शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भौतिकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 00:03 IST

जर एखाद्या माणसानं त्याच्या परमोच्च प्रकृतीपर्यंत पोहोचण्याची इच्छा बाळगली नाही, जर त्यानं केवळ एक हाडामांसाचा तुकडा म्हणूनच जगण्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न केला, तर हे सर्वांत निकृष्ट दर्जाचं अस्तित्व आहे.

- जग्गी वासुदेवजर एखाद्या माणसानं त्याच्या परमोच्च प्रकृतीपर्यंत पोहोचण्याची इच्छा बाळगली नाही, जर त्यानं केवळ एक हाडामांसाचा तुकडा म्हणूनच जगण्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न केला, तर हे सर्वांत निकृष्ट दर्जाचं अस्तित्व आहे. आपण का आणि कशासाठी जगतो, याचा विचार कुणीच करताना दिसत नाही. आपल्या जगण्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न कुणालाच पडल्याचं दिसत नाही. केवळ जन्माला आलो म्हणून जगायचं, अशी धारणा प्रत्येकाच्या ठायी दिसून येते. विशेष म्हणजे या प्रकारचं अस्तित्व आजकाल जगात रूढ होत चाललं आहे. आजचा आधुनिक माणूस किंवा ज्याला ‘मॉडर्न’ म्हटलं जातं, ते केवळ याबद्दलच आहे. एखाद्यामध्ये भीती, हाव, राग, चिंता, लाचारी अशा अनेक प्रकारच्या गोष्टी असतील, पण तरी जोपर्यंत तो त्याच्या भौतिक अस्तित्वापलीकडे काहीतरी शोधत असेल, तोपर्यंत त्याच्यासाठी एक मार्ग आहे. पण जर कुणी स्वत:ला केवळ स्वत:च्या भौतिक प्रकृतीलाच वाहून घेतलं, तर त्यासाठी कुठलाही मार्ग नाही. अशा मनुष्याची मती कुंठित झाल्यासारखीच असते. या जगण्याला मथितार्थ नसतो. मग जगायचं तरी का आणि नेमकं कशासाठी, हा प्रश्न उरतोच. हा प्रश्न प्रत्येकाला पडणं ही भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे जाण्याची पहिली पायरी आहे. पण येथूनच या विचारमंथनाच्या प्रवासाला सुरुवात होते. हा प्रवास मोठा आहे तो वैचारिकदृष्ट्या. म्हटलं तर ही विचारयात्रा तशी मोठी आहे. पण ही पहिली पायरी पार करून पुढील विचारयात्रा सुरू होते तेव्हा तो भौतिकतेच्या पलीकडे खऱ्या अर्थाने पाहायच्या अवस्थेसाठी पूर्णपणे तयार झालेला असतो. ही एक उल्लेखनीय अवस्था आहे. जेव्हा एखादा माणूस विचार करू लागतो की, ‘‘मीच सर्वकाही आहे; आणि माझ्याशिवाय दुसरं काही असू शकत नाही. मला सर्वकाही माहीत आहे आणि मला माहीत नाही असं काही असू शकत नाही.’’ ही मानवी अवस्थांमधली सर्वांत भयावह अवस्था आहे. जेव्हा त्याला जाणवू लागतं की स्वत:हून अधिक असं काहीतरी आहे, हे आध्यात्मिक प्रक्रियेचं पाहिलं पाऊल आहे. जेव्हा एखाद्याला जाणवू लागतं की, ‘‘मी आत्ता जसा आहे ते पुरेसं नाहीये, अजून काहीतरी आहे. माझं अस्तित्वच सर्वकाही नाहीये.’’ याचा अर्थ त्याच्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात झाली.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या