शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

मोदीजी, ड्रग्जची पाळेमुळे तुम्हीच खणू शकाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 01:16 IST

देश वाचवायचा असेल, तर तरुण पिढीला नशेच्या गर्तेेतून वाचवावेच लागेल

विजय दर्डा

पंतप्रधान मोदीजी,

भारताला अमली पदार्थापासून मुक्त करून भावी तरुणांची पिढी वाचवू शकण्याची ताकद आज फक्त आपल्याच हाती आहे. तरुण पिढी वाचेल तर देश वाचेल. नाहीतर देशच नष्ट होईल. हे आवाहन मी थेट आपल्याला उद्देशून करतो आहे, कारण अमली पदार्थांविरुद्ध काम करणारी यंत्रणा केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. दुसरे म्हणजे आपण स्वत: याच्या सक्त विरोधात आहात. कार्यबाहुल्यामुळे या विषयाकडे लक्ष द्यायला आपल्याला कदाचित वेळ नसेल, पण आज हाच सर्वात महत्त्वाचा विषय आहे! आपण ठरवले, तर अमली पदार्थांची पाळेमुळे उखडून फेकू शकता. तेवढी क्षमता आपल्यात आहे. आर्थिक गुन्हे करणाऱ्यांकडे काहीकाळ दुर्लक्ष परवडेल, लाकूड, औषधे, सोने-चांदीची तस्करी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करता येईल, परंतु अमली पदार्थांच्या भारतातल्या प्रसाराकडे दुर्लक्ष आपल्याला परवडणारे नाही. आपले मूल नशेच्या आहारी जाऊन बरबाद व्हावे, हे कोणत्या आईबापाला सहन होईल? जे या नशेच्या आहारी जातात ते नष्ट होतात.

मी महाराष्ट्राचेच उदाहरण देतो. मुंबई, पुणे आणि नागपूर अशी तीन केंद्रे आहेत. मुंबईत मी शिक्षणासाठी होतो तेव्हा कोणत्याही पान सिगारेटच्या दुकानात जर भोले बाबाचे चित्र लावलेले असेल तर लोकांना कळायचे येथे अमली पदार्थ मिळतात. ही झाली १९६८ची गोष्ट! आज हा धंदा खुलेआम पसरत चाललेला दिसतो. हल्ली शाळा कॉलेजजवळ हे पदार्थ सहज मिळतात. पोलीस ठाणे, मुख्यालयाजवळही ड्रग्ज विकले जातात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे राज्य सरकार याकडे कानाडोळा करते. लोक म्हणतात, हे सगळे पोलिसांना माहिती असते. पण मग पोलीस या प्रकाराला आळा का घालू शकत नाहीत?पुणे हे शहर ड्रग्जच्या धंद्याचे मोठे केंद्र झाले आहे. पुण्यात विद्यार्थी मोठ्यासंख्येने आहेत. त्यातले अनेक बाहेरच्या राज्यातून येतात. या तरुणांमध्ये ही नशेची सवय कशी पसरते आहे, यावर लोक उघडपणे बोलतात. नागपूरही छुपा अड्डा बनले आहे. इथे लपून छपून बराच धंदा चालतो. नागपूर ड्रग्जच्या वितरणाचे केंद्र आहे, असे म्हणतात. हे व्यसन इतके जीवघेणे, की ड्रग्ज मिळाले नाहीत तर मुले-मुली बाम चाटतात नाहीतर खोकल्याची औषधे पितात..अमली पदार्थ नियमन ब्यूरो, एनआयएसारख्या संस्थांचे लक्ष नागपूरकडेही आहे म्हणतात, पण या व्यवहारांवर अंकुश ठेवण्यासाठी कोणतीही कडक कारवाई होताना दिसत नाही.

उद्धवजी ठाकरेजी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आपल्याला या गोष्टींची घृणा आहे, हे मी जाणतो; पण महाराष्ट्रात तर हे नशेचे जाळे पसरतच चालले आहे! आतातर परदेशी लोकांनीच मुंबईतला ड्रग्जचा धंदा चालवायला घेतला आहे. करण जोहरकडची असो वा अन्य कुणाची, रेव पार्ट्या समाजमाध्यमांवर झळकतात तेव्हा त्याची चौकशी, कारवाई का होत नाही? अमली पदार्थ जवळ बाळगणे, वाहून नेणे मोठा गुन्हा असताना या लोकांना पकडले का जात नाही? आक्रमक भूमिका घेणाºया कंगना राणावतमुळे हा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर तरी आला म्हणून मी तिचे आभारच मानतो.मुंबईच कशाला टॉलीवूड आणि अन्य ठिकाणच्या सिनेउद्योगातही ही लागण मोठ्या प्रमाणावर आहे. ड्रग्ज सहजपणे उपलब्ध असतात, म्हणून त्यांचे सेवन शक्य होते; हे उघडच आहे. ड्रग्जमुळे पंजाब बरबाद आणि बदनाम झाला खरा; पण ना बिहार मागे आहे ना राजस्थान. दिल्लीतल्या काही श्रीमंत शाळा रेव पार्ट्या आणि ड्रग्जसाठी प्रसिद्ध आहेत. यात अनेक पुढारीही सामील असतात. दिल्लीतल्या फार्म हाउसवर चालणाºया गोष्टी कोणाला माहित नाहीत? पूर्वी लोक नेत्यांना प्रश्न विचारायचे आणि नेते या प्रश्नांना बिचकून असायचे. आता ना कोणी प्रश्न विचारते ना कोणी घाबरते!

भारत ड्रग्जच्या कारभाराचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनला आहे. पाकिस्तान, म्यानमार आणि नेपाळच्या सीमेवरून, मेक्सिकोतून पाठवलेले अमली पदार्थ ब्राझील, आफ्रिका, दुबईमार्गे अरबी समुद्रातून भारतात पोहोचतात. या कारभारात दहशतवादी गट सामील आहेत. ते देशातल्या युवकांना बरबाद करतात आणि हत्यारांसाठी पैसाही जमवतात. ड्रग्ज आणि शस्त्रात्रे विकणाºयांची समांतर सरकारे तर जगभर चालतात. अमेरिकेने यावर पुष्कळसे नियंत्रण मिळवले आहे, पण भारतात आपण या दोहोतली अभद्र युती तोडली नाही तर येणारा काळ बरबादीची भयावह कहाणी सांगणारा असेल! इंटरपोल, अमली पदार्थ विरोधी जागतिक संस्था आणि दहशतवाद विरोधी संस्थांची दरवर्षी बैठक होते. आपले अधिकारीही त्या बैठकात जातात. आंतरराष्ट्रीय मदतीने ‘झिरो टॉलरन्स’ची नीती अवलंबली गेली तर भारतातून ड्रग्जची पाळेमुळे खणून काढता येतील. सिंगापूरमध्ये ड्रग्ज का मिळत नाही?- कारण तेथे हा धंदा करणारा कोणीही असो त्याला फासावर लटकावले जाते. देश वाचवायचा असेल, तर भारतात आपल्याला हाच मार्ग अवलंबावा लागेल. देशातील ड्रग्जच्या धंद्याचा वाढता प्रसार, नशेच्या गर्तेत रुतत चाललेली तरुण पिढी पाहून मी व्यथित आहे. हे असेच चालू राहिले, तर कसे आपण आपल्या मुलाबाळांना या गर्तेतून वाचवणार? - या विचाराने काळजाचा थरकाप होतो. केवळ माझ्याच नव्हे तर देशातील प्रत्येक आईबापाच्या काळजातली ही भीती आहे. मोदीजी, आपणच याबाबतीत ठाम पावले उचलू शकता !(लेखक लोकमत समुहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आहेत ) 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDrugsअमली पदार्थRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती