शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
6
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
7
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
8
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
9
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
10
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
11
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
12
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
13
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
14
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
15
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
16
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
17
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
18
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
19
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
20
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 

पहिल्या निवडणुकीच्या ना ना कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:48 IST

मिलिंद कुलकर्णी पहिलटकरणीचे बाळंतपण कायमस्वरुपी स्मरणात राहणारे असते. पहिलटकरीण आणि माहेरची मंडळी या प्रसंगाचे साक्षीदार असतात. प्रेमाच्या आणि आपुलकीच्या ...

मिलिंद कुलकर्णीपहिलटकरणीचे बाळंतपण कायमस्वरुपी स्मरणात राहणारे असते. पहिलटकरीण आणि माहेरची मंडळी या प्रसंगाचे साक्षीदार असतात. प्रेमाच्या आणि आपुलकीच्या माहेरच्या माणसांमध्ये हा प्रसंग साजरा होत असल्याने वेदना सुसह्य होतात. माहेरची मंडळी घेत असलेली काळजी सुखवत असते. बहुदा असाच अनुभव निवडणुकीतील पहिल्यांदा लढणाऱ्या उमेदवाराला येत असावा. मित्रमंडळी, नातेवाईक निवडणूक लढविण्याचा आग्रह धरतात. निवडणुकीला आवश्यक असलेले सर्व गुण अंगी असल्याचे भासवितात. त्यामुळे स्वत: उमेदवारालाही काही दिवसांनी तसे वाटायला लागते. आजूबाजूची दोन-चार उदाहरणे सांगितली की, परिस्थिती अनुकूल वाटायला लागते. खिसा खुळुखुळू लागतो. मित्र सर्व प्रकारच्या सहाकार्याचे आश्वासन देतात. आणि उमेदवार शड्डू ठोकून तयार होतो. ग्रामीण भागात याला अगदी समर्पक शब्द आहे, ‘घोड्यावर बसविणे’. तुम्ही घोडेस्वार आहात काय, तुम्हाला घोड्यावर मांड ठोकणे जमते काय, घोड्याला ताब्यात ठेवता येते काय, याचा कोणताही मागचा पुढचा विचार न करता मित्र, नातलगांच्या सहकार्याने घोड्यावर बसतो तर खरे, पण पुढे ज्या वेदना होतात. घोडा ऐकत नाही, रस्ता कळत नाही. मदतीला धावून येणारे केव्हाच गायब झालेले असतात. तेव्हा घोडामैदान जवळ असले तरी ते क्षितीजापल्याड असल्याचा भास होतो, हे सगळे पहिल्या निवडणुकीत घडत असते. असा अनुभव प्रत्येकाने घेतला असतो. पुढे अनुभवाचे शहाणपण येते. आणि निवडणुकांना निर्भयपणे, समंजसपणे सामोरे जायला लागतो. पण ही पहिली निवडणूक कायमस्वरुपी स्मरणात राहते, असा बहुसंख्य उमेदवारांचा अनुभव असतो.२००९, २०१४ या दोन निवडणुकांचा आढावा घेतला तर लक्षात येते की, पहिल्यांदा निवडणूक लढवून जिंकणारे नंतर दुसºया निवडणुकीत मात्र पराभवाची चव चाखताना दिसतात. आता यशाची हवा डोक्यात गेली की, विकास कामांवर भरोसा असताना मतदारांना तो जाणवला नाही, कारण काहीही असो. विजय रथ जमिनीवर आलाच.२००९ च्या निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसचे तब्बल ४ उमेदवार पहिल्यांदा विजयी झाले. माजी महापौर गुलाबराव देवकर हे नवनिर्मित जळगाव ग्रामीणमधून, नंदुरबारचे माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांचे शालक जगदीश वळवी चोपड्यातून, माजी आमदार ओंकार वाघ यांचे पूत्र दिलीप वाघ हे पाचोºयातून, माजी नगराध्यक्ष अनिलदादा देशमुख यांचे पूत्र राजीव देशमुख चाळीसगावातून तर राजवडचे साहेबराव पाटील हे अमळनेरातून पहिल्यांदा निवडून आले. साहेबराव पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. याचवेळी काँग्रेसतर्फे रावेरमधून शिरीष मधुकरराव चौधरी तर शहाद्यामधून अ‍ॅड.पद्माकर वळवी विजयी झाले. डॉ.गावीत यांचे बंधू शरद गावीत हे समाजवादी पक्षातर्फे नवापुरातून निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचा पराभव केला. असाच धक्कादायक पराभव माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा धुळे ग्रामीण या मतदारसंघात शिवसेनेच्या प्रा.शरद पाटील यांनी केला.२०१४ मध्ये ९ आमदारांपैकी एकही आमदार पुन्हा निवडून आला नाही. सगळ्यांचा पराभव झाला. यावर्षी भाजपतर्फे उदेसिंग पाडवी (शहादा), सुरेश भोळे (जळगाव शहर), उन्मेष पाटील (चाळीसगाव), काँग्रेसतर्फे कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), शिवसेनेतर्फे प्रा.चंद्रकांत सोनवणे (चोपडा), किशोर पाटील (पाचोरा), अपक्ष शिरीष चौधरी (अमळनेर) हे निवडून आले. या ७ पैकी उन्मेष पाटील हे खासदार झाल्याने रिंगणात नाहीत. तर प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे या निवडणूक लढवत आहेत. अमळनेरचे शिरीष चौधरी हे यंदा भाजपचे उमेदवार आहेत.२०१९ मध्ये पहिल्यांदा भविष्य अजमावणाºया प्रमुख उमेदवारांमध्ये राजेश पाडवी (शहादा), भरत गावीत व शिरीष नाईक (नवापूर), ज्ञानज्योती भदाणे (धुळे ग्रामीण), हिलाल माळी (धुळे शहर), जगन सोनवणे (भुसावळ), पुष्पा महाजन (जळगाव ग्रामीण), मंगेश चव्हाण (चाळीसगाव), रोहिणी खडसे (मुक्ताईनगर) यांचा समावेश आहे. त्यांच्या भवितव्याचा फैसला २४ रोजी होईल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव