शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नाना, तुम्ही टेन्शन घेऊ नका ना...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:55 IST

आपण मिश्किल बोलण्यासाठी प्रसिध्द आहात. पण नाना, तुम्ही आता जुन्या विचाराचे झालात. आता आपण सत्ताधारी आहोत.

- अतुल कुलकर्णीप्रिय नाना ऊर्फ हरिभाऊ बागडे,नमस्कार. आपण मिश्किल बोलण्यासाठी प्रसिध्द आहात. पण नाना, तुम्ही आता जुन्या विचाराचे झालात. आता आपण सत्ताधारी आहोत. तेव्हा सत्ताधा-यांसारखेच वागावे लागते. आता आपल्या पक्षाला काँग्रेसमुक्त भारत बनवायचा आहे. ज्यांनी घोषणा केली त्यांच्याच गुजरातेत काँग्रेसला $४२ टक्के मतं कशी मिळाली याचा शोध चालू असला तरी ‘काँग्रेसमुक्ती’ हे आपले प्रथम कर्तव्य आहे.आता गेल्या तीन वर्षात काँग्रेसमधून किती नेते आपल्या पक्षात आले माहितीय तुम्हाला? अहो, ते सगळे आपल्या पक्षात येऊन पवित्र झाले आहेत. आपला पक्ष म्हणजे गंगाजल आहे नाना, ज्याला कुणाला पवित्र व्हायचे त्याने आपल्या पक्षात प्रवेश घेतला की तो पवित्र होतो. आता पुण्याचे खा. संजय काकडेंचेच पाहा ना. निवडणूक निकालाआधी ते म्हणाले होते, गुजरातेत काँग्रेसचा पराभव होणार... आणि आता, मोदींनी त्यांना चार गोष्टी ‘समजावून’ सांगताच, पंडित नेहरूंपेक्षा मोदी श्रेष्ठ आहेत असे ते म्हणाले ना... विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, प्रवीण दरेकर... यादी करायला गेलो तर जागा पुरणार नाही. या सगळ्यांवर वाट्टेल ते आरोप आपल्याही लोकांनी केले होते.पण नाना, आतली बातमी सांगू का तुम्हाला, यातल्या एकाला तरी त्यांच्या आरोपांवरील संरक्षणाशिवाय दुसरं काही मिळालंय का? नाही ना. ते संरक्षण देखील कधी काढून घ्यायचं हे ठरलंय नाना. आपले केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर काय म्हणाले ऐकलं ना तुम्ही. ‘जर का अधिकारी कामावर आले नाहीत तर त्यांना आधी नक्षलवादी बनवू आणि नंतर गोळ्या घालू... ’ असं म्हणाले ते. आपल्या पक्षात येणाºयांसाठी पण हेच तत्त्व लागू आहे नाना... त्यासाठी आधी लोकांना जवळ करावं लागतं. चुचकारावं लागतं. एकदा का ते आपल्या जाळ्यात आले की मग त्यांना रोज नवीन चॉकलेट कसं द्यायचं हे आपल्या हातातयं नाना... आता तुम्ही म्हणाल, त्या नारायण राणेंचे काय? नाना, त्यांना पण मंत्रिपदाचं चॉकलेट दिलंय. ते संपत आलं की नवीन गाजरं बाजारात येतीलच. ती देऊ त्यांना. तसाही त्यांना गाजराचा हलवा आवडतो असे मिलिंद नार्वेकर आपल्या देवेंद्रभाऊंना सांगत होता... तेव्हा काही काळजी करू नका...