शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

मनाचिये गुंथी - दु:ख

By admin | Updated: May 1, 2017 01:04 IST

सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे - सगळे संत दु:खाबद्दल बोलतात. म्हणजे सुख एवढंसं पाहिजे असेल तर दु:ख पर्वताएवढं झेलावं लागतं

सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे - सगळे संत दु:खाबद्दल बोलतात. म्हणजे सुख एवढंसं पाहिजे असेल तर दु:ख पर्वताएवढं झेलावं लागतं. म्हणजे पुन्हा दु:खाची मिजास जास्त. ते मोठं असणार आणि ते सोसलं की इवलं सुख मिळणार. पण त्यासाठी कष्ट अपार, यातनाही खूप, वेदनाही भरपूर. ज्याची झोळी वेदनांनी ओथंबून आलेली त्याला सुख कुठेतरी ठिबकताना दिसेल. पण परमेश्वर हुशारच म्हणायला हवा. प्रत्येक दु:खाला तो सुखाची किनार देतो. म्हणजे आपल्या भवतीचं वातावरण तो असं बनवतो, निसर्गदत्त सौंदर्य असं खुलवतो की आपण मोहरतो. काही क्षण तरी आपण दु:ख विसरतो. माणसं सफरीला जातात, जंगलात घुसतात, पशू-पक्षी-प्राणी पाहतात. दूर कठीण पर्वतावर गिर्यारोहण करून वर आल्यावर पाण्याचा झरा दिसतो. हा निसर्गाचा चमत्कार म्हणावा की देवाची किमया. इतकं निर्मळ स्वच्छ सुंदर स्फटिकजल पाहताना मन प्रफुल्ल होतं. उत्तरेच्या टोकावर हिमालय साद घालतो. त्याचे ते अजस्त्र महाकाय रूप क्षणभर भेदरून सोडते पण नंतर तेच आपल्याला कुशीत घेते. आपण म्हणतो ऋषी-मुनी डोंगराच्या गुहेत दिसतात. पण ते कसे जात असतील? कसे राहत असतील? माणूस मर्त्य आहे हे एकदा मान्य केले की सगळे अमर्त्य आपले मित्र होतात. मग अगदी आपल्या अंगणात नाचणारी चिमणीही. फक्त डोळे उघडे ठेवून तिला पाहायला हवं. तिचे रंग पाहायला हवेत. मग घुबडही सुंदर दिसू लागते. त्याचं ते बसकं तोंड, मिचमिचे डोळे बघून आपण त्याला वाईट ठरवतो. परंतु कधी आपण त्याला जवळून निरखलंत तर तो आपला मित्रही होतो. कुत्रा हा तर असा प्राणी आहे की त्याचं कौटुंबिक स्थान हे मुलगा, आई, बाबा, भाऊ ह्यांच्यापेक्षा वरचं आहे. दोन कुत्रे पाळणारे एकत्र आले की त्यांचे संबंध पाहावेत, बोलणे ऐकावे. एक न समजणाऱ्या शब्दात कुत्र्याची जात गर्वाने सांगतो. दुसरा तोंडात बोटं घालून अबब म्हणतो. कित्येकदा अशा मित्रांचे बोलणे ऐकल्यावर त्यांनी कुत्रे पाळले की कुत्र्याने त्यांना पाळलं असा प्रश्न पडतो. त्याचा लगान, आवड, प्रेमळपणा, स्वामिनिष्ठा यांच्या अगाध गोष्टी ऐकायला मिळतात आणि बापरे हे असे असते का? हे म्हणण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही. त्यातून कुत्रं पाळणारी माणसं कुत्र्याचा संबंध चावण्यापलीकडे, इंजेक्शन्स घेण्यापलीकडे नसतो, असं मानणाऱ्या माणसांकडे इतक्या दयार्द्र, केविलवाण्या नजरेने पाहतात की असं वाटतं, त्या नजरेपेक्षा पटकन् पळत जावं आणि कुत्र्याची पपी घ्यावी. तर दु:खावर अजून एक रामबाण उपाय म्हणजे कुत्रे पाळणे. म्हणजे त्याच्याशी गप्पा मारण्यात, पोरं-बाळं होऊ देणं यात आयुष्य बऱ्यापैकी सरते. मग पुस्तक वाचणे, ज्ञान चौफेर करणे, एखादा परभाषेतला मेंदूला झिणझिण्या आणणारा चित्रपट पाहणे, उत्तम भाषण ऐकणे, कविता किंवा गाणे ऐकणे असे (फुटकळ) आनंद आपण शोधत नाही. म्हणजे कुत्रं मेलं म्हणून माझ्याजवळ ढसाढसा रडणारा मित्र आईला वृद्धाश्रमात सहज पोचवतो. वर आईला एक केअरटेकर ठेवलाय, असं अभिमानाने सांगतो त्याला दु:ख कसं सांगावं? कुत्रं जाणे!- किशोर पाठक -