शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

निर्मलाताई, यावर्षी प्राप्तिकरदात्यांचे एवढे तरी ऐका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 13:57 IST

प्राप्तिकर आकारणीच्या सध्याच्या दोन पद्धतींतून एका पद्धतीची निवड करणे करदात्यांसाठी अव्यवहार्य, जोखमीचे आहे. त्यात मूलभूत सुधारणा आवश्यक!

ॲड. कांतीलाल तातेड

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेला सादर करतील. त्यांनी प्राप्तिकर आकारणीच्या सध्याच्या दोन पद्धतींतून एका पद्धतीची निवड करण्यासंबंधीची तरतूद रद्द करून पूर्वीप्रमाणेच वजावटीसह प्राप्तिकर आकारण्याची एकच पद्धत चालू ठेवणे व त्यातही मूलभूत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षापर्यंत विविध वजावटीसह प्राप्तिकर आकारणीची एकच पद्धत अस्तित्वात होती. परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून वजावटविरहित प्राप्तिकर आकारणीची नवीन पर्यायी पद्धत लागू करून या दोन पद्धतींपैकी एका पद्धतीची निवड करण्याचा पर्याय प्राप्तिकरदात्यांना दिला. या नवीन पद्धतीनुसार प्राप्तिकर आकारणीचे दर काही प्रमाणात कमी करण्यात आले. परंतु त्याचवेळी प्राप्तिकरदात्यांना जुन्या पद्धतीनुसार मिळत असलेल्या ७० वजावटी काढून घेण्यात आल्या. तसेच ज्येष्ठ व अतिज्येष्ठ प्राप्तिकरदात्यांना अनुक्रमे तीन लाख व पाच लाख रुपयांची मिळत असलेली प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा २.५० लाख रुपये करण्यात आली. पगारदारांना दोन्हीपैकी कोणताही एक पर्याय स्वीकारण्याची मुभा सध्या दिलेली असली तरी धंदा-व्यवसायाचे उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकरदात्यांना मात्र त्यांनी एकदा स्वीकारलेला पर्याय पुन्हा बदलता येणार नाही.

मुळात सर्व प्राप्तिकरदात्यांसाठी प्राप्तिकर आकारणीची एकच पद्धत अस्तित्वात असणे व ती सर्वांना समानतेने लागू करणे हे कोणत्याही करप्रणालीचे मूलभूत तत्त्व आहे. कोणतीही करप्रणाली सर्वसामान्य प्राप्तिकरदात्यांना समजण्यास अत्यंत सुलभ, सोपी व सुटसुटीत असावी लागते. मात्र भारतात प्राप्तिकर कायदा किचकट, क्लिष्ट व अन्यायकारक झालेला आहे. त्यात अनेक विसंगती आहेत. आपले करदायित्व ठरविताना सरकारचे भविष्यातील सतत बदलणारे प्राप्तिकर व गुंतवणूकविषयक धोरण तसेच आर्थिक बदलांचा वेध घेऊन भविष्यात कर भरण्याचा कोणता पर्याय आर्थिकदृष्ट्या अधिक लाभदायक ठरेल यासंबंधीचा विकल्प आज निवडणे कठीणच आहे; शिवाय अशा अनिश्चित स्वरूपाचा पर्याय निवडण्याची प्राप्तिकरदात्यांवर सक्ती करणे घटनाबाह्य आहे. प्राप्तिकर आकारणीच्या पहिल्या पद्धतीनुसार प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ न करता सरकारने २०१९-२० या आर्थिक वर्षापासून ज्या प्राप्तिकरदात्यांचे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८७(अ) अन्वये कमाल १२,५०० रुपयांची सूट देण्यास सुरुवात केली. त्यामुळे ज्या प्राप्तिकरदात्यांचे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना प्राप्तिकर भरावा लागत नाही. परंतु प्राप्तिकरदात्यांच्या करपात्र उत्पन्नात पाच लाख रुपयांपेक्षा थोडी जरी वाढ झाली तर, त्यांना मात्र २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या सर्व रकमेवर प्राप्तिकर भरावा लागतो. उदा. प्राप्तिकरदात्यांचे उत्पन्न पाच लाख दहा रुपये जरी झाले तरी त्यांना त्या १० रुपयांच्या जास्त उत्पन्नासाठी १३,००३ रुपये प्राप्तिकर भरावा लागतो. परंतु जर, त्याने प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८०(सी) अंतर्गत किरकोळ रकमेची गुंतवणूक केली तर, त्याला १२,५०० रुपयांची सूट मिळते व त्याला एक रुपयाही प्राप्तिकर भरावा लागत नाही. त्यामुळे सरकारने अशी सूट देण्याऐवजी जर, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादाच पाच लाख केली असती तर, अशा विसंगती निर्माण झाल्या नसत्या. 

प्राप्तिकर कायद्यातील ‘११५ बीएसी’ या नव्या कलमान्वये, प्राप्तिकर कायद्यानुसार मिळणाऱ्या ७० वजावटींपैकी कोणतीही वजावट न घेता कमी दराने प्राप्तिकर भरण्याचा दुसरा पर्याय प्राप्तिकरदात्यांना दिलेला आहे. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांना प्रमाणित वजावट, व्यवसाय कर, गृहकर्जावरील व्याज व कलम ८०(क) अंतर्गत मिळणारी १.५० लाख रुपयेपर्यंतची सवलत अशा एकूण ७० वजावटींपैकी कोणतीही वजावट मिळत नाही.घटनेच्या अनुच्छेद २७६ अन्वये प्राप्त अधिकारांतर्गत राज्य सरकारे उत्पन्नावर आधारित ‘व्यवसाय कर’ वसूल करीत असतात. ‘करावर कर नको’ म्हणून प्राप्तिकरातून ‘व्यवसाय करा’च्या रकमेला वजावट दिली जात असते. त्यामुळे कमी दराने प्राप्तिकराची आकारणी हवी असल्यास त्यांना विविध वजावटींच्या हक्कांपासून वंचित करणे अयोग्य व अन्यायकारक आहे. अर्थमंत्र्यांनी प्राप्तिकर आकारणीच्या सध्याच्या दोन पद्धतींतून एका पद्धतीची निवड करण्यासंबंधीची तरतूद रद्द करून मूलभूत सुधारणांच्या आधारे पूर्वीचीच वजावटीसह प्राप्तिकर आकारणीची पद्धत चालू ठेवणे आवश्यक आहे.

( लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत)kantilaltated@gmail.com

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEconomyअर्थव्यवस्थाBudgetअर्थसंकल्प