शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

आधुनिक भगीरथ !

By admin | Updated: April 24, 2017 23:23 IST

काही विशिष्ट गट, समूह, पेशांना विनोद निर्मितीसाठी लक्ष्य करण्याची प्रथा जगभर आहे. काहींना स्वभाव वैशिष्ट्यांसाठी, काहींना वेंधळेपणासाठी

काही विशिष्ट गट, समूह, पेशांना विनोद निर्मितीसाठी लक्ष्य करण्याची प्रथा जगभर आहे. काहींना स्वभाव वैशिष्ट्यांसाठी, काहींना वेंधळेपणासाठी, तर काहींना विसरभोळेपणासाठी लक्ष्य करून, त्यांच्यावर विनोद केले जातात. युरोप-अमेरिकेत ब्लॉँड युवती, भारतात संता-बंता ही काल्पनिक पात्रे विनोद निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. काही पेशांवर तर जगभर सर्वत्र विनोद निर्मिती होत असते. विनोदी चुटकुल्यांमध्ये दर्शविले जातात तसे प्राध्यापक खरोखरच विसरभोळे असतात का, हा संशोधनाचा विषय आहे; पण भारतात अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या उक्तीतून, कृतीतून, राजकीय नेत्यांना विनोद निर्मितीसाठी उगीच लक्ष्य केले जात नसल्याचे सिद्ध केले आहे. त्या मालिकेत आता तामीळनाडूचे सहकार मंत्री सेल्लूर के. राजू यांचेही नाव जोडले गेले आहे. तामीळनाडू यावर्षी भीषण दुष्काळास तोंड देत आहे. गत १४० वर्षातील हा सर्वात भयंकर दुष्काळ असल्याचे सांगण्यात येत आहे. साहजिकच त्या राज्यात पाण्याची बचत करण्यास प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. राजू यांनीही त्यामध्ये आपले योगदान देण्याचे ठरवले. ते पडले राज्याचे मंत्री ! त्यामुळे त्यांचे योगदान सर्वसामान्यांप्रमाणे थातूरमातूर असून कसे चालेल? ते भव्यदिव्यच असायला हवे ! त्यामुळे राजू महाशयांनी मदुराई शहरानजीकच्या वैगेई नामक जलाशयातील पाण्याची बचत करण्याचा विडा उचलला. त्यासाठी त्यांनी खूपच अनोखा मार्ग अवलंबला. जलाशयातील पाण्यावर थर्मोकोल शीटचे आच्छादन घालून बाष्पीभवनाद्वारे होणारी पाण्याची घट थांबवण्याचा घाट त्यांनी घातला. केवळ विचार करूनच ते थांबले नाहीत, तर शनिवारी त्यांनी स्वहस्ते या अनोख्या प्रयोगाच्या अंमलबजावणीसही प्रारंभ केला. त्यासाठी त्यांनी तब्बल दहा लाख रुपये खर्च करून थर्मोकोल शीट विकत घेतल्या आणि त्या चिकटपट्टीद्वारे एकमेकांना चिकटवून जलाशयात सोडल्या; पण हाय रे दैवा! नतद्रष्ट हवेला नाही बघवला ना हा आधुनिक भगीरथ प्रयत्न ! तिने थोड्याच वेळात सर्व शीट्स इतस्तत: भिरकावून दिल्या. अर्थात त्यामुळे आधुनिक भगीरथ अजिबात खट्टू झाला नाही. शीट्सची जाडी कमी असल्यामुळे तसे झाल्याचा निष्कर्ष काढून, आता अधिक जाडीच्या वजनदार शीट्स खरेदी करण्याचा आणि बेत तडीस नेण्याचा मनोदय त्यांनी लगोलग बोलून दाखवला. हवेसारखेच नतद्रष्ट असलेले काही पर्यावरणवादी मात्र राजू यांच्या प्रयोगामुळे पर्यावरणाची हानी होणार असल्याची ओरड करीत आहेत. अर्थात राजू त्यांना दाद देणार नाहीतच! इतिहासात नाव कोरलेल्या सर्वच शास्त्रज्ञांना प्रारंभी हेटाळणीला तोंड द्यावे लागलेच होते. नाही का? मदुराईचे जिल्हाधिकारी के. वीरराघव राव यांची भक्कम साथ लाभली असताना तर राजू यांनी हेटाळणीची पर्वा करण्याचे काही कारणच नाही. राजकीय नेते व जिल्हाधिकाऱ्यांच्या अशा जोड्या देशातील सर्वच जिल्ह्यांना लाभल्या, तर देशाचा कायापालट व्हायला अजिबात वेळ लागायचा नाही!