शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

मोदी, संस्कृत आणि भारताची धर्मनिरपेक्षता

By admin | Updated: October 3, 2015 10:13 IST

आयर्लंडमध्ये प्रधानमंत्री मोदी यांच्या स्वागतासाठी संस्कृत गीत गाणाऱ्या छोट्या मुला-मुलींचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं, परंतु त्यानंतर त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला जे म्हटलं ते अत्यंत तिरकस होतं

डॉ. रुपा कुळकर्णी (संस्कृत भाषेच्या अभ्यासक)आयर्लंडमध्ये प्रधानमंत्री मोदी यांच्या स्वागतासाठी संस्कृत गीत गाणाऱ्या छोट्या मुला-मुलींचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं, परंतु त्यानंतर त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला जे म्हटलं ते अत्यंत तिरकस होतं व तसं बोलण्याची, विशेषत: परदेशात जाऊन बोलण्याची काहीच गरज नव्हती. ते म्हणाले, ‘मेहमानोंका संस्कृत गीत से स्वागत यहा आयर्लंडमेही संभव है. ऐसा स्वागत यदि हिंदुस्थान मे करते तो? तो हमारे सारे धर्मनिरपेक्षतावादी न जाने क्या हंगामा करते. हिंदुस्थान में यह कतई संभव नही.’ भाषणाच्या भरात मग त्यांनी आधीची एक आठवण जागी करताना, अमेरिकेच्या पहिल्या भेटीत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भगवद्गीता दिल्यावर याच लोकांनी (पुरोगामी) आपल्याला धारेवर धरलं होतं, असे सांगितले. मात्र दरवेळी ते भारताचा उल्लेख जाणून बुजून ‘हिंदुस्थान’ असाच करीत होते! जे संस्कृत गीत तिथल्या मुलामुलींनी म्हटलं ते ‘सर्वेऽत्र सुखिन: सन्तु’ हे होतं. ती एक प्रार्थना आहे, प्रत्येकच धर्मात अशी मंगल कामना केली जाते. ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु’ ही पाली भाषेतील प्रार्थनादेखील हुबेहूब संस्कृत सारखीच आहे. भाजपाला एकहाती सत्ता मिळाली तेव्हाच, दोन गोष्टींचं आता महत्त्व वाढणार हे ठरून गेलं होतं. एक म्हणजे देशाचं हिंदुस्थान हे नाव व दुसरं म्हणजे संस्कृत. संस्कृत ही सर्व भारतीय भाषांची जननी असल्याचा चुकीचा प्रचार करून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्या कुळातील साऱ्या परिवाराने हिंदू धर्माशी आणि हिंदुत्वाशी संस्कृत भाषेचा अतूट संबंध जोडून ‘संस्कृत फक्त हिंदूंची’ असा शिक्का मारला आहे. याला बळकटी येण्यास कारणीभूत ठरले आहेत ते हिंदूंचे धर्मग्रंथ. चारही वेद, प्रत्येक वेदाचे ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, उपनिषदे व त्यावरची भाष्ये, तसेच शेकडो पुराणग्रंथ, रामायण व महाभारत ही आर्षमहाकाव्ये, कालिदासादी महाकवींची महाकाव्ये व नाटके आणि मुख्य म्हणजे स्फूट स्वरूपातली देवदेवतांची हजारो संस्कृत स्तोत्रे, यावर हिंदू धर्म आधारित होता व आजही आहे. हिंदूंचं तत्त्वज्ञान, ज्याला ब्राह्मणी धर्मात षड्दर्शने म्हणतात, ती वैदिक दर्शने आहेत. त्यांची सूत्रे व त्यावरील भाष्ये ही समजण्यास दुर्बोध अशा संस्कृत भाषेतच लिहिली आहेत. शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य असे त्या त्या संप्रदायाचे धुरीण आचार्य होऊन गेले ज्यांनी ८ व्या शतकापासून १६ व्या शतकापर्यंत ही प्रचंड संस्कृत भाष्यरचना केली. वास्तविक त्यापूर्वी बौद्ध, जैन व चार्वाक तत्त्वज्ञांनी तत्त्वज्ञानावरील फार महत्त्वाचे ग्रंथ संस्कृतातच लिहिले होते. परंतु ती अवैदिक दर्शने असल्यामुळे आपल्या देशात त्यांची व त्यांच्या श्रमणसंस्कृतीची घोर उपेक्षा करण्यात आली. त्यांना नास्तिक म्हणून बहिष्कृत करण्यात आले व संस्कृत भाषेत ग्रंथरचना करूनही संस्कृतच्या क्षेत्रातून डावलण्यात आले. त्यामुळे धर्मनिरपेक्ष विचारांचा आणि संस्कृतचा संबंध तुटला. खरं तर इतर भारतीय भाषांनाही संस्कृतच्या बरोबरीने संवैधानिक दर्जा मिळालेला आहे. संस्कृत इतक्याच पाली आणि अरेबिक उर्दू देखील अभिजात भाषा आहेत. परंतु संस्कृतची महती वाढविण्यात आली ती त्या भाषेतील प्राचीन ब्राह्मणी धर्मग्रंथांमुळे. धर्मपुस्तकं संस्कृतात नसती तर तिला हे विशेष स्थान या लोकांनी दिलं असतं कां? ‘मंगलं भगवान् विष्णु: मंगलं गरुडध्वज:।मंगलं पुण्डरीकाक्षो मंगलायतनं हरि:।।’यासारख्या श्लोकांच्या मोठमोठ्याने केलेल्या पठणासह केलेले होमहवन पूजा-अर्चा, दान-दक्षिणा, महाप्रसाद यालाच धर्म म्हणतात! परंतु सामान्यांना यात, खोटं का असेना, जे समाधान मिळतं, ते पाहून धर्मनिरपेक्षतेच्या समर्थकांनी या प्रकारांना कधीच विरोध केला नाही. मी तर आमच्या भवन्सच्या शाळेत मुस्लीम, ख्रिश्चन व बौद्ध पालकांना देखील चक्क ‘ओम् सहनाववतु, सह नौ भुनक्तु, सहवीर्यं करवावहै’ हा संस्कृत मंत्र शाळेच्या प्रांगणात हिंदू पालकांसह मोठ्याने म्हणताना पाहिले आहे, ऐकलं आहे. ते कधीही या प्रार्थनेला विरोध करताना दिसले नाहीत. देशपातळीवर व राज्यपातळीवर होणाऱ्या मोठमोठ्या सभा संमेलनांची व परिषदांची उद्घाटने संस्कृत सरस्वती वंदनेने किंवा गणरायाच्या स्तवनानी सर्रास पार पाडताना दिसतात. शाळांच्या गॅदरिंग्स्ची सुरुवातही ‘वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं’ बुद्धिप्रदांं शारदाम्’ अशी संस्कृतातील शारदा स्तवनाने केली जाते. टी.व्ही. वरील शास्त्रीय नृत्याचे सर्वच कार्यक्रम विविध हिंदू देवी-देवतांच्या पौराणिक आख्यानांवरच बेतलेले असतात. इतर धर्मांमधील महापुरुष म्हणजे येशू, मुहम्मद, बुद्ध किंवा झरतृष्ट हे या शास्त्रीय नृत्यांचे विषय होताना माझ्या एकदाही पाहण्यात आले नाहीत. उलट बडे गुलाम अली खाँ साहेबांनी ‘ओम तत् सत्’ हे भजन नागपुरात गाऊन रसिकांची वाहवा मिळविली होती, तर मोहम्मद रफी साहेबांनी ‘मन तडपत हरी दरसन को आज’ हे भजन आपल्या दर्दभऱ्या आवाजात अजरामर केलं आहे.येथील धर्मनिरपेक्षतावाद्यांचा आक्षेप संस्कृत भाषेला नसून संस्कृतच्या ‘सनातनी वृत्ती’ला आहे. धर्मनिरपेक्षतेचे समर्थक त्या कट्टरपंथी विचारसरणीचा निषेध करतात, जी भगवद्गीता या केवळ हिंदूंना वंदनीय असणाऱ्या धर्मग्रंथाला भारताचा राष्ट्रीयग्रंथ म्हणून घोषित करण्याची ‘अनधिकार-चेष्टा’ करते. सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी १९४६ मध्ये लिहिलेल्या व मराठीत भाषांतरित झालेल्या ‘आम्ही’ या पुस्तकात एक गंभीर समज येथील अल्पसंख्यांकांना दिली होती. ती अशी की, या हिंदू राष्ट्रात राहणाऱ्या अन्य सर्व धर्मीय बांधवांनी हिंदूंची विचारसरणी आणि संस्कृती यांचे अनुसरण व स्वीकार केला पाहिजे. अन्यथा त्यांना या राष्ट्रात राहण्याचा हक्क नाही. रा.स्व. संघाच्या प्रमुखांनी ७० वर्षांपूर्वी दिलेली ही चेतावणी सध्याचे सरकार प्रत्यक्षात आणू पाहात आहे, आणि भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर गदा आणू पाहात आहे. अंतर्गत कारस्थाने करीत राहण्याचा संघपरिवाराचा उपद्व्याप सतत चालू असतो. त्याचाच एक दृश्य परिणाम म्हणजे मोदींचे आयर्लंडमधील उद्गार होते. ही सर्व वस्तुस्थिती सामान्य जनतेला कळावी व खरी धर्मनिरपेक्षता लक्षात यावी या हेतूने हे सर्व लिहिले.शेवटी एकच लक्षात घेतलं पाहिजे की ‘भारत’ हे आपल्या देशाचं नाव ‘भरत’ या पराक्रमी चक्रवर्ती सम्राटावरून पडलं आहे. शकुंतला आणि दुष्यंत राजा यांचा तो मुलगा होता. या शब्दाला कोणत्याही विशिष्ट धर्माचा संदर्भ नाही. पूर्वी ‘भारतवर्ष’ म्हणत असत. आज आपण भारत म्हणतो एवढाच काय तो फरक! परंतु हाच शब्द संविधानाने स्वीकारला आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने तो स्वीकारला पाहिजे, आपल्या देशाच्या पंतप्रधानानेसुद्धा!