शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘मातृभूमी’चा नवा पॅटर्न

By राजा माने | Updated: August 18, 2017 00:37 IST

आपण कुठेही असलो तरी आपल्या गावाची ओढ प्रत्येकाला असते. गावासाठी काहीतरी केले पाहिजे या अनिवासी भूमिपुत्रांच्या भावनेला फुंकर घालणारा बार्शी येथील ‘मातृभूमी प्रतिष्ठान’चा नवा पॅटर्न...

आपण कुठेही असलो तरी आपल्या गावाची ओढ प्रत्येकाला असते. गावासाठी काहीतरी केले पाहिजे या अनिवासी भूमिपुत्रांच्या भावनेला फुंकर घालणारा बार्शी येथील ‘मातृभूमी प्रतिष्ठान’चा नवा पॅटर्न...जिथे आपण जन्मलो, वाढलो त्या गावाची ओढ प्रत्येकाला सदैव असते. दुनियादारीच्या रहाटगाडग्यात कोण कुठेही पोहोचला तरी त्याला गावाची ओढ स्वस्थ बसू देत नाही. याच ओढीतून आपल्या गावात चांगले घडत राहावे ही भावना वाढीस लागते. त्या भावनेला योग्य आकार मिळाल्यास किती चांगले काम उभे राहू शकते याचे उदाहरण म्हणून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठान या संस्थेचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होऊन स्वत:च्या पायावर उभी राहिलेली ‘अनिवासी’ गावकरी मंडळी प्रत्येक गावात असतात. त्या गावासाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छाही त्यांच्यामध्ये असते. पण नक्की काय करायचे या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही आणि अशा लोकांची इच्छा केवळ मनातच राहते. नेमक्या याच वेदनेची जाणीव सनदी अधिकारी संतोष पाटील, अविनाश सोलवट आणि त्यांच्या मित्रमंडळीला झाली. त्यातूनच बार्शी तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील अराजकीय व्यक्तींना एकत्र करून आपल्या भागाच्या विकासासाठी हातभार लावणारी चळवळ उभी करण्याचा विचार पुढे आला. प्रशासकीय सेवेपासून कलाक्षेत्रापर्यंत प्रत्येक क्षेत्रात बार्शीचे भूमिपुत्र देशात आणि परदेशात कार्यरत असल्याची माहिती मिळाली. आयएएस, आयपीएसपदांपासून तलाठी पदापर्यंत वेगवेगळ्या पदांवर बार्शी तालुक्यातील लोक काम करीत असल्याचे दिसून आले. त्यांना आपल्या तालुक्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ असल्याचेही समजले. याच आधारावर पाटील व सोलवट यांनी बार्शीत स्थायिक असलेल्या काही सेवाभावी लोकांशी चर्चा केली. प्रतापराव जगदाळे, उद्योजक संतोष ठोंबरे, अजित कुंकूलोळ, मुरलीधर चव्हाण, अशोक हेड्डा, मधुकर डोईफोडे, डॉ.लक्ष्मीकांत काबरा, विनय संघवी, प्रा. किरण गायकवाड, कमलेश मेहता, सयाजीराव गायकवाड, अमित इंगोले, गणेश शिंदे आदींसारख्या विविध क्षेत्रातील सेवाभावींना एकत्र करून अनिवासी बार्शीकरांना साथीला घेऊन कायमस्वरूपी संघटन तयार करण्याचा निर्णय झाला. त्या संघटनेचे नेतृत्व संतोष ठोंबरे यांच्याकडे देण्यात आले आणि तिथेच महाराष्टÑाच्या समाजसेवी चळवळीला दिशा देऊ पाहणाºया मातृभूमी प्रतिष्ठान या नव्या पॅटर्नचा जन्म झाला.सुरुवातीच्या काळात १२ खेड्यांना टप्प्या-टप्प्याने शुद्ध पाणी प्रकल्प बसविणे, प्राथमिक शाळेतील मुला-मुलींसाठी शाळेच्या आवारात खेळण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, गावातील बसथांब्यावर महिलांसाठी निवारा उभा करणे असे उपक्रम राबविण्यात आले. शुद्ध पाणी आणि आरोग्य यावर प्रबोधन करण्यासाठी प्रत्येक गावात प्रचारफेºया आयोजित करण्यात आल्या. लोक प्रत्येक उपक्रमात फक्त लाभ न घेता ते काम उभे करण्यासाठी स्वत: कष्ट घेऊ लागले. हे मूलभूत काम सुरू असताना ‘जिथे कमी, तिथे आम्ही’ हे सूत्र अंगिकारून प्रतिष्ठानने लोकांच्या मदतीने तालुक्यातील गाळ काढण्याच्या मोहिमेपासून ते थेट दर्जेदार व्याख्यानमालेच्या आयोजनापर्यंत आपला सहभाग वाढविला. त्याचाच परिणाम म्हणून देशात केवळ बार्शीत एकमेव मंदिर असल्याची ख्याती असलेल्या ग्रामदैवत भगवंत महोत्सवात महाप्रसादासारखे उपक्रम उत्साहाने पार पडू लागले.आज प्रत्येक गावामध्ये वृद्ध आणि निराधारांच्या पालनपोषणाचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यावर उपाय म्हणून अशा निराधारांसाठी दोनवेळ भोजनाची व्यवस्था करण्याचा निर्णय झाला. खामगाव, सुर्डी व श्रीपतपिंपरी या गावांमध्ये प्रत्येकी २० लाभार्थ्यांना घरपोच जेवण देण्याची सोय करण्यात आली. या सुविधेची निकड लक्षात घेऊन बार्शी शहर सर्वेक्षण करून निराधारांची माहिती संकलित करण्यात आली. त्यातूनच अन्नपूर्णा ही योजना साकार झाली. आज या योजनेतून निराधारांना दररोज दीडशे डबे घरपोच दिले जातात. याला जोडूनच बार्शीतील कॅन्सर हॉस्पिटल व जगदाळेमामा हॉस्पिटल येथे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी माफक दरात पोळीभाजी केंद्राची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. आरोग्यापासून नव्या पिढीच्या करिअरपर्यंतच्या विषयात मदत करण्याचा कृतिशील मानस मातृभूमीच्या प्रत्येक सदस्यांमध्ये दिसतो. आता अनेक अनिवासी बार्शीकर मातृभूमी परिवारात दाखल होताना दिसतात.