शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

निर्बंध स्वीकारण्याची तयारी हवी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 02:27 IST

आपल्याला अटकाव करून प्रशासनाला आसुरी आनंद मिळतोय असा काहींचा गैरसमज झालेला असल्यास नवल नव्हे.

- पाचू मेननप्रदीर्घ काळच्या संचारबंदीनंतर राज्य सरकारने काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याचे ठरवले आणि २० एप्रिल हा गोमंतकियांसाठी अविस्मरणीय दिवस ठरला. गेला महिनाभर काहीही न करता घरी बसून राहिलेला गोवेकर अक्षरक्ष: कंटाळला आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यापासून उद्योजकापर्यंत प्रत्येकाला या संचारबंदीची झळ बसली आहे. आपल्याला अटकाव करून प्रशासनाला आसुरी आनंद मिळतोय असा काहींचा गैरसमज झालेला असल्यास नवल नव्हे. सुरुवातीचे काही दिवस अप्रुपाचे आणि धास्तीचे होते. पण जसजसे हे स्थित्यंतर अंगवळणी पडू लागले तसतसे लोकही सरावले. मग चीडचीड सुरू झाली. एका बाजूने बाहेर पडलो तर कुणी तक्रार करील आणि पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागतील ही भीती तर दुसरीकडे वदंताविरांच्या उपद्व्यापामुळे भयाचे वातावरण. त्यानी तर कोरोनाविषयीच्या अफवा आणि वावड्यांचे पीक मध्यंतरीच्या काळात टिपेला पोहोचले होते. व्यावसायिकही संचारबंदीवर नाराज होते. व्यवहार ठप्प झालेले आणि मालही कुजत पडलेला! जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्था कोलमडलेलीच राहील, असेच जो तो आताही सांगतो आहे.

त्यामुळेच असेल कदाचित २० रोजी किंचित शैथिल्य आल्याचे दिसताच संचाराच्या क्लृप्त्या अर्थातच सुपीक डोक्यातून निघाल्या. मुलबाळाना सोसायटीमध्येच खुल्या जागेत खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले तर मोठ्या माणसानी गटागटाने बसून गप्पा छाटायचा छंद पुनरुज्जीवित केला. एरवी ज्यांचे बूड देखील हलत नसे तेही भ्रमणाच्या लाभांचा साक्षात्कार झाल्यासारखे नियमितपणे फेरफटक्यास निघू लागले. आरोग्याविषयीची ही नवी सजगता आश्चर्यकारक नव्हे तर काय?संचारबंदी शैथिल्याच्या काळात भाजी आणि मासे घेऊन येणाºयाची नित्याराधना झाली नाही तरच नवल. शहरातील सोसायट्यांत तर त्यांची वाट चातकाप्रमाणे पाहिली जायची. हे विक्रेते आले की त्यांच्य मालाच्या सुगंधांत सोशल डिस्टन्सिंगचाही विसर पडायचा. सुपरमार्केट व अन्य मोठ्या आस्थापनानी ग्राहकांकडून अंतर राखले जावे म्हणून व्यवस्था केली खरी, पण माणूस दिसल्यावर त्याला खेटायचे आणि गर्दी करायची ही सवयही आपल्या अंगवळणी पडलेली असल्यामुळे नियमांना तोंडदेखलेपणा आला नाही तरच नवल. एकंदर अविर्भावच असा की संचारबंदी लागू करून प्रशासन आपल्या भ्रमण स्वातंत्र्याचा अक्षम्य संकोच करत आहेत.आपण कधी सुज्ञपणा दाखवणार आहोत? कोरोनाला अटकाव करण्यासाठी जी संघटनशक्ती अपेक्षित आहे ती अशा प्रकारच्या नकारात्मक पवित्र्यातून आपल्याला दाखवायची का? नागरिक म्हणून आपण आपल्या कर्तव्याला जागलो असे मला तरी वाटत नाही.‘विनाशकाले विपरित बुद्धी’ या उक्तीची आठवण करून देणारेच अनेकांचे वर्तन होते.
आता, निर्बंध पुरते हटविलेले नसतानाच जर आपण असे स्वैर वागत असू तर मग संचारबंदी पूर्णत: हटवल्यानंतर आपण काय करू याची कल्पना करूनच अंगावर शहारे येतात. पिंजºयातून निसटलेल्या पक्ष्यांप्रमाणे आकाश कवेत घेण्यास जो तो सुसाट निघेल आणि इतके दिवस घेतलेल्या दक्षतेचे तीनतेरा वाजतील, एवढे निश्चित.जराशी संधी मिळाली आणि मित्रांचा गोतावळा जमला तर माणसे ऊरभेट घेणार नाहीत, पण एकामेकाच्या नको तितकी समीप जात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाना धाब्यावर हमखास बसवतील. संचारबंदी हटवली तर मग कोरोना नामक दैत्याचे पारिपत्त्य आपण एकट्यानेच केल्याच्या अविर्भावात प्रत्येकाचा वारू सुसाट निघेल. विलगीकरण संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक होते, पण आपण विलग राहिलो म्हणून संसर्गापासून कायमस्वरूपी बचावलो, असे थोडेच आहे. त्यातून फार तर सद्यकालीन संसर्ग शृंखला तुटेल व काहीसा दिलासा मिळेल. पण संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहेच. आणि, लॉक डाऊन हटवले म्हणजे विषाणू संपला, असेही नाही. ही ब्याद कायमची नष्ट करायची असेल तर त्यासाठी अजून प्रदीर्घ संशोधनाची आणि आम जनतेकडून यापेक्षाही कठोर व्रताचरणाची आवश्यकता आहे. चुकार वागलो तर आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ. गेला सप्ताहभर दुचाकी आणि चारचाकी वाहनांवरले निर्बंध अंशत: शिथिल केले गेले. तेवढ्यानेही अनेकाना चेव चढला. गोवा पोलिसानी या काळात नियमभंगाच्या तब्बल ५०० प्रकरणांची नोंद केली व चालकाना दंड फर्मावला, आपल्यातल्या अतीउत्साहाचे हे बोलके उदाहरण.पुढील काही दिवसात तर औद्योगिक आस्थापने पूर्ववत सुरू होणार आहेत. कर्मचाऱ्यांची वाहतुक करता यावी तसेच त्याना नियमितपणे व वेळेवर हजर राहाता यावे म्हणून निर्बंध अजून शिथिल करावेत, अशी मागणी उद्योग जगतातून होते आहे. सरकारने परवानग दिली तर कामगार शिस्त पाळतील का? परवाच कुठ्ठाळीच्या नव्या पुलाच्या बाजूने असलेल्या शेतात कापमीसाठी मजूर उतरलेले दिसले. ते सोशल डिस्टन्सिंद पाळत होते, पण गटाने!! असेच कामगारांच्या बाबतीत झाले तर?एक खरे की संचारबंदी फार काळ चालू शकत नाही. अर्थव्यवसथेला पूर्वपदावर यावेच लागेल आणि त्यासाठी आवश्यक ते यत्न आपल्याला करावेच लागतील. आता तर केंद्रीय गृहमंत्रालय दिवसाकाठी काही ना काही घोषणा करत संचारबंदी थोडीथोडी शिथील करते आहे. त्यातून पुन्हा गोंधळ माजतो. शैथिल्य जनतेला हवेय की सरकारला, असा प्रश्नही उठतो.नव्या पिढ्यानी भौतिक सुखांना इतके गृहित धरले आहे की दुसºया बाजूचा विचार करणेही अनेक युवकाना नकोसे वाटते. जीवनक्रम किंचित जरी बदलला तरी कपाळाला आठ्या पडतात. कोरोनाने मात्र या मनोवृत्तीलाही वेसण घातली. अनिच्छेने का होईना, तरुणाईही निर्बंध स्विकारू लागलीय. कोरोनाने भय ही काय चीज असते तेही सळसळत्या रक्ताला दाखवून दिले.ही नवी समज तरुणांच्या ठायी किती दिवस राहील, हा प्रश्न मात्र कायम आहे.(सामाजिक भाष्यकार)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या