शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपिता महात्मा गांधींचे कानात शिसे ओतणारे भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 05:25 IST

गांधींचे हे भाषण इंग्रजीत झाले. त्यावेळी त्यांना हिंदी बोलता येत नव्हते. त्याबद्दल त्यांनी प्रथम दिलगिरी व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्य, स्वराज्य याबद्दल आपली मते ठासून मांडणी केली.

- जयंत दिवाण

पंडित मदनमोहन मालवीय यांनी बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीची स्थापना केली होती. या यूनिव्हर्सिटीच्या शिलान्यासाच्या कार्यक्रमात त्यावेळी गांधींचे भाषणही झाले होते. हे भाषण म्हणजे भारतीय राजकारणातील त्यांचे ‘पहिले पाऊल’ म्हणविले जाते. या यूनिव्हर्सिटीच्या शिलान्यासासाठी स्वत: व्हाईसरॉय उपस्थित होते. वेगवेगळ्या प्रांताचे गव्हर्नर, लेफ्टनंट गव्हर्नरही त्यावेळी उपस्थित होते. संस्थानांचे राजे, रजवाडे रंगबिरंगी पोशाख व दागदागिने घालून या कार्यक्रमासाठी आले होते. भारतातील प्रसिध्द नेतेही उपस्थित होते. डोळ्यांचे पारणे फिटावे असा भव्य मंडप या कार्यक्रमासाठी घालण्यात आला होता. संपूर्ण कार्यक्रमाला जणू दरबाराचे स्वरुप आले होते.गांधींचे हे भाषण इंग्रजीत झाले. त्यावेळी त्यांना हिंदी बोलता येत नव्हते. त्याबद्दल त्यांनी प्रथम दिलगिरी व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्य, स्वराज्य याबद्दल आपली मते ठासून मांडणी केली. स्वराज्याला त्यांनी मातृभाषेशी जोडले. गेली ५० वर्षे जर देशी भाषेतून शिक्षण झाले असते, तर गरीबातील गरीब माणूस स्वातंत्र्याच्या चळवळीशी जोडला जाऊन भारत कधीच स्वतंत्र झाला असता, असे मत त्यांनी यावेळी मांडले. केवळ ठराव करुन किंवा भाषण करुन स्वराज्य मिळणार नाही, असे सांगताना त्यांनी बनारसमधील मंदीरांच्या परिसरातील गलिच्छपणाचा उल्लेख केला. जेथे आपली मंदिरे गलिच्छ असतीलतेथे आपले स्वराज्य कसे असेल याकडे त्यांनी उपस्थित श्रोत्यांचे लक्ष वेधले. गांधींनी आपल्या भाषणात राजे रजवाड्यांची चांगलीच कान उघाडणी केली. लोक कंगाल असताना जवाहिरांचे प्रदर्शन शोभेसाठी करु नका, असे ते म्हणाले. त्यांनी ठासून सांगितले की, स्वातंत्र्य शेतकऱ्यांमार्फतच येईल. त्यांचे भाषण जसजसे रंगू लागले, तस तसे मंचावरील अ‍ॅनी बेझंट वगैरे मंडळी धुसफूसू लागली. कडेलोट झाला तेव्हा गांधी म्हणाले, ‘मला जर असे आढळून आले की भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांनी येथून निघून गेले पाहिजे, तर त्यांना चलेजाव म्हणण्यास मी कचरणार नाही.’ सभास्थानी बसलेल्यांची सहनशीलता संपली. बेझंट बाई उठून गेल्या, राजे रजवाडे निघून गेले. त्यांना असे वाटले की, या माणसामुळे आपल्यावर राजद्रोहाचा गुन्हा तर लागणार नाही ना! मंचावर कोणीच उरले नसल्याने सभा आपोआपच विसर्जित झाली.या भाषणामुळे वर्तमानपत्रांमध्ये जो वाद-विवाद सुरु झाला, त्यामुळे वाचकांचे लक्ष गांधींकडे वेधले. बेझंट बाईंनी जाहिर केले की, गांधी संतदृष्टीने कितीही मोठे असले तरी राजकारणाच्या दृष्टीने अर्भकच आहेत. परंतु गांधींच्या रुपाने काही तरी एक नवीन तत्वज्ञान हिंदुस्थानात येत आहे, अशी चर्चा सामान्य सुशिक्षित लोकांमध्ये या निमित्ताने सुरु झाली. गांधी चर्चेचा विषय ठरले.(लेखक गांधीवादी, सर्वाेदयी कार्यकर्ते आहेत.)