शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चलती रहे जिंदगी

By admin | Updated: December 22, 2016 23:41 IST

आपल्याशिवाय हे जग चालू शकत नाही, असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी एक मौलिक सल्ला - बाबांनो, तुमचे या जगातील स्थान अडगळीपेक्षा

आपल्याशिवाय हे जग चालू शकत नाही, असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी एक मौलिक सल्ला - बाबांनो, तुमचे या जगातील स्थान अडगळीपेक्षा अधिक नाही हे लक्षात घ्या. पूर्वी अडगळीचे सामान ठेवायला एक खोली असायची. आता जागेच्या टंचाईमुळे तीसुद्धा राहिलेली नाही. तुम्ही जर अती करायला लागलात तर एक दिवस लोक तुम्हाला उचलून डायरेक्ट कचऱ्याच्या ट्रकमध्ये भरतील आणि तेथून एखाद्या बेवारस डम्पिंग ग्राउण्डमध्ये नेऊन फेकून देतील. त्यापेक्षा सावध व्हा. आपल्याविना हे जग चालू शकत नाही या भ्रमातून बाहेर पडा. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसण्याचे धंदे बंद करा. पुढे पुढे करण्याचे थांबवा. आपल्या मार्गदर्शनाची लोकाना गरज आहे या गैरसमजातून बाहेर या. जगाची काळजी करत बसू नका. कुणाचा न्याय करण्याच्या फंदात पडू नका. कुणाला सुधारण्याच्या किंवा शहाणे करण्याच्या मागे लागू नका. एखाद्याने हाक मारली तर तिला जरूर प्रतिसाद द्या पण दुसऱ्याच्या पाटावर बसण्याची किंवा त्याच्या ताटावर टिपणी करण्याची उठाठेव करू नका. जगाची काळजी वाहण्यासाठी तो जगन्नियंता समर्थ आहे, ते त्याचे पहिले कर्तव्य आहे आणि ते त्याच्यावरच सोपवण्यात माणसाचा खरा शहाणपणा आहे.मात्र एवढा धडधडीत वेदांत समोर असतानाही माणूस त्यापासून काहीही धडा घेत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो नाना प्रकारच्या उठाठेवी करत बसतो. प्रत्येक बारीक सारीक घटना- प्रसंगावर आपले मत व्यक्त करीत असतो. त्याशिवाय त्या घटनेला पूर्णत्व येऊ शकत नाही असे त्याला वाटते. आपल्याशिवाय गोष्टी सरळ आणि सुरळीत पार पडणार नाहीत अशी जणू त्याला खात्रीच असते. दुसऱ्याला त्याच्या मार्गाने जाऊ देण्याने आपल्या स्वयंभूपणाला कुठेच धक्का लागत नाही हे त्याच्या कधी लक्षात येत नाही. सरळ वाटेपेक्षा वळणदार वाट उलट अधिक सुंदर दिसते, मग वाकड्या वाटा सरळ करण्याचा वेडेपणा कशाला करत बसायचा? पृथ्वीचा आससुद्धा साडेसत्तावीस अंशांनी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीचे काही बिघडते का? काहीच नाही. उलट त्या वाकडेपणामुळे दिवस रात्री होतात. ऋतुंचा सोहळा माणसाला अनुभवायला मिळतो. तेव्हा, डोन्ट वरी, बी हॅपी अ‍ॅण्ड लेट अदर्स आॅल्सो बी हॅपी. जगाची काळजी वाहण्यासाठी तो जगन्नियंता समर्थ आहे. ते काम त्याच्यावर सोपवा व या साक्षात्कारासह आजचा जो दिवस पदरात पडलाय त्याचे सोने करण्याचा प्रयत्न करा. जिन्दगी चलती रहेगी...-प्रल्हाद जाधव