शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

काकांचं ‘मॅच फिक्सिंग’

By सचिन जवळकोटे | Updated: April 12, 2018 08:14 IST

घरोघरी ‘आयपीएल’चा ‘टीआरपी’ वाढू लागला, तसे सारे नेते एकत्र आले. ‘मी थेट कमळवाल्या शमो जोडीवर टीका केली तरीही मीडियामध्ये म्हणावा तसा स्पेस मिळेनासा झालाय,’ उद्धोंनी खंत व्यक्त केली.

-सचिन जवळकोटेघरोघरी ‘आयपीएल’चा ‘टीआरपी’ वाढू लागला, तसे सारे नेते एकत्र आले. ‘मी थेट कमळवाल्या शमो जोडीवर टीका केली तरीही मीडियामध्ये म्हणावा तसा स्पेस मिळेनासा झालाय,’ उद्धोंनी खंत व्यक्त केली. थोरले काका बारामतीकरांनीही री ओढली, ‘मी तर एकच वाक्य तब्बल पाचवेळा आलटून-पालटून वापरलं, तरीही कुठं चर्चा नाही.’‘टेन्शन कायकू लेनेका? हम भी आयपीएल खेलेंगे. मतलब इंडियन पॉलिटिक्स लीग,’ ब्रेकिंग न्यूज क्रिएट करण्यात माहीर असलेल्या किरीटभार्इंनी सुचवलेली कल्पना सर्वांनाच आवडली. मग काय... सारे लागले कामाला. ‘बी’ टीमची कॅप्टनशिप आपसूकच देवेंद्रपंतांकडं आली. ‘बी’ म्हणजे त्यांच्या पार्टीचं आद्याक्षर. गैरसमज नसावा. ‘आर’ टीमचं नेतृत्व अजितदादांनी स्वीकारलं. ‘हात’वाले त्यांच्याच टीममध्ये सामील झाले. पंतांच्या टीममध्ये सामील व्हावं की त्यांच्या विरोधात खेळावं, याचा निर्णय काही शेवटपर्यंत ‘उद्धों’ना घेता आलाच नाही. ‘राज’ मात्र स्टेडियमच्या ‘एसी केबीन’मध्ये बसून म्हणाले, ‘मी फक्त कॉमेंट्री करणार, आपल्याला उन्हा-तान्हाची सवय नाही,’ तेव्हा आशिषभाऊंनी टोला हाणलाच, ‘कधीतरी मैदानात उतरा. किती दिवस फक्त कॉमेंटच करणार?’पंच म्हणून थोरल्या काकांनी नाणेफेक केली. अजितदादांनी फलदांजी स्वीकारली. सुरुवातीला धनंजय दादांनी फुल्ल बॅटिंग केली. जयंतरावांनी मात्र फक्त पीचवर टिकून राहण्याची सावध खेळी केली, कारण समोरच्या टीममधल्या अनेकांशी त्यांची आतून जवळीक. कुणाला दुखवायला नको ना...अशोकरावांनीही ‘आदर्श’ धावसंख्या रचली. शेवटच्या टप्प्यात अजितदादा अन् पृथ्वीबाबा ही जोडी उरली. बाबांनी जोरदार चौकार अन् षटकार मारले. तसं दादा अस्वस्थ झाले. ‘तुम्ही बाबांना आऊट केलं नाही तर मैदानातील माझा होल्ड कमी होईल,’ असं ते चंद्रकांतदादांच्या कानात कुजबुजले. तेव्हा काकांनी खुणावलं, ‘आपल्याच पार्टनरला खपविण्याच्या नादात अख्खी मॅच पुन्हा एकदा हातातून घालवू नका.’चांगले रन उभारून दादांची टीम बॉलिंगला उतरली. इकडून सुभाष बापू अन् गिरीशपंत ओपनिंगला आले. झटपट रन काढण्यावरच त्यांनी भर दिला, कारण कोणतंही काम ‘शॉर्टकट’मध्ये करण्यात दोघांचाही हातखंडा. बापू जड जाऊ लागले तसं सुशीलकुमारांनी त्यांच्याच टीममधल्या देशमुख मालकांकडून ‘टीप’ घेऊन बापूंना क्लीनबोल्ड केलं. याचा सर्वाधिक आनंद उलट चंद्रकांत दादांना झाला. बारावीचा पेपर तपासावा तसं टुकूटुकू खेळण्यात विनोदभाऊंनी विनाकारण ओव्हरं घालविली.मात्र, इतरांच्या सोबतीनं देवेंद्रपंतांनी पल्ला गाठलाच. दोन्ही टीमची धावसंख्या समान झाली. ‘मॅच टाय करण्यापेक्षा रनरेटवर कुणाला तरी एकाला विजयी घोषित करा,’ असा हट्ट दोन्ही टीमच्या मंडळींनी धरताच थोरले काका बारामतीकर कोपऱ्यात जाऊन ‘राहुल बाबा अन् नमोभार्इं’शी गुफ्तगू करू लागले. स्टेडियममधले बिच्चारे प्रेक्षकही श्वास रोखून काकांच्या निर्णयाची वाट पाहू लागले. पण बिच्चाºयांना कुठं माहीत होतं की थोरल्या काकांनी ही मॅच नेहमीप्रमाणं अगोदरच फिक्स करून ठेवली होती.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार