शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सोशिकतेचे पुरूषी प्रतीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 7:58 AM

आपल्याकडून इतरांच्या वाढलेल्या अपेक्षा, त्यामुळे झालेली गतिहीन जीवनशैली आणि प्रचंड मानसिक ताण यामुळे शरीरात वाढणा-या एलडीएल कोलेस्ट्रॉलमुळे चाळीशीच्या आत हृदयरुग्ण होण्याºया पुरूषांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय.

- निशांत सरदेसाईआपल्याकडून इतरांच्या वाढलेल्या अपेक्षा, त्यामुळे झालेली गतिहीन जीवनशैली आणि प्रचंड मानसिक ताण यामुळे शरीरात वाढणाºया एलडीएल कोलेस्ट्रॉलमुळे चाळीशीच्या आत हृदयरुग्ण होण्या-या पुरूषांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय.आजकाल कोणताही साजरा होणारा दिन आला की, सर्वात जास्त चर्चा होते ती सोशल मीडियावर. शुभेच्छा, सहानुभूतीपासून सुरू होणारे संदेश तत्त्वज्ञानापर्यंत येऊन ठेपतात. त्यात अनेक जण तत्त्वज्ञही होऊन जातात. मात्र, आज असणाºया ‘पुरुष दिना’ची सोशल मीडियावर किती चर्चा होईल? एकंदरीतच जितके महत्त्व पुरुष दिनाला दिले पाहिजे होते, तितके महत्त्व या दिवसाला मिळालेले नाही. जगाच्या कोणत्याही कानाकोप-यात इतिहास काळापासून आजपर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीला बहुतेक वेळा दुय्यम स्थानच मिळत राहिले आहे. काळाच्या ओघात विश्वामध्ये राहणीमानापासून ते मानसिकतेपर्यंत सर्वच गोष्टींत बदल होत गेले. एके काळी कठोर, निर्दयी, हेकेखोर अशी रंगविलेली आणि बहुतेक वेळा असणारीसुद्धा पुरुषांची प्रतिमा आज बदललीय. खलनायकाच्या भूमिकेतला पुरुष आज सामाजिक झालाय, समजूतदार झालाय आणि बहुतेक वेळा तो स्त्री पेक्षाही हळवा झालाय. आज कोणत्याही क्षेत्रात स्त्री-पुरुष असा काहीच भेदभाव राहिला नाहीये आणि हा बदल पुरुष जमातीने सकारात्मक स्वीकारला आहे. बºयाच वेळा तो भरारी घेण्यासाठी स्त्रीला पाठिंबा देतानाही दिसतो.पुरुषी मानसिकतेत झालेले बदल हे असे अचानक झाले असतील? तर उत्तर आहे ‘नाही’. नैसर्गिकपणे थोडीशी अहंकारी आणि वर्चस्व गाजविण्याची मानसिकता हळूहळू कमी होते आहे आणि संयमी, हळवेपणा वाढीला लागतोय. स्त्रीवर अन्याय झाला, तर समाज पेटून उठतो, ते स्वाभाविक आहे, पण एखाद्या स्त्रीकडून पुरुषावर अन्याय झाला, तर तो सहन करण्याचा पर्याय पुरुष निवडतो. समाज दुबळा म्हणण्याची भीती त्याला सतावत असते. एखाद्या घटनेनंतर स्त्री रडून मोकळी होऊ शकते, पण पुरुषाच्या डोळ्यात पाणी म्हणजे दुबळेपणाचे लक्षण हेच आजपर्यंत आपण मानत आलोय.आज स्त्री सर्व क्षेत्रात बरोबरीने काम करते, पण समाज जबाबदारी आणि कर्तव्याचा विषय आला की, पुरुषाकडे बोट दाखवितो. आजच्या धकाधकीच्या जीवनातही तो आपली कर्तव्ये कसोशीने पार पाडायचा प्रामाणिक प्रयत्नही करतो. कधी कमीही पडतो, तेव्हा प्रकट केली नाही, तरी समजून घेण्याची अपेक्षाही उराशी बाळगतो. मुलगा, भाऊ, नवरा, वडील यासारखे असंख्य रोल करताना बºयाच वेळेला त्याचा घाण्याला जुंपलेला बैल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. संकटात कणखरपणे उभा असणारा आजचा पुरुष हळव्या मनाचा आहे. त्याला त्याचे हळवेपण जगासमोर आणताही येत नाही आणि समाजात, कुटुंबात याचा फारसा विचारही होत नाही. एखाद्या दु:खद घटनेत कुटुंबाचे अश्रू पुसताना स्वत:चे अश्रू मात्र त्याला आतल्या आत गिळावे लागतात. अशा असंख्य गोष्टी मनामध्ये दाबूून ठेऊन येणाºया भविष्याला त्याला हसत समोर जायचे असते. परिणामी, हृदयरोग तज्ज्ञाकडे पुरुषांचीच संख्या जास्त असते. इतरांच्या वाढलेल्या अपेक्षा, त्यामुळे झालेली गतिहीन जीवनशैली आणि प्रचंड मानसिक ताण यामुळे शरीरात वाढणाºया एलडीएल कोलेस्ट्रॉल मुळे चाळीशीच्या आत हृदयरुग्ण होण्याºयांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. विमा दाव्यासाठी येणाºया प्रकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार हृदयविकाराने मृत्यू झालेल्या दाव्यांची संख्या ही गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी १६ टक्क्यांनी वाढलेली आहे.आपल्या पश्चात कुटुंबाची आर्थिक ओढाताण होऊ नये, ही विवंचना त्याला सतत सतावत असते. कुटुंबासाठी आयुष्याच्या शिदोरीची सोय करताना, अनेक आनंदाच्या क्षणांना त्याला मुकावे लागते. वर्षातले ३६३ दिवस हे स्त्री-पुरुष समानतेचे असावेत. ८ मार्च हा एक दिवस फक्त महिलांचा म्हणून जसा जोरदार साजरा होतो, तसा १९ नोव्हेंबर हा एक दिवस पुरुषांचा म्हणून तितकाच जोरदार साजरा व्हावा, ही माफक अपेक्षा.