शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

मनोमन

By admin | Updated: July 4, 2016 05:37 IST

मन काय आहे? म्हटलं तर सर्व काही नाही तर काहीच नाही म्हणून ते आकार, रंगहीन असतं म्हणतात.

मनाच्या डोहात । टाकला मी खडाएकही शिंतोडा । उडेचिनामनावर अशी । कोरली पापणीतरी कसे पाणी । वाहेचिनामनावर कशी । दाटू लागे सायतरी कशी माय । दिसेचिनाआता कसे आले । आटलासे डोहतरंगांचे मोह । खुळ्यालागीमन काय आहे? म्हटलं तर सर्व काही नाही तर काहीच नाही म्हणून ते आकार, रंगहीन असतं म्हणतात. ते उचलून दाखविता येत नाही. ते हवेसारखं न दिसता जाणवतही नाही. पण तरी आपण जखमी झालो की मनही जखमी होतं. आपल्याला राग येतो, कंटाळा येतो आणि हे सारं आपण मनापासून होतं, असं म्हणतो. पण मनापासून म्हणजे कुठून? त्याला आदि, मध्य, अंत आहे? सगळेच हवेत हवेमधून बोलत राहाणार. मनाची आकृती काढताना त्यात इद, इगो, सुपरइगो शास्त्रीय पद्धतीने दाखविता येतो. तरीही प्रश्न उरतोच मन म्हणजे काय?मन अथांग, अनावर डोह वरवर प्रगाढ शांत असलेला, परंतु आत प्रचंड खळबळ असलेला. डोह म्हटलं की खोली आली. त्या खोलीत काय काय साठवलंय कळत नाही, पण एक खरं ह्या डोहात उतरावसं वाटतंच. नव्हे नव्हे आपण उतरतोच. डुबकी मारतो. बुडून जातो. त्यात सूर मारावासा वाटतो. कधी कुणाला त्यात सूर गवसतो म्हणतात. मनात, मनापासून, मनावर, मन लागणे, मन उडणे ह्या सगळ्या मनाच्या प्रत्ययांना कृतीचे अर्थ असतीलही, परंतु कोरड्या ठक्क कृतींचा शेवटही अंतिमत: मनाशी येऊन थांबतो. मग तुम्ही मनात खडा टाकला तरी शिंतोडा उडायचा नाही. मनावर पापणी कोरली तरी पाणी वाहणार नाही. मनावर साय दाटून आली तरी माय दिसणार नाही. कारण हा भरगच्च डोह कधी आटतो कळत नाही मग आपण वेडे खुळे ह्या कोरड्या डोहात तरंगांची वाट पाहातो. लाटा उसळण्याची वाट पाहातो आणि उसळण्याच्या आभासात हेलकावत राहतो. हा प्रवास वेडं लागण्यापासून खुळं होण्यापर्यंतचा असतो. म्हणून संत म्हणतात, ‘वेड लागले वेड लागले । ह्या जनासी वेड लागले.’ ह्या वेडाचं मनाकार होत जाण्याचा आरंभबिंदू मनाला आकार देणं हा आहे! मनाच्या खोड्या अगणित. ते असते आणि नसतेही. मानावे तर मन नाही तर जगण्याचे घण. आपण आपल्याला कितीही खरवडले, उगारले, ताडित केले, कुस्करले वा पुकारले तरी मन सतत हुलकावणी देतच राहते. ते लपंडाव खेळते. वाकुल्या दाखवून आधी जखमी करते आणि नंतर फुंकर घालते.मी मनाशी बोलतो म्हणजे कुणाशी? माझ्याशी? माझ्यातल्या तिच्याशी? समाजाशी? स्वत:शी? की परात्पर भावनातीत अस्तित्वाशी? तुम्ही त्याला निर्गुण निराकार म्हणा वा सगुण साकार मन त्यांच्या बेचकीतून बाहेर पडते आणि सतत संत, योगी, कवींपासून विचारवंतांना कोडे बनून राहते. म्हणूनच तर स्वत:ला खोदत बोलत राहायचे मनाबद्दल, मनाशी, मनावर!-किशोर पाठक