला जपून ठेवतो. आत्मशक्तीचा आदर करतो. सिमॉनच्या या निर्णयाने आपल्याला धडा शिकायचा आहे. अखेर क्रीडा हा खेळ आहे. खेळाडू म्हणजे यशाचा प्रोग्रॅम केलेले रोबो नव्हेत. माणसंच आहेत. त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं लादायचं नसतं. अंतर्मुख होऊ आणि सिमाॅनला शुभेच्छा देऊ! (drrajendrabarve@gmail.com)

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021