शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत आता घोडेस्वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 20:51 IST

मुंबईतील वाढती लोकसंख्या, वाहने, ही दोन कारणे घोडदळ बंद होण्यासाठी पुरेशी होती. असे असताना पुन्हा घोडदळाचा घाट कोणी घातला हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

- विनायक पात्रुडकर

काही वर्षांपूर्वी प्राणी मित्र संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली होती. चौपाट्यांवर व लग्नाच्या वरातीमध्ये वापरल्या जाणाऱ्या घोड्यांवर बंदी आणावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. मुंबईतील वाहतूक कोंडी, घोड्यांची होणारी दुरवस्था, याचे अनेक दाखल न्यायालयात सादर झाले. याची दखल घेत अखेर न्यायालयाने चौपाट्यांवरील व वरातीमधील घोड्यांवर बंदी आणली. याप्रकरणात मुंबई पोलीसदेखील याचिककार्त्यांच्या बाजूने उभे राहिले होते. मुंबईच्या रस्त्यांवर घोडे चालवण्यास मनाई करावी, अशी भूमिका पोलिसांनी न्यायालयात मांडली होती. आता हेच पोलीस दल मुंबईकरांच्या सेवेसाठी घोडदळ घेऊन येणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. इतिहासाच्या पुस्तकात ओझरता उल्लेख मुंबईतील घोडदळाचा आहे. ब्रिटीश काळात १९३२ पर्यंत मुंबई पोलीस दलात घोडदळ होते. पोलीस दलाने हळूहळू कात टाकायला सुरूवात केली आणि घोडदळ हद्दपार झाले. मुंबईतील वाढती लोकसंख्या, वाहने, ही दोन कारणे घोडदळ बंद होण्यासाठी पुरेशी होती. असे असताना पुन्हा घोडदळाचा घाट कोणी घातला हा प्रश्न महत्त्वाचा आहे. घोडदळाचा प्रस्ताव १९९० साली मांडण्यात आला. त्यावर सविस्तर चर्चाही झाली. मुंबईतील वाहतूक कोंडी, वाढती लोकसंख्या हेच दोन मुद्दे प्रामुख्याने चर्चेला आले आणि घोडदळ नको, अशी भूमिका काही सनदी अधिकाऱ्यांनी मांडली. काही अधिकाऱ्यांनी घोडदळाचा हट्ट धरला. त्यासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद करून घेतली. त्यामुळे घोडदळाची खरच गरज होती का? की काही अधिकाऱ्यांची आवड म्हणून हा प्रस्ताव मंजूर झाला, असा प्रश्न पडला तर वावगे ठरणार नाही.ज्या पोलिसांनी वाहतूक कोंडीचे कारण देत मुंबईतील घोडे हद्दपार करा, असे म्हटले होते, तेच आता घोडदळ आणणार आहेत. घोडदळ नेमक्या कोणत्या विभागात कार्यरत असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घोडदळ नुसती गस्त घालणार की आरोपींच्या मागे पण धावणार हा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. घोडदळावर कोट्यवधी रूपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे घोड्यांची काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा करता येईल. मात्र घोडदळ कार्यरत असताना घोड्याला गर्दीचा त्रास झाला किंवा त्याला कोणी त्रास दिला आणि तो सैरभैर झाला तर होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार हे आताच ठरवायला हवे. कारण घोडा सैरभैर होऊ शकतो, अशी शक्यताही काही तज्ज्ञांनी हा प्रस्ताव नाकारताना व्यक्त करताना केली होती. त्यामुळे घोडदळाचे भवितव्य काय असेल हे येणारा काळच ठरवेल. 

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीस