शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठेचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 12:37 IST

- मिलिंद कुलकर्णीराजकारण बेभरवशाचे आहे, हे आपण मान्य केले आहेच. पण निष्ठेचा चक्क बाजार मांडला जाईल, हे मात्र अपेक्षित नव्हते. भाजपासारख्या साधनशुचितेचा कायम आग्रह धरणाऱ्या पक्षाने तर कमरेचे काढून डोक्याला गुंडाळायचे तेवढे बाकी ठेवले आहे. विशेष म्हणजे भाजपाचे मंत्री या गोष्टींचे उघडपणे समर्थन करतात, यापेक्षा लोकशाहीचे दुर्देव ते कोणते. विजयासाठी ...

- मिलिंद कुलकर्णीराजकारण बेभरवशाचे आहे, हे आपण मान्य केले आहेच. पण निष्ठेचा चक्क बाजार मांडला जाईल, हे मात्र अपेक्षित नव्हते. भाजपासारख्या साधनशुचितेचा कायम आग्रह धरणाऱ्या पक्षाने तर कमरेचे काढून डोक्याला गुंडाळायचे तेवढे बाकी ठेवले आहे. विशेष म्हणजे भाजपाचे मंत्री या गोष्टींचे उघडपणे समर्थन करतात, यापेक्षा लोकशाहीचे दुर्देव ते कोणते. विजयासाठी व्यावहारिक तडजोड करावी लागते या संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांचे जळगावातील वक्तव्य गाजले होते. त्याची परिणती जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत लगेच आली. २०१३ मध्ये महापालिका तर २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाविरुध्द उमेदवारी लढविणारे आणि महापालिकेत पाच वर्षे खान्देश विकास आघाडीला सहकार्य करणाºया विद्यमान महापौर ललित कोल्हे यांना भाजपाने पावन करुन घेतले. मूळ भाजपाचेच परंतु २००८ मध्ये शहर विकास आघाडी आणि २०१४ मध्ये खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाविरोधी राजकारण करणाºया कैलास सोनवणे यांनाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपामध्ये प्रवेश देऊन उपकृत केले. कोल्हे आणि सोनवणे हे राजकारणातील चाणाक्ष कार्यकर्ते आहेत. हवेची दिशा ओळखून ते भूमिका ठरवत असतात. दोघांनी स्वत: आणि कुटुंबियांसाठी महापौर, उपमहापौर, नगरसेवकपद अशी लाभाची सर्व पदे दहा वर्षांत मिळविली. गरज सरो, वैद्य मरो या तत्त्वाचा अंगीकार करीत आघाडीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विरोधात राहत महापालिकेतील सत्ताधाºयांशी संघर्ष केला आता तेच सत्ताधारी मंडळी पक्षात येऊन मोक्याच्या जागा पटकावीत असताना कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी नेत्यांना दिसत नाही, ही सत्तेची धुंदी आहे. राष्टÑवादी काँग्रेस पाच वर्षांपूर्वी अशाच हवेत होती. सत्तेत असताना घाऊक प्रमाणात पक्षांतरे झाली. बेडकी फुगली तरी हत्ती होत नाही, हे राजकीय पक्ष विसरतात आणि सत्ता जाताच पोरक्याचे जिणे वाट्याला येते. ११ नगरसेवक असलेल्या राष्टÑवादी काँग्रेसचे ७ नगरसेवक सोडून गेले. इच्छुकांच्या मुलाखतीचे आयोजन करणाºया महानगराध्यक्षाने सायंकाळी पक्षांतर केले. महापौर ललित कोल्हे हे दहा दिवसांपूर्वी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय जाहीर करतात. इच्छुकांच्या मुलाखती घेणा-या पॅनलचे सदस्य म्हणून काम करतात आणि दुस-याच दिवशी निष्ठा बदलतात, हा निष्ठेचा बाजार नाही तर काय? पुन्हा या ‘आयाराम-गयारामां’च्या तोंडी नेत्यांवर विश्वास ठेवून अमूक पक्षात प्रवेश करीत आहे, अशी भाषा असते. राजकारणात किती बेगडीपण आणि दांभिकता ठासून भरलेली आहे, याची प्रचिती अशा घटनांनी येते. दुर्देव असे की, अशी मंडळी लोकशाही मार्गाने सत्ता हाती घेतात आणि शहाण्यासुरत्या लोकांचे नेतृत्व करतात.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव