शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

कालचे सारे मुके आज बोलू लागले; नवसंस्कृतीचे बीज रोवणारा ‘मूकनायक’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 05:57 IST

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगातील या ओवीचा आधार घेत त्या व्यवस्थेविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायकाने एल्गार पुकारला.

- शांतीलाल गायकवाड(उपमुख्य उपसंपादक, लोकमत)अस्पृश्यांना स्वाभिमानाचे जिणे नाकारून इथल्या संस्कृती व धर्माने शेकडो वर्षे दडपून टाकले होते. समता, बंधुता, अभिव्यक्ती, लेखन-वाचन तर सोडाच; पण रोटी, कपडा और मकान आदी मूलभूत गरजांपासून हा दीनदलित समाज बहिष्कृत केला होता.काय करू आता धरूनिया भीड!नि:शंक हे तोंड वाजविले!!नव्हे जगी कुणी मुकियांचा जाण!सार्थक लाजून नव्हे हित!! १!!संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगातील या ओवीचा आधार घेत त्या व्यवस्थेविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायकाने एल्गार पुकारला.

मूकसमाजाच्या व्यथांनी व्यथित होणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेल्या २,५०० रुपयांच्या मदतीवर डॉ. आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ या पाक्षिकाची सुरुवात केली अन् पाहता पाहता या मूकनायकाने शोषणमुक्त जीवन, विषमतामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी पायाभूत संघर्ष पेटविला. मूकनायकच्या रूपाने समाजात प्रबोधनपर्वाची पहाटउजाडत होती व दुसऱ्या बाजूला आपले अपूर्ण राहिलेले उच्चशिक्षण पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांची तगमग सुरू होती. मूकनायक सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांत ते उच्चशिक्षणासाठी विलायतेला रवाना झाले. तोपर्यंत मूकनायकचे १४ अंक निघाले होते व त्यातील १३ अग्रलेखांसह स्फूटलेख त्यांनी स्वत: लिहिले होते. यातून अस्पृश्योद्धाराची दिशा व धोरण अधोरेखित करून मानवमुक्तीच्या लढ्याचे रणशिंग त्यांनी फुंकले होते.

मूकनायकच्या पहिल्या अंकातील अग्रलेखातून ‘मनोगत’ व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब लिहितात, ‘मुंबई ईलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे पाहिले असता, असे दिसून येईल की, त्यामधील बरीचशी पत्रे विशिष्ट जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची त्यांना पर्वा नसते. इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा एवढाच इशारा आहे की, कोणतीही एखादी जात अवनत झाली, तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही एक नौकाच आहे व ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणाºया उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून किंवा त्रेधा कशी उडते, ही गंमत पाहण्यासाठी म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी नाही तर मागाहून का होईना जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने प्रत्यक्ष नव्हे तरी अप्रत्यक्षपणे नुकसान करणाºया जातीचेही नुकसान होणार आहे, यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करण्याचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये.’ विषमतेने ग्रस्त व्यवस्थेच्या डोळ्यात समतेचे असे झणझणीत अंजन घालून सार्वत्रिक सामाजिक न्यायाची बाजू समर्थपणे मांडणारे बाबासाहेबांसारखे लोकपत्रकार शोधूनही सापडणे अवघडच. व्यक्तिस्वातंत्र्यासाठी लढणाºया मुक्ततत्त्ववादी पत्रकारितेचे बाबासाहेब उद्गाते आहेत.

मूकनायक सुरू करण्यामागील भूमिका त्यांनी प्रारंभीच स्पष्ट केली. ते म्हणतात, ‘आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाºया अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खºया स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी भूमीच नाही. सामाजिक न्यायाचे असे अर्थशास्त्र मांडणीचा प्रारंभही हीच पत्रकारिता करते. डॉ. आंबेडकर यांनी मूकनायक पाक्षिक सुरू केले, या ऐतिहासिक घटनेस आज १०० वर्षे पूर्ण होत आहेत. मागासवर्गाची विद्यमान स्थिती पाहता १०० वर्षांपूर्वीचा काळ अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने किती प्रतिकूल आणि कठोर होता, याची कल्पना केसरीसारख्या वर्तमानपत्राने घेतलेल्या कर्मठ भूमिकेतून दिसते. केसरीतून मूकनायकबद्दल दोन शब्द लिहिणे तर सोडाच; पण पैसे घेऊन जाहिरात छापण्याचेसुद्धा नाकारले होते. त्यावेळी टिळक हयात होते. तेव्हा अस्पृश्यांच्या प्रश्नांना वृत्तपत्रातून किती स्थान मिळत असेल?

बाबासाहेबांची पत्रकारिता माणसाला निरंतर क्रांतीशी जोडते. दि. १४ फेब्रुवारीच्या दुसºया अंकात ‘स्वराज्याची सर सुराज्याला नाही’ या अग्रलेखात ते नमूद करतात की, ‘स्वराज्य कोणाचे व ते कशासाठी हे कळल्याखेरीज या तत्त्वाची री आम्ही तरी ओढू शकत नाही. मग कोण ओढील तो ओढो बिचारा!’ त्यांचे हे विचार म्हणजे बहिष्कृतांमध्ये राजकीय समज निर्माण करणारे क्रांतीविधान आहे. अल्पायुषी ठरलेल्या या पत्रातून ज्या विविध विषयांवर, जे विचारमंथन झाले, ते त्या काळातील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जडणघडण समजून घेण्यासाठी आज ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. मूकनायकने दीनदलित व बहिष्कृत, आदिवासी समाजाचे धर्म, जाती, रूढी व परंपरा, अज्ञान, दारिद्र्य, गुलामगिरी व समाज व्यवस्थेचे समग्र चित्रच उभे केले. त्यातून आगामी लढ्याला दिशा मिळाली.

विद्यमान स्थितीत आंबेडकर समजून घेणे आणि संपूर्ण जगालाच आंंबेडकर समजावून सांगणे ही पुढील सर्व युगांचीच गरज आहे. भविष्यातील संभाव्य अरिष्ट तेच निर्देशित करीत आहे. पुढचा भयावह अंधार दूर करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या पत्रकारितेच्या ग्लोबल क्रांतिसिद्धांतांचे ज्ञानायनच सोबत असण्याची गरज आहे. कालचे सारे मुके आज बोलू लागले आहेत. हे मूकनायकाने केलेले बीजारोपणच आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर