शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - स्वमग्नता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 00:15 IST

आपण माणूस आहोत. माणसाचे सगळे गुणधर्म आपल्यात आहेत. म्हणजे आपण खूप चांगले आणि वाईटही असतो. सध्या मोबाईलमधील ते

- किशोर पाठक आपण माणूस आहोत. माणसाचे सगळे गुणधर्म आपल्यात आहेत. म्हणजे आपण खूप चांगले आणि वाईटही असतो. सध्या मोबाईलमधील ते व्हॉट््सप ग्रुप बोकाळलेत. काही त्याला नावं ठेवतात. काही न बोलता ग्रुपमध्ये सामील होतात. काही नावं ठेवत ठेवत कॉमेंट करतात. पण प्रत्येकाला हजेरी लावावी वाटते. म्हणजे मी आहे बुवा, जिवंत आहे हे सांगायला सगळे असतात. काहींना स्वत:चे मेसेज, जोक्स सांगावे वाटतात. काहींना दुसऱ्यांचे उतारेच्या उतारे द्यावे वाटतात. कवितांचा तर सुकाळच म्हणावा. एवढे कवी जन्मतात, मिरवतात, विझतात, पण उत्साह कमी होत नाही. काहींना स्क्रीन बघून बघून डोळ्यांचे विकार होतात. त्याला दूर जावे वाटते. हे वाटते खरे पण आपण अ‍ॅनिमिक झालेय. मोबअ‍ॅनिमिया नावाचा नवा आजार फैलावतोय. मग एकदा लाखो माणसं वापरताहेत म्हटल्यावर त्याचा व्यापार आला. हायजॅक करणं आलं. हँग होणं आलं. एकवेळ फासावर टांगा, पण मोबाईल चालू हवा. आपण त्या वाचून जगू शकत नाही. केवढा प्रचंड व्यवहार चालतो यात. हजारो कंपन्या, त्यांचे ब्रँड, जाहिराती सकाळचा मोबाईल दुपारी शिळा. २जी, ३जी, ४जी अजून किती जी होतील कठीण आहे. यात हजारो तरुणांना रोजगार मिळतो. स्क्रीनवर दु:ख, सुख, हास्य, गंभीर, बातम्या, गाणी, शेरोशायरीचा तर धुडगूस साऱ्या भावना नीट पोहोचतात. एक नक्की जग जवळ आलं, प्रगत झालं. पूर्वी परदेशात गेलेल्या मुलाला ठराविक वेळी, फोनजवळ बसून कमी वेळ बोलावं लागायचं. त्यात बाबा दरडावायचे, आई दृष्ट काढायची, ताई हट्ट करायची, पण हे सारं तेवढ्याच वेळात. मग फोन ठेवताच घरातच तू-तू-मैं-मैं. मला हे बोलायचं होतं राहून गेलं. माणसाला राहून गेल्याची चुटपुट जे केलं त्यापेक्षा जास्त लागते. म्हणजे अलीकडे तर ९८ टक्के मार्क मिळाले तर आईबाबा दोन टक्के कुठे गेले विचार करीत बसतात. म्हणून मोबाईल हे अस्त्र आहे ते द्या कुणाच्या हातात. ते शस्त्र होतं. मग स्क्रीनवर मेसेज सुरू. हे करू नका, ती साईट ओपन करू नका. आपण ज्ञानवृद्धीसाठी त्याचा किती वापर करतो ते महत्त्वाचे. पण माणूस आपल्या मूडप्रमाणे मोबाईल खेळवतो, मला खेळ हवा खेळ. मला गाणं हवं गाणं पण, आताशा मोबाईल खेळवतो आपल्याला. तो बंद स्क्रीन आपल्याला वाकुल्या दाखवतो. सलग दहा मिनिटं मी मोबाईल पाहिला नाही म्हणजे भयंकर गुन्हा झालाय, असा चेहरा होतो. एक विलक्षण स्वमग्नता आलीय या हत्याराने. माणूस एकटा कुणाशीही न बोलता स्क्रीनवर असतो. तो हळूहळू एकांतवासी होतोय, पण त्याला हे माहीत नाही तो स्क्रीनवरल्या कल्लोळात एकटा एकाकी होत चाललाय. तो इतरांना हाक मारताना स्वत:ला बोलवत नाही, ऐकत नाही हे वाईटच म्हणावे की चांगले, चला धावा नवा अ‍ॅप आलाय!