शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत 'वसंतोत्सव': सहकारमहर्षी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 18:51 IST

लोकप्रियता, कार्यकर्त्यांचे मोहोळ, कामाचा व्याप, सहकाराचे स्वप्न, पक्षनिष्ठा, शेतकर्‍यांच्या विकासाचा ध्यास हे सर्व एकाच नेत्याच्या जागी

 

 -रविंद्र वासुदेव गाडगीळ

राजस्थानचे राज्यपाल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा मान ज्यांना चार वेळा मिळाला, ते लोकप्रिय लोकनेते, शेतकरी कार्यकर्ते, आपले सहकारसम्राट, माजी खासदार.माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील.  अशा या लोकप्रिय नेत्याचा गुणगौरव ग्रंथ `वसंत गौरव' म्हणून प्रा. रामकृष्ण मोरे, अध्यक्ष यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष खासदार व संपादक सरोजिनी बाबर, भालचंद्र दिनकर फडके यांच्या गौरव समितीने दुर्मिळ फोटोंसहित अनेक लेखकांना लेखनास प्रवृत्त करून ग्रंथ अगदी गौरवपूर्ण केला आहे. 

उद्योगतज्ज्ञ तात्यासाहेब कोरे, साथी जॉर्ज फर्नांडिस, बॅ.अप्पासाहेब पंत, मा.सभापती विधानसभा वि.स.पागे, मंत्री भाई सावंत, डॉ.का.मो़ देशमुख, साहित्यिक डॉ. सुरेंद्र बारलिंगे, देवदत्त दाभोळकर, अनुताई वाघ, समाजवादी नेते, ग.प्र.प्रधान, साथी भाई वैद्य, निळूभाई लिमये, वनराईचे मोहन धारिया, कामगार नेते डॉ. बाबा आढाव, टी.जी.देशमुख, प्राध्यापक पी.बी.पाटील, अ‍ॅड.वसंतराव पाटील, शिक्षणतज्ज्ञ डॉ. पतंगराव कदम, आमदार कमलाबाई अजमेरा, नरूभाऊ लिमये, प्रा.म.द.हातकणंगलेकर, डॉ.राम ताकवळे.

एवढी मोठी लोकप्रियता, कार्यकर्त्यांचे मोहोळ, कामाचा व्याप, सहकाराचे स्वप्न, पक्षनिष्ठा, शेतकर्‍यांच्या विकासाचा ध्यास हे सर्व एकाच नेत्याच्या जागी हा दुर्मिळ असा योग. 

अपवाद माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील! जे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, कष्टाळू, साधेभोळे, गरीबांविषयी कनवाळू आणि आपला महाराष्ट्र विकसित व्हावा हा एकच ध्यास धरून चोवीस तास कामात असत. 

वसंतदादा पाटील ह्यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९१७चा. १९३७ ला तालुका काँग्रेसचे चिटणीस म्हणून प्रथम निवड. १९३९ रोजी लग्न. १९४१ येथे बिसूर येथे वैयक्तिक सत्याग्रह, सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा होऊन खडतर जीवनाची सुरुवात. १९४२ मध्ये तुरुंग फोडून पलायन करत असताना खांद्याला गोळी लागून जखमी व पुन्हा अटक. सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा. येरवड्यात दंडा-बेडीत बद्ध. वर्षाखेर सुटका. १९४८-५० सातारा-सांगली जिल्ह्याचे होमगार्ड कमांडर, १९५० द.सातारा जिल्ह्याचे काँग्रेसचे सेक्रेटरी म्हणून निवड.

१९५१ मध्ये सांगली मार्केट कमिटीचे चेअरमन. १९५२ मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सांगलीतून आमदार म्हणून निवड. १९५७ शेतकरी सहकारी कारखाना स्थापन केला. १९६० मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची सांगलीत स्थापना. १९६२ मध्ये पुन्हा आमदारपदी निवड. भारत सरकारतर्फे  साखर निर्यातीसाठी जपान दौर्‍यासाठी शिष्टमंडळात निवड. १९६४ रोजी विविध देशांच्या कागद प्रकल्पासाठी अभ्यास दौरा. १९६६ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड. १९६७ मध्ये  राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते `पद्मभूषण' सन्मान. १९५७ मध्ये पत्नीवियोग. १९७२ मध्ये महारष्ट्राचे पाटबंधारे व वीजमंत्री, १९७६ राजकारण संन्यास. १९७७ मध्ये संन्यासाकडून राजकारणाकडे पुन्हा प्रवेश. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवड. १९७८ महाराष्ट्राचे दुसर्‍यांदा मुख्यमंत्री. १९७९ सांगलीतून लोकसभेवर निवड. खासदार. १९८०अ.भा.काँग्रेस (आय) चे सरचिटणीस. १९८३ तिसर्‍यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. १९८५ चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचे शपथग्रहण. १९८५ राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.

अशी ही पदे आणि पदग्रहण : सद्यस्थितीतल्या राजकारणाशी तुलना केली तर आश्चर्य वाटेल की त्या वेळेस १०-१० वर्षे पक्षात राहून पक्षाची व जनतेची कामे करून, पक्षनिष्ठा, कर्तव्य, जनसेवा, आदर, आज्ञापालन इ. गुणांचे पालन करूनही जेमतेम जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, ग्रामपंचायतीचे सदस्यत्व प्राप्त होई. पुढे आपल्या कर्तबगारीवर पक्ष नेतृत्वाच्या विश्वासास पात्र ठरल्यासच (त्यावेळी पक्षश्रेष्ठी नावाचे दुष्ट, छळवादी व अपात्र प्राणी नव्हते.) आमदारकी, खासदारकी, महामंडळाची अध्यक्षपदे, मंत्रीपदे इ. पदे आपोआप चालून येत. नव्हे नव्हे गळ्यात मारली जाई. आता नगरसेवकाला महापौराचे, ग्राम पंचायतीच्या सदस्याला सरपंच, जि.प.सदस्याला अध्यक्ष, आमदाराला मंत्रीपद, मंत्र्याला मुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्र्याला पंतप्रधानपदाची दिवास्वप्ने पैशाच्या व संघटनेच्या पुंडशाहीच्या बळावर पडतात व ते मिळवतात. अगदी डोक्यावर गुन्हेगारीचा शिक्का आला तरी. ही आपल्या सद्य राजकारणाची शोकांतिका.

म्हणून तर हा लेखप्रपंच. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण वर्गाला प्रेरणा मिळावी. त्यांनीही देशाच्या, धर्माच्या, संस्कृतीच्या, समाजाच्या विकास व संरक्षणासाठी सक्रिय सहभागी व्हावे यासाठी त्यांनी हा ग्रंथ वाचून आपल्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी तरी हे `वसंत वैभव' वाढून घ्यावे. 

(क्रमश:)

ravigadgil12@gmail.com

 

टॅग्स :Politicsराजकारण