शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांच्या मानसिक बदलाची गरज; सरकारी स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 03:12 IST

गेल्या २० वर्षांत मोबाइल फोनला आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आज मोबाइल वापरते. मोबाइल वाजला रे वाजला की त्यावर त्वरित बोलण्याची निकड प्रत्येकाला असते. 

- अशोक दातार (वाहतूकतज्ज्ञ)गेल्या २० वर्षांत मोबाइल फोनला आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आज मोबाइल वापरते. मोबाइल वाजला रे वाजला की त्यावर त्वरित बोलण्याची निकड प्रत्येकाला असते. एरव्ही काही आक्षेप असायचे काहीच कारण नाही. परंतु जेव्हा वाहनचालक असे करतात, तेव्हा ते नक्कीच आक्षेपार्ह व धोकादायक आहे.अनेकांना वाटते की वाहन चालवणे हा वेळेचा अपव्ययच आहे. तेव्हा जर फोन केल्यास हा वेळ सत्कारणी लागू शकतो. असे करणे काही गैर नाही. आता दुर्दैवाने पोलिसांच्या नियमानुसार वाहन चालवताना फोन करणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी शिक्षेचीही तरतूद आहे. मात्र पदोपदी पोलीस नसल्यामुळे वाहनचालक या संधीचा पुरेपूर फायदा घेताना दिसतात. औद्योगिक व व्यावसायिकदृष्ट्या अग्रेसर असलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक करताना फोनचा वापर करण्याच्या गुन्ह्यात दुसऱ्या स्थानावर आहे. या परिस्थितीला कारणीभूत कोण? महाराष्ट्र पोलीस? कारण अतिशय उद्यमशील असे महाराष्ट्रातील लोक आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी फोनचा वापर सदोदित करत असतात. असा फोनचा वापर अपघाताला कारणीभूत ठरतो हा मुद्दा अलाहिदा.आपल्याकडे लोकलच्या डब्यावर चढून प्रवास करणारे स्टंटबाज जसे आहेत, त्याहून खूपच सोपा स्टंट म्हणजे, दुचाकी चालवताना हेल्मेटच्या आत कानावर खोचून फोनचा वापर करणारेही आहेत. दुचाकी वाहनांना ट्रॅफिकमधून मार्ग काढायला आवडते. विशेषत: बसेस व फुटपाथ यांच्यामधील चिंचोळ्या जागेतून निसटून जाताना, कानावर हेडफोन लावून संगीताचा आस्वाद घेताना आजूबाजूच्या वाहतुकीचे भान न राहिल्यामुळे अपघतात घडतात. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हाही आहे. अशा गुन्ह्यांचे प्रमाण जर १ टक्का असेल तर ते खूपच जास्त आहे.सध्या मोबाइल क्षेत्रातील क्रांतीमुळे इंटरनेटची सुविधा जवळजवळ सर्व मोबाइल कंपन्यांमार्फत ग्राहकांना दिली जाते. ज्यामुळे अनेक दृक्श्राव्य माध्यमांद्वारे मालिका, क्रीडा स्पर्धा, चित्रपट आदींचे प्रक्षेपण ग्राहकांना सहज उपलब्ध होते. परिणामी मोबाइलचा वापर अधिक होणे स्वाभाविकच आहे. वाहन चालवताना हे सर्व बघण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अपघातही वाढले आहेत.मात्र हे सर्व रोखण्याची वेळ आता आली आहे. यासाठी सर्वांगाने प्रयत्न व्हायल हवेत. एक म्हणजे दंडात्मक कारवाई प्रभावीपणे करायला हवी. त्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात.दुसरे म्हणजे नवे तंत्रज्ञान शोधायला हवे, जसे की वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीडो मीटरचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे मोबाइल वापरावर बंदी आणण्यासाठी प्रवासात जॅमर किंवा अन्य पर्याय शोधायला हवा. याचे संशोधन राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवे. तसेच वाहनांच्या व फोनच्या तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत आहे. मात्र चालकांच्या मानसिकतेमध्ये आवश्यक तो बदल होताना दिसत नाही. हा बदल घडवण्यासाठी सामाजिक व सरकारी स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. तरच भविष्यात मोबाइलवर बोलून वाहन चालवणा-यांचे अपघात होणार नाहीत.

टॅग्स :carकार