शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

निक जोनास आणि सोलापुरी चादरीचा शर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 07:00 IST

प्रियांका चोप्राचा नवरा निकने सोलापुरी चादरीचा शर्ट घातल्यावर हलचल झाली! आतातरी सोलापूरच्या पेठेतून नवा ‘सोलापुरी ब्रँड’ उदयाला येईल का?

सचिन जवळकोटे

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सर्वाधिक चर्चा झाली त्यांच्या पेहरावाचीच. वेगवेगळ्या जाकिटातले त्यांचे लूक्स सोशल मीडियावरही टीकाटिप्पणीसह व्हायरल झाले ; मात्र खूप कमी लोकांना माहीत आहे की, हे जाकीट त्यांनी खास महाराष्ट्रात शिवून घेतलेत . विशेष म्हणजे आपल्या जाहीर भाषणातून त्यांनी या मराठी जाकिटाचं कौतुकही केलं. खरंतर, गुजरातमधील सुरत अन् अहमदाबाद ही शहरं म्हणजे अवघ्या देशाला कापड पुरवणाऱ्या मजबूत बाजारपेठा. तरीही मोदी मराठी जाकिटाच्या प्रेमात पडले. डझनाच्या संख्येत त्यांनी असे ड्रेस सोलापुरातून घेतले.

आपला महाराष्ट्र अनेक उद्योग-धंद्यांनी समृद्ध असला तरी कापड व्यवसाय हा खरा गाभा. आजही मुंबईतल्या कैक चाळी गिरणगावाचा सुवर्णकाळ आठवत तग धरून आहेत. याच मुंबईची छोटी भावंडं म्हणजे सोलापूर, इचलकरंजी, मालेगाव अन् भिवंडी सारखी शहरं. स्पर्धेच्या युगात स्वत:ला झपाट्यानं बदलून घेता न आल्यानं इथला व्यवसाय हळूहळू मागं पडला; मात्र याच सोलापुरची नवी पिढी आता आपल्या उत्पादनाचं ग्लोबल मार्केटिंग करण्यात आक्रमकतेनं पुढाकार घेऊ लागली आहे.

गेल्या आठवड्यात अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती निक जोनास याने सोलापुरी चादरीपासून शिवलेला शर्ट परिधान केला. त्याचा फोटोही ‘इन्स्टा’वर टाकला. पाहता-पाहता व्हायरल झाला. चादरीचा शर्ट शिवण्याची कल्पना कशी सुचली, हे जोनासनं जाहीर केलं नाही. मात्र हे शिवणं प्रकरण तसं अवघडच.

जवळपास सव्वा किलो वजन असलेली चादर कापण्यासाठी टेलरच्या मोठ्या कात्रीचीही दमछाक ठरलेली. म्हणजे ताडपत्री शिवण्यासाठी वापरली जाणारी मशीनच इथं कामाला येणार. शिवाय जाड सुईही अनेकवेळा तुटण्याची शक्यता अधिक. हा सारा द्रविडी प्राणायाम कदाचित लोकांच्या लक्षात आला असावा, म्हणूनच या शर्टच्या फोटोला साडेतीन लाखांपेक्षाही अधिक लाइक्स मिळालेत. चादर ही केवळ थंडीत उब आणणारी वस्तू ; मात्र त्याचा फॅशन म्हणूनही वापर करता येतो, याचा शोध निकच्या पोस्टमधून नेटकऱ्यांना लागला. त्यामुळं चित्रविचित्र कॉमेंट्सचाही पाऊस पडला.

कुणी त्याला बेडशीट म्हटलं तर कुणी ब्लँकेट; मात्र पंधरा वर्षांपूर्वी सोलापूरच्या राजू राठी नामक व्यापाऱ्यानं मुंबईच्या आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये याच चादरींचा पुरेपूर वापर केला होता. यातल्या कैक मॉडेल्सनी परेरा नामक फॅशन डिझायनरच्या माध्यमातून चादरीचे वेगवेगळे ड्रेसही वापरले होते. त्यावेळी डाव्या चळवळीतील नेत्यांनी ‘चादरीची बदनामी करणारी विकृती’ या भाषेत कडाडून टीकाही केली होती.

‘चादरीचा ड्रेस कुठं वापरतात का?’ असा सवाल जगाला पडला असला तरी या ब्रँडिंगचा पुरेपूर वापर करण्यावर या क्षेत्रातल्या नव्या पिढीचा भर आहे. १९९० च्या दशकात सोलापुरची चादर देशभरात जायची. समुद्रकिनारी वापरले जाणारे ‘बीच टॉवेल’ तर कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया अन् अगदी सौदी अरेबियातही हातोहात खपायचे. त्याकाळी जगभरातून वाढलेली मागणी पाहून इथल्या अनेक उत्पादक व्यापाऱ्यांनी दुबईतच बंगले विकत घेऊन तिथं व्यवसाय सुरू केला होता ; मात्र कमी दरात जास्त माल खपविण्याच्या नादात काही जणांनी सुताच्या दर्जाकडे दुर्लक्ष केलं अन् मोठा फटका बसला. याच काळात पानिपत, सेलम अन् मदुराईत  सोलापुरी चादरीचा डुप्लिकेट माल तयार होऊ लागला. स्वस्तात मिळणारी ही बनावट चादर ‘सोलापुरी ब्रँड’ म्हणून हातोहात खपवली जाऊ लागली. एकेकाळी ज्या सोलापुरात बत्तीस हजार पॉवरलूम मशीन्सवर लाखभर कामगार काम करायचे, तिथं आता चौदा हजार यंत्रांवर पस्तीस हजार कामगार कसंबसं जगतात. 

एकीकडं देशात बनावट मालाचं उत्पादन वाढलंय, दुसरीकडं पाकिस्तान, तुर्कस्तान अन् उझबेकिस्तानसारखे देशही चादरींच्या निर्मितीत उतरल्यामुळं सोलापूरच्या हुशार उद्योजकांनी आता नवनव्या उत्पादनांकडं लक्ष वळवलं आहे. बाथरोब, बेसिन नॅपकिन, रोटी कव्हर, टॉवेल बुके अन् वॉल हँगिंग यांचं डिजिटल मार्केटिंग सुरू केलंय. चादरीच्या वॉल हँगिंगचा नवा प्रयोग केला जातोय. राजकीय नेत्यांच्या वाढदिवस दिनी असं हँगिंग देण्याची क्रेझ आता कार्यकर्त्यांमध्ये आलीय.

केवळ उत्पादनाचा दर्जा उत्तम असून चालत नाही, त्याला चांगल्या मार्केटिंगचीही जोड असावी लागते. मात्र मराठी माणसं इथंच कमी पडतात, हे नेहमीचंच रडगाणं. सोलापूरच्या चादरी अन् टॉवेल्स जगभरात पाठविणारे मोठे व्यापारी असतात मुंबई, कलकत्ता अन् दिल्लीतील. यांचा खेळ चालतो फक्त मोबाइलवर. तिकडून ऑर्डर आली की इकडून गठ्ठे मागविले जातात. सर्वात कहर म्हणजे या व्यापाऱ्यांनी आयुष्यात कधीही सोलापूर पाहिलेलं नसतं, तरीही ‘सोलापुरी ब्रँड’चा वापर ते बिनधास्तपणे जगभरात करतात. हेच आता सोलापुरी उत्पादकांच्या लक्षात येऊ लागलं आहे.

भारताच्या नौदलाला जवळपास तीन-साडेतीन लाख ब्ल्यू टॉवेल्स पुरविणाऱ्या सोलापूरनं निक जोनासच्या या अनोख्या फॅशन प्रेझेंटेशनमधली संधी अचूक ओळखलीय; म्हणूनच ‘मोदी जाकीट’च्या धर्तीवर गेल्या दोन दिवसांपासून ‘चादर जाकीट’ची निर्मिती सुरू झाली आहे.  या जाकीटात निकच्या शर्टासारखे  उसवलेले धागे - म्हणजे टॅसल्स - खाली गोंडे बांधून  असतील. चादरीच्या या जाकीटासाठी उद्योजकांचं गणितही अफलातून. पाच बाय सात फूट ‘डबल चादरी’ त दोन ते तीन जाकीटं तयार होतात. एका चादरीची किंमत असते सरासरी तीनशे रुपये. मात्र ही जाकीटं शिवून मिळतील कमीत कमी दोन हजार रुपयात. आता लवकरच गल्लोगल्ली लोकल निक जोनास वावरताना दिसू लागले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. 

टॅग्स :SolapurसोलापूरNick Jonesनिक जोनास