शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची कडू गोळी

By admin | Updated: June 18, 2014 10:02 IST

देशाचे आर्थिक आरोग्य सुधारायचे असेल तर जनतेने कडू गोळी गिळण्याची तयारी ठेवली पाहिजे, असा इशारा देऊ न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'अच्छे दिन' आणण्याच्या वचनाला एक मर्यादा घालून दिली आहे.

देशाचे आर्थिक आरोग्य सुधारायचे असेल तर जनतेने कडू गोळी गिळण्याची तयारी ठेवली पाहिजे, असा इशारा देऊ न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'अच्छे दिन' आणण्याच्या वचनाला एक मर्यादा घालून दिली आहे. देशापुढील आर्थिक आव्हानांना तोंड द्यायचे असेल, तर लोकांना न आवडणारे आणि कठोर असे निर्णय घ्यावे लागतील, यात काही शंकाच नाही. असे निर्णय घेण्याचे टाळल्यामुळे मनमोहनसिंग सरकारला अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणता आली नाही. त्यामुळेच मोदी सरकार आता ही कडू गोळी जनतेच्या गळी कसे उतरवते, हे पाहावे लागेल. अर्थव्यवस्थेला विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल, तर सरकारला केवळ अनावश्यक खर्चाला कात्री लावून भागणार नाही, तर मोठ्या परकी गुंतवणुकीला योग्य असे वातावरण निर्माण करावे लागेल आणि सगळी मेख तिथेच आहे. भारतात पायाभूत क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देताना हा विकास एकट्या सरकारने करावा, अशी अपेक्षा ठेवता येणार नाही. त्यासाठी परकी गुंतवणुकीला आमंत्रित करावे लागणार आहे. जगातल्या अनेक देशांना भारतातील गुंतवणूक फायदेशीर व दीर्घ काळ नफा देणारी वाटते. चीन तर त्यासाठी आतुर आहे; पण ही गुंतवणूक मोफत येणारी नाही. त्याचा परतावा भारतीय जनता कशी करणार, हे ठरवावे लागेल. पायाभूत सेवेच्या कामासाठी जमिनीची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. ही जमीन परवडणाऱ्या भावात मिळवावी लागेल आणि तेथेच खरी अडचण आहे. देशात जमिनीचे भाव अफाट वाढले आहेत. सार्वत्रिक शहरीकरणामुळे अगदी खेड्यापाड्यांतही जमीनमालकांना आपल्या जमिनी या सोन्याच्या खाणी आहेत, असे वाटत आहे. रस्ते, रेल्वे, खाणी, विमानतळ, पायाभूत क्षेत्राला पूरक ठरणारे कारखाने व उद्योग यांसाठी लागणाऱ्या जमिनी अधिग्रहित करणे, हे सरकारपुढचे सर्वांत मोठे आव्हान आहे. या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल हे खरे; पण त्यामुळे कामगारांच्या समस्याही निर्माण होणार आहेत. ज्या परदेशी कंपन्या गुंतवणूक करतील, त्यांना संप, मोर्चे परवडणार नाहीत आणि कामात अडथळे आल्यास कामांचा खर्च अफाट वाढण्याची शक्यता नेहमीच असते. त्यामुळे सरकारला जमीन अधिग्रहणाचे कायदे, कामगार कायदे, सडक, रस्ते यांच्यावर टोल लावण्याचे, विमानतळ, रेल्वे यांच्यावर अधिभार लावून खर्च वसूल करण्याचे नियम व कायदे तयार करावे लागतील. याचा अंतिम भार लोकांवर पडणार आहे; पण दीर्घकाळच्या सुखसोयी हव्या असतील, तर हा भार सहन करण्याची तयारी लोकांना ठेवावी लागेल. यालाच पंतप्रधान मोदी हे ह्यकडू गोळीह्ण म्हणत आहेत. ही कामे करताना पर्यावरणाची होणारी हानी कशी टाळायची, हा एक वादाचा मुद्दा आहे. पण, कोणताही विकास हा पर्यावरणाला धक्का लावल्याशिवाय होणे अवघड आहे. आपल्याला पर्यावरण सांभाळलेच पाहिजे. केवळ सिमेंटची जंगले उभी करून होणाऱ्या भकास विकासाला नक्कीच अर्थ नाही. त्यासाठी संवदेनशील पर्यावरणाचे इलाखे निश्चित करून ते भाग पूर्णपणे संरक्षित करून मग उरलेल्या भागातील पर्यावरणाला धक्का देण्याची तयारी ठेवावी लागेल. विकासकामांत १00 टक्के पर्यावरण संरक्षण शक्य नाही, याचे भान सर्वांनाच ठेवावे लागणार आहे. देशातील काही एनजीओ एकारलेपणे पर्यावरण..पर्यावरण अशी हाकाटी करीत असतात. परदेशी पैशांवर अशी हाकाटी करण्यात त्यांचे काही जात नाही; पण अंतिमत: देशाचा विकास अडतो. देशाच्या काही भागांत मोठ्या प्रमाणात खनिजसंपत्ती आहे. ही संपत्ती काढताना त्या भागातील किती टक्के जंगलांचे संरक्षण करायचे व किती टक्के भागातून खनिजे काढायची, याचे प्रमाण ठरविणे आवश्यक आहे. मागील सरकारने निवडणुकीतील यशावर डोळा ठेवून हे निर्णय घेण्याचे टाळले; पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. लोकांना सर्व काही फुकट हवे आहे, असे नाही. लोकांना विशेषत: तरुण पिढीला विकासाची किंमत द्यावी लागते, हे माहीत आहे. एवढेच नाही, तर आज फुकट मिळणाऱ्या वस्तूसाठी उद्या दुप्पट किंमत मोजावी लागते, याचीही त्याला जाणीव आहे. पण, या सगळ्याचा परिणाम महागाई आणखी वाढण्यात होणार आहे. तिथेच मोदी सरकारची खरी कसोटी लागणार आहे. मोदींनी ‘अच्छे दिन’चे आश्वासन दिले आहे; पण ते तितके सोपे नाही, याचा प्रत्यय लवकरच सर्वांना येईल. सर्व सोंगे आणता येतात; पण पैशाचे सोंग आणता येत नाही. मोदी सरकारचा जनतेबरोबरचा हनिमून आता संपत आला आहे. आता खऱ्या संसाराला सुरवात झाली, की भांड्याला भांडे लागण्यास सुरुवात होईल.