शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत संपादकीय - हजारोंच्या पोटावर पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 07:29 IST

भारत संचार निगम (बीएसएनएल) ही राष्ट्रीय कंपनी बंद करून त्यात काम करणाऱ्या ५० हजारांवर अधिकारी व कर्मचाºयांना सरकार घरी बसविणार असल्याची बातमी जेवढी धक्कादायक

भारत संचार निगम (बीएसएनएल) ही राष्ट्रीय कंपनी बंद करून त्यात काम करणाऱ्या ५० हजारांवर अधिकारी व कर्मचाºयांना सरकार घरी बसविणार असल्याची बातमी जेवढी धक्कादायक, तेवढीच ती सगळ्या सरकारी उद्योगातील अधिकाºयांना व कर्मचाºयांना त्यांच्या भवितव्याची चिंता करायला लावणारी आहे. मोबाइल, इंटरनेट वगैरे इलेक्ट्रिक साधनांच्या वापरामुळे पोस्ट आणि टेलिग्राफ हे खाते तसेही त्याचा अखेरचा श्वास मोजत आहे. या खात्याच्या कार्यालयांचे बँकांमध्ये रूपांतर करण्याची व ती देशातील सर्वात मोठी बँक बनविण्याची मोदी सरकारची थाप त्यांच्या खोट्या घोषणांच्या यादीत कधीच जमा झाली आहे. काही मोठ्या शहरातील पोस्टांच्या अशा बँका झाल्या. मात्र, बाकीचा टपाल व्यवहार दिवसेंदिवस आचके देताना दिसत आहे. नेमके तेच प्राक्तन आता भारत संचार निगमच्या वाट्याला आले आहे. जसजसे तंत्रज्ञान बदलते, तसे तेथील कर्मचाºयांनीही स्वत:ला बदलण्याची गरज असते. जे असे कालसुसंगत बदल पचवत नाहीत, ते कालबाह्य होत जातात, हे वास्तव आहे. सक्ती करून, प्रसंगी वेतनवाढ रोखण्याचे इशारे देऊनही अनेक सरकारी कर्मचारी संगणकावर काम करण्यास तयार नव्हते, हा काल-परवाचा इतिहास आहे.

कामाची पद्धत बदलली, तरी त्याबद्दल कुरकूर करत राहिल्याने हे विभाग अतिताठर बनले. त्यातून तंत्रज्ञानासह नव्या स्पर्धेला, आव्हानांना तोंड देण्यात मागे पडले. त्याचीच परिणती हे उद्योग बंद करण्याच्या निर्णय घेण्यापर्यंत आली. या व्यवस्थेत पहिला बळी गेला तारेचा. स्पर्धेसाठी आवश्यक ते तंत्रज्ञान पुरवूनही बदलत्या ग्राहकाच्या गरजांचा विचार करण्यात बीएसएनएल कमी पडल्याने, आधी त्यांच्या लँडलाइनची संख्या घटली आणि नंतर मोबाइल, इंटरनेट ग्राहक. वस्तुत: मोबाइलमुळे प्रत्येक जणच आता पोस्ट खाते व तार खाते बनला आहे. या स्थितीत स्वतंत्र खाते हवे कशाला, असा शहाणा विचार दिल्लीकरांच्या मनात आला असेल आणि तो अंमलात आणल्यामुळे एवढ्या लोकांचा पगार वाचवून सरकारी खर्चात कपात करता येते, असे त्यांना वाटत असेल, तर त्यांच्या बचत प्रवृत्तीची प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे. मात्र, त्यामुळे त्या खात्यात काम करणाºया ५० हजार लोकांचे संसार उघड्यावर येतील याची त्यांना चिंता नसेल, तर ते त्यांच्या निबरपणाचेही लक्षण मानले पाहिजे. जसजशी तंत्रमाध्यमे विकसित होतात, तसतशी मानवीशक्तीची गरज कमी होऊन काही क्षेत्रांत माणसांची कपात अपरिहार्य आहे. भारतासारख्या समाजकल्याणाची हमी देणाºया देशात प्रथम माणसांचा विचार होणे ही बाब तंत्र विकासाहून अधिक महत्त्वाची ठरणारी आहे. देशाने समाजवादाची कास सोडली आहे. अलीकडे त्याने शासकीय उद्योगांच्या विस्तारावरचा भरही थांबविला आहे. सारे उद्योग बड्या भांडवलदारांच्या हाती सोपवून, त्या जबाबदारीतून आपण मुक्त होण्याचा विचार सरकार करीत आहे. गेल्या चार वर्षांत असे किती सरकारी उद्योग कोमेजून खासगी क्षेत्रात गेले, याचा हिशेब या सरकारकडे मागण्याची वेळ आली आहे. ज्या काळात सरकारी उद्योग बंद पडतात, त्याच काळात अंबानी, अदानी वगैरेसारख्यांचे व्यवसाय तेजोमय होतात, याचा अर्थ दुसरा कोणता? देश भांडवलशहांच्या हाती जात आहे. अरुण शौरी यांचे या संदर्भातील परखड मत असे की, मोदींचे सरकार हा देखावा आहे. खरे सरकार अंबानी आणि अदानी यांचेच आहे. जी चिंता भारत संचार निगमची आहे, तीच सरकारी मालकीच्या विमान कंपन्यांची आणि राज्य सरकारच्या अखत्यारितील परिवहन महामंडळाचीही आहे. एअर इंडिया ही देशातील सर्वात जुनी हवाई कंपनी सरकारने विकायलाच काढली आहे. त्या विक्रीवर टीका झाल्यामुळे तिची कारवाई जरा थंड बस्त्यात आहे एवढेच. मात्र, येत्या काही दिवसांत ती कोणत्या ना कोणत्या भांडवलदाराच्या मालकीची झाल्याचे आपल्याला दिसेल. भांडवलशाहीत कर्मचाºयांच्या शाश्वत नोकरीची हमी दिली जात नाही. ‘हायर अँड फायर’ म्हणजेच गरजेप्रमाणे माणसे घ्या आणि गरज संपली की त्यांना बाहेर काढा, हा त्या व्यवस्थेचा प्रस्थापित नियम आहे. गेल्या काही वर्षांत अमेरिकन भांडवलदारांनी किती लोकांवर बेकारी लादली, याचा हिशेब तो देश करीत आहे. उद्या हीच पाळी सरकारी उद्योगातील आपल्याही लोकांवर यायची आहे. त्याची ही अपरिहार्य सुरुवात मानायला हवी.ग्राहकांच्या बदलत्या गरजांचा विचार करण्यात कमी पडल्याने बीएसएनएल स्पर्धेत मागे पडली. ही केवळ सुरुवात आहे. याच पद्धतीने भविष्यात आणखीही काही सरकारी उद्योग बंद होऊ शकतात.

टॅग्स :BSNLबीएसएनएल