शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

माझा मुलगा भलता गोडय ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 02:09 IST

(अब्राहम लिंकनच्या पत्राचा कविवर्य वसंत बापट यांनी केलेला अनुवाद त्या काळात योग्य होता. आजच्या काळात तो असा हवा. त्या दोघांची क्षमा मागून हा अनुवाद)

(अब्राहम लिंकनच्या पत्राचा कविवर्य वसंत बापट यांनी केलेला अनुवाद त्या काळात योग्य होता. आजच्या काळात तो असा हवा. त्या दोघांची क्षमा मागून हा अनुवाद)

प्रिय सर,सगळीच माणसं घोटाळेबाज असतात,नसतात सगळीच तत्त्वनिष्ठ...हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी...मात्र त्याला हे देखील शिकवा... की,प्रत्येक घोटाळ्यामागे राजकीय हात असतोच.आणि साधूसारखा वाटणारा गुंडदेखील...!राजकारणी स्वार्थीच असतात देशात,आणि असतात सगळं आयुष्य ‘स्व’साठीजगणारे नेतेही पुष्कळ...!वेळ आली की सूड घेणारे मित्रफक्त राजकारणातच असतात.मला हे देखील माहिती आहे की, सगळेघोटाळे त्याला पटापट नाही करता येणार...!तरीही जमलं तर त्याच्या मनावर हेच ठसवा...की, आजच्या जगात घाम घाळूनकमाई करण्यापेक्षा घोटाळे करूनकमाई करण्यातच शहाणपण आहे...!कितीही बदनामी झाली तरी,हसत हसत सामोरं कसं जायचं हे देखीलत्याला शिकवा... आणि शिकवा वरकमाईकशी मार्गी लावायची ते...!हे सगळं शिकवताना काही गोष्टी त्यालातुम्हीच सांगा, जसे की, रोज रात्री ट्रायडंटमध्येजाऊन छटाक आनंद कसा साजरा करायचा?पहाटे उठून कुणाला काही कळायच्या आतशासकीय बंगल्यावर कसे गुपचूप यायचे,तेही शिकवा त्याला, कारण ही कलाआलीच पाहिजे त्याला, यशस्वी होण्यासाठी.गुंडांना भीत जाऊ नको असंही सांगा त्याला,त्यांच्याशी दोस्ती कशी करायची, हे शिकवा!उगाच त्याला पुस्तकं,ग्रंथभांडारं दाखवत बसू नका...त्यापेक्षा, सूड कसा घ्यावा याचा विचारकरण्यासाठी त्याच्या मनाला निवांतपणाकसा मिळेल हे सांगा...!सृष्टीचं शाश्वत सांैदर्य अनुभवण्यापेक्षा, आणिपक्ष्यांची अस्मानभरारी पाहत बसण्यापेक्षाहे दिवस भौतिक सुखाचे आहेत, हे त्यालापक्के ठसवून द्या...हिरव्यागार डोंगरावरची फुलं पाहण्यापेक्षा,ते डोंगर कापून त्याचा पैसा कसा करायचा,ते आधी त्याला शिकवा,कारण तेच कामी येणार आहे...!शाळेत त्याला हा धडा मिळू दे...की फसवून मिळालेलं यशचसगळ्यात श्रेयस्कर असतं.आपल्या कल्पना, आपले विचार याच्यावरचदृढविश्वास ठेवत जा, असं त्याला सांगा...उगाच सत्य आणि न्याय वाटते म्हणूनलढण्याचे दिवस संपलेत, हेही शिकवा...सरकार कोणतही असो, घोटाळ्यांमधूनतावून-सुलाखून निघाल्याशिवायत्याला आणखी मोठे घोटाळेकसे करता येणार सर...उगाच धीर धरण्याच्या गोष्टी नका शिकवू...त्यापेक्षा मनात आलं की कसं मिळवायचंहे त्याला सांगा...!मानवजातीवर उदात्त श्रद्धा बाळगण्याचे दिवसकधीच संपलेत सर, हे त्याला आवर्जून सांगा.माफ करा सर, मी फार बोललो, पण हेतुम्हाला करावंच लागेल...नाही तर तो कसा टिकणार या स्पर्धेत...?कारण तीच काळाची गरज आहे बरं का...माझा मुलगा, भलताच गोड आहे ना सर...?(तिरकस)

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र