शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नेताजींची साहसकथा : ऐतिहासिक सत्य आणि पुराण

By admin | Updated: January 28, 2016 03:32 IST

आझाद हिंद फौज घेऊन नेताजी भारतात येऊ शकले असते काय आणि त्यामुळं ब्रिटिश सत्तेला हादरा बसला असता काय? मोदी सरकारनं नेताजींविषयक दस्तऐवज खुले केल्यावर सुरू

- प्रकाश बाळ(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)आझाद हिंद फौज घेऊन नेताजी भारतात येऊ शकले असते काय आणि त्यामुळं ब्रिटिश सत्तेला हादरा बसला असता काय?मोदी सरकारनं नेताजींविषयक दस्तऐवज खुले केल्यावर सुरू असलेल्या चर्चेत हा एक सुप्त सूर आढळून येत आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील घटना व प्रसंग याकडं आजही सात दशकांनतर वस्तुनिष्ठेऐवजी स्वप्नरंजनात्मक दृष्टीनं बघण्याची आपल्या समाजमनात रूजलेली प्रवृत्ती यास कारणीभूत आहे. सत्य-अर्धसत्याची बेमालूम मिसळण करून संघ परिवार भारतीय समाजमनातील या प्रवृत्तीला खतपाणी घालत त्याचा राजकीय फायदा उठवत आला आहे. ही प्रवृत्ती प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीच्या काळात किती प्रबळ होती, याचं वर्णन श्री. ना. पेंडसे यांच्या ‘संभुसांच्या चाळी’त राहणाऱ्या नागरिकांच्या चर्चातून वाचायला मिळते. समाजमनातील या प्रवृत्तीनं किती भल्या भल्यांनाही ग्रासलेलं असतं, याचं उदाहरण म्हणजे १९९८ साली पंतप्रधान असताना इंदरकुमार गुजराल यांच्यासारख्या नेमस्त व बुद्धिवंत मानल्या गेलेल्या नेत्यानं कोहिमा येथे केलेलं भाषण. ‘नेताजींच्या फौजा मोठ्या प्रमाणात जर ईशान्य भारतात आल्या असत्या, तर देशाचा इतिहास बदलला असता’, अशा आशयाचं विधान आझाद हिंद फौजेच्या काही तुकड्या ईशान्य भारतातील ज्या ठिकाणी पोचल्या होत्या, तेथील स्मारकापाशी झालेल्या एका समारंभात बोलताना गुजराल यांनी केलं होतं. पण यातील वस्तुस्थिती काय होती?सुभाषबाबू कलकत्त्यात स्थानबद्धतेत होते. तेथून शिताफीनं ब्रिटिश सरकारच्या हातावर तुरी देऊन १६ जानेवारी १९४१ ला गुप्तरीत्या अफगाणिस्तानमार्गे मॉस्को, रोम असा प्रवास करीत ते जर्मनीत जाऊन पोचले. त्यांचा उद्देश होता, तो भारतातील ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढण्यासाठी हिटलरच्या राजवटीची मदत मिळविण्याचा. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, अशी नेताजींची रणनीती होती, असं सांगितलं जातं. खुद्द हिटलरचं मत काय होतं?मिलान हाऊनर नावाच्या एका अभ्यासकानं ‘इंडिया इन अ‍ॅक्सिस स्ट्रॅटेजी:जर्मनी, जपान अ‍ॅन्ड इंडियन नॅशनॅलिस्ट इन सेकंड वर्ल्ड वॉर’ या शीर्षकाचं एक पुस्तक जवळ जवळ पाव शतकापूर्वी जर्मन, इटालियन व जपानी दस्तऐवजांच्या आधारे लिहिलं आहे. हाऊनर या पुस्तकात असं दाखवून देतो की, ‘भारताकडं तुम्ही मोर्चा वळवल्यास तेथील जनता ब्रिटिश सत्तेच्या विरोधात उठाव करील व आमचा पक्ष (फॉरवर्ड ब्लॉक) हा या उठावाचं नेतृत्व करील’, असा युक्तिवाद नेताजींनी हिटलरशी झालेल्या चर्चेत केला होता. नेताजी जर्मनीत आले एप्रिल १९४१ ला आणि तेथून जपानला गेले, ते फेब्रुवारी १९४३ ला. म्हणजे जवळ जवळ २२ महिने ते जर्मनीत होते. या काळात जर्मनी, इटली, जपान यांनी एकत्र येऊन भारतीय स्वातंत्र्यासंबंधी मागणी करून आपल्या नेतृत्वाखालील अस्थायी सरकारला मान्यता द्यावी, अशी नेताजींची मागणी होती. असं झाल्यास सोविएत युनियनमध्ये घुसलेल्या जर्मन फौजा जेव्हा त्या देशाच्या मध्य आशियाई भागाकडं वळतील, तेव्हा त्यांच्या सोबत जाण्यासाठी ‘भारतीय फौज’ तयार असायला हवी आणि ती तयार करण्यासाठी हिटलर सरकारनं मदत करावी, असंही नेताजींचं मत होतं. या संदर्भात हिटलर व नेताजी यांच्यात जर्मन लष्कराच्या मुख्यालयात चर्चा झाली. तेव्हा हिटलरनं भितींवरील जगाच्या नकाशाकडं व त्यातील जर्मन फौजांच्या स्थितीकडं निर्देश केला आणि भारतापर्यंत या फौजा पोचण्यास किमान दोन वर्षे लागतील, असं सांगितलं. शिवाय एखाद्या शिस्तबद्ध सैन्यातील दोन हजार सैनिकही हजारो नि:शस्त्र नागरिकांवर नियंत्रण कसं बसवू शकतात, हेही समजावून सांगितलं. हिटलर हे सांगत होता, त्याचा जर्मन लष्करानं त्याला दिलेल्या अहवालाचा आधार होता. भारतातील जनता ब्रिटिशांच्या विरोधात आहे, पण ती आपल्या बाजूनं नाही आणि बोस यांचा पक्ष तेथील प्रस्थापित राजकीय पक्षाच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे, असं मत या अधिकाऱ्यांच्या गटानं हिटलरकडं व्यक्त केलं होतं. त्याचबरोबर जर्मनी, जपान व इटलीनं एकत्र येऊन भारताच्या अस्थायी सरकारला मान्यता देण्यासही हिटलर तयार नव्हता. ‘असं सरकार स्थापन करायला हरकत नाही, पण त्याच्या हाती भूभाग लवकरात लवकर यायला हवा, तसं होणं तुमच्याबाबत शक्य दिसत नाही, असं मत जोसेफ गोबेल्सनं नोंदवलं. पश्चिम आशियात जर्मनी व दोस्त राष्ट्राच्या फौजात जी घमासान लढाई चालू होती, त्यात अनेक भारतीय सैनिक सहभागी होते. तेथील भारतीय सैनिकांचं मन वळवण्यासाठी आमच्या लोकाना जाऊ द्या, अशी नेताजींची मागणी होती. पण तेथील जर्मन सैन्याचं नेतृत्व करणाऱ्या फील्ड मार्शल रोमेल यानं ती साफ धुडकावून लावली. या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर नेताजी फेब्रुवारी १९४३ ला जपानला जायला निघाले. तेव्हा स्टालिनग्राडच्या लढाईत जर्मन फौजांची हार झाली होती आणि अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली होती. त्यामुळं युद्धाचं पारडं दोस्त राष्ट्राच्या बाजूनं झुकायला सुरूवात झाली होती. गुजराल म्हणत होते, तशा आझाद हिंद फौजा ईशान्य भारतात पोचल्या, तेव्हा जपान पराभूत होण्याच्या मार्गावर होता. नेताजींना होणारी जपानी मदत आटली होती. ‘डिफीट इन टू व्हिक्टरी’ या फील्ड मार्शल स्लिम यांच्या आत्मचरित्रात आग्नेय आशियातील या जपानी पराभवाचं जे वर्णन आहे, ते वाचलं की, नेताजींच्या फौजा ईशान्य भारतात पोचण्याची अजिबात शक्यता कशी नव्हती, हे स्पष्ट होतं. सांगावयाचा मुद्दा इतकाच की, भारतीय समाजमनातील या स्वप्नरंजनात्मक प्रवृत्तीला ऐतिहासिक तथ्यांचं वावडं आहे. कोणत्याही ऐतिहासिक तपशिलाला श्रद्धेचे बिरूद चिकटवलं की, तो इतिहास न राहता पुराण बनतं. नेताजींच्या साहसकथेचं असंच पुराण बनवलं गेलं आहे आणि पुराण हाच इतिहास आहे, असं सध्याचं सरकारच मानत असल्यानं हे नेताजी पुराण हाच इतिहास मानला जात आहे.