शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय उपचार : दवा, दुवा की बुवा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:35 IST

‘जब दवा काम नही करती तब दुवा काम आती है...’ असं म्हटलं जातं. पण ही दवा-दुवा सोडून डॉक्टरने गंभीर महिला रुग्णावर ‘उपचारां’साठी चक्क एका मांत्रिक बुवाला बोलावले.

- विजय बाविस्कर‘जब दवा काम नही करती तब दुवा काम आती है...’ असं म्हटलं जातं. पण ही दवा-दुवा सोडून डॉक्टरने गंभीर महिला रुग्णावर ‘उपचारां’साठी चक्क एका मांत्रिक बुवाला बोलावले. हा धक्कादायक प्रकार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात घडला. मात्र, अत्यवस्थ रुग्ण संध्या सोनवणे यांचा मृत्यू झाला.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जादूटोणा-बुवाबाजीविरुद्ध आपलं आयुष्य वेचून अखेर ज्या पुण्यात बलिदानही दिलं, त्याच पुण्यात असं घडावं, हे अत्यंत दुर्दैवी आहे. डॉ. दाभोलकरांनी ज्याची मागणी लावून धरली होती, तो जादूटोणाविरोधी कायदा त्यांच्या हत्येनंतर अस्तित्वात आला. त्याच कायद्यान्वये संबंधित मांत्रिक आणि त्याच्याकरवी उपचार करवून घेणारा डॉ. सतीश चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दीनानाथ रुग्णालयाने हा प्रकार परवानगीशिवाय चोरून झाल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हे काहीही असले तरी त्या महिलेचे प्राण मात्र परत येणार नाहीत, हे दुर्दैवी सत्य आहे.वैद्यकशास्त्र प्रगत झाले आहे. त्यामुळे माणसाचे सरासरी आयुष्य वाढले आहे. हे जरी सत्य असले तरी या शास्त्रालाही काही मर्यादा आहेतच. अशा वेळी ईश्वरी शक्तीवर विश्वास असणारे त्याची प्रार्थना-उपासना करतात. हा ज्याच्या-त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. त्यासाठीच मोठमोठ्या रुग्णालयांमध्येही देव-देवता अन् गुरुदेवांची मंदिरे, प्रार्थनास्थळे उभारली जातात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा धूसर आहे, हेही खरे आहे. मात्र, रुग्ण आणि त्याच्या नातलगांऐवजी एका डॉक्टरनेच आपले वैद्यकीय ज्ञान-कौशल्य बाजूला ठेवून मांत्रिकाला बोलावून त्याच्याकरवी हळद-कुंकू, बुक्का-फुले वाहत मंत्रोच्चार करवून ‘उपचार’ करणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. वैद्यकीय क्षेत्रही विज्ञानाचे अंग आहे. हे क्षेत्रही आपल्या चुका, मर्यादा मान्य करून त्यावर मात करण्यासाठी अथक प्रयत्न करत असते. त्यामुळे नवनवीन संशोधन केले जाते. रामबाण ठरणारी औषधे, अत्याधुनिक अचूक शल्यचिकित्सा तंत्रे विकसित होत असतात. मात्र, मांत्रिक, तांत्रिक, तथाकथित ईश्वरी अंश असलेले बाबा-महाराज अशा दुर्घटना घडल्यास त्याचे अपश्रेय सदैव टाळतच असतात. संबंधितांचे पाप-पुण्य, ईश्वरी इच्छा असल्या सबबी सांगत ते आपली जबाबदारी झटकत असतात. तरीही अशा तांत्रिक-मांत्रिकांकडे जाणाऱ्या अंध भक्तांची संख्या लक्षणीय आहे. हा प्रभाव फक्त ग्रामीण, आदिवासी भागापुरता मर्यादित नाही तर मुंबई-पुण्यासारख्या विकसित शहरांतही हे लोण पसरलेले आहे. बंगाली बाबा, काळी जादू, गुप्तधनाच्या शोधासाठी नरबळी, अल्पवयीनांवर अत्याचार हे सर्व प्रकार पुरोगामी म्हणवल्या जाणाºया आपल्या राज्यात अद्यापही सुरू आहेत.दुर्दैवाने अशिक्षितांसह काही फक्त सुशिक्षित नव्हे तर उच्चशिक्षितही अशा अंधश्रद्धांना खतपाणी घालतात, हे या घटनेवरून दिसून येते. मृत रुग्णाच्या नातलगांनी केलेल्या आरोपानुसार डॉ. चव्हाण महाशय पंचांग पाहून मुहूर्तावर शस्त्रक्रिया करत असतात. या मुहूर्ताच्या नादात त्यांनी संध्या यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यास विलंब केल्याने अतिरक्तस्राव झाल्याने त्यांना ‘दीनानाथ’मध्ये हलवावे लागले, असाही आरोप आहे. या प्रकाराला श्रद्धा कसे म्हणावे? ही नक्कीच अंधश्रद्धा आहे. लौकिक जगापेक्षा पारलौकिक जगावर विश्वास असणारा डॉक्टर रुग्णांवर अशा पद्धतीने उपचार करतो, तेव्हा हा प्रकार धक्कादायक असतो. अशा प्रवृत्तींविरुद्ध गंभीर कारवाई करावीच लागेल.