शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

नागोबा-म्हसोबा पैशाला दोन.. पंचमी झाल्यावर पूजतंय कोण?

By सचिन जवळकोटे | Updated: August 19, 2021 07:49 IST

आजोबांनी पहिली बातमी वाचली- ‘आमदारकीच्या इलेक्शनपूर्वी कमळाकडे आकर्षित झालेल्या हात-घड्याळवाल्यांची अवस्था अत्यंत बिकट. सत्तेसाठी गेले, सत्तेबाहेर राहिले.’ 

- सचिन जवळकोटे(निवासी संपादक, लोकमत, सोलापूर)

इंद्र दरबारातल्या साऱ्या अप्सरा एकत्र आल्या. त्यांनी महाराजांकडं मागणी केली, “या श्रावणात आम्हाला थोडीशी विश्रांती मिळावी. मंगळागौरीच्या सोहळ्यासाठी सूट द्यावी.”महाराजांनी सहेतुक नारद मुनींकडं बघितलं. पहिल्या झटक्यात होकार गेला नाही, याचा अर्थ महाराजांच्या मनात ‘उद्धव’ घोळत असावेत, हे मुनींच्या लक्षात आलं.. कारण गेल्या दीड वर्षात कोणत्याही अनलॉक निर्णयाला त्यांनी तत्काळ होकार दिला नव्हता.मुनींनी मान लवून सांगितलं, “गेल्या वर्षीपासून भूतलावरही मंगळागौरी ऑनलाइनच सुरू आहेत, महाराज. एक सखी घरातून मोबाइलसमोर ‘नाच गं घुमा’ म्हणते. मग, दुसरी सखी तिच्या कॅमेरासमोर ‘नाचू मी कशी?’ विचारते” महाराजांनी आदेश दिला, “मुनी निघा तुम्ही. भूतलावर हे ऑनलाइन प्रकरण कसं रंगलंय, याचा शोध घ्या.”वीणा झंकारत मुनी भूतलावर पोचले. एका बंगल्याच्या व्हरांड्यात एकीकडं नातवंडं मोबाइलवर ऑनलाइन अभ्यास करत होती तर बाजूलाच आजोबा आपल्या मित्राला पेपरातल्या बातम्या वाचून दाखवत होते. मुलांचा मराठी क्लास सुरू होता. त्यांचे टीचर तिकडून मराठी म्हणी पाठ करून घेत होते. तिकडं आजोबांची बातमी वाचली गेली की लगेच इकडं पोरांच्या म्हणी कानी पडत होत्या. ह्या अनोख्या कॉम्बिनेशनमुळे नारद मुनींना मात्र सध्याच्या राजकारणातल्या गमतीदार गोष्टींचं परफेक्ट आकलन होत होतं. गालातल्या गालात हसत तेही या ‘टायमिंग शॉट’ला मनापासून दाद देऊ लागले.आजोबांनी पहिली बातमी वाचली- ‘आमदारकीच्या इलेक्शनपूर्वी कमळाकडे आकर्षित झालेल्या हात-घड्याळवाल्यांची अवस्था अत्यंत बिकट. सत्तेसाठी गेले, सत्तेबाहेर राहिले.’ याचवेळी मुलांच्या मोबाइलमध्ये तिकडून टीचरनी म्हण सांगितली, ‘तेल गेलं, तूप गेलं.. हाती धुपाटणं आलं.’आजोबांनी दुसरी बातमी वाचली- ‘पुन्हा घरवापसीसाठी या नेत्यांची धडपड सुरू, मात्र चांगली पदं मिळण्याची शक्यता कमी.’मुलांच्या मोबाइलमधून आवाज, ‘नागोबा-म्हसोबा पैशाला दोन.. पंचमी झाल्यावर पूजतंय कोण?’ आजोबा : देणग्यांचा ओघ अत्यंत कमी झाल्यानं ‘हात’वाली मंडळी आता एकेक पैसा खर्चताना दहादा विचार करणार. काटकसरीवर भर. टीचर : बैल गेला अन् झोपा केला..आजोबा : मुंबईतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे बनावट फेसबुक अकाउंट भलत्याच तरुणानं उघडलं. अवघं डिपार्टमेंट अवाक्. टीचर : आयजीच्या जीवावर बायजी उदार.- आजोबांच्या बातम्यांशी मुलांना आणि टीचरच्या म्हणींशीही आजोबांना काही सोयरसुतक नव्हतं, मात्र या ‘बातमी कम म्हणी’ ऐकताना नारद मुनींची मात्र हसून हसून पुरेवाट झाली. पुढचं पान चाळत आजोबा वाचू लागले, ‘मुंबईत कमळवाल्यांची व्यूहरचना. बीएमसी इलेक्शनसाठी नारायण कणकवलीकरांना पुढं करणार. धनुष्यबाणवाले लगेच सावध.’टीचर : ऐन दिवाळीत दाढदुखी.  आजोबा : ..आगामी स्थानिक संस्था निवडणुकीत आघाडी नाही : मलिक भाईंची परस्पर घोषणा. टीचर : नाचता येईना अंगण वाकडं.  आजोबा : मुनगंटीवार यांनी केलं चक्क सीएमचं कौतुक. ते तर म्हणे सुसंस्कृत नेते. टीचर : तुझं-माझं जमेना.. तुझ्यावाचून करमेना! आजोबा : ‘कृष्णकुंज’कार ‘इंजिन’वाले अन् ‘चंदूदादा कोथरूडकर’ एकमेकांना भेटले. आता लवकरच एकत्र येण्याची शक्यता. मात्र परप्रांतीय मुद्दा कळीचा राहणारच.टीचर : करायला गेले नवस.. आज निघाली अवस!  आजोबा : ‘नितीनभाऊ नागपूरकरां’नी टाकला ‘मातोश्री’वर लेटर बॉम्ब. विशेष म्हणजे हाय-वेला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अजित दादांनीही टोचले कान. ‘धनुष्य’वाली मंडळी गप्पच. टीचर : तोंड दाबून बुक्क्यांचा मार.. - अखेर शेवटची एक बातमी आजोबांनी वाचली, ‘इंदापुरातल्या दत्तामामांची सोलापुरात उद्धवांवर गावरान भाषेत टीका. म्हणाले.. सीएम जाऊ द्या, मरू द्या.’ आता तिकडून टीचरची कोणती म्हण कानावर पडणार, या उत्सुकतेनं नारदांनी कान टवकारले. मात्र ही चिमुकली पोरंच स्वतःहून एक ताल एक सुरात खच्चून ओरडली, ‘पायलीची सामसूम.. चिपट्याची धामधूम!’ नारायण.. नारायण..sachin.javalkote@lokmat.com

टॅग्स :Jara hatkeजरा हटके