शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
4
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
5
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
6
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
7
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
8
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
9
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
11
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
12
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
13
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
14
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
16
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
17
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
18
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
19
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
20
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:39 IST

मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच राजकीय पक्षांमध्ये रणधुमाळी सुरु झाली आहे. पक्षांतरे आणि आयाराम-गयाराम नाट्ये घडू लागली ...

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच राजकीय पक्षांमध्ये रणधुमाळी सुरु झाली आहे. पक्षांतरे आणि आयाराम-गयाराम नाट्ये घडू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांमध्ये मतमतांतरे व्यक्त होत आहेत. एक अतीशय मार्मिक संदेश सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्यानिष्ठावंत कार्यकर्तेहो, तुम्ही फक्त हाती तंबोरा घ्या...या संदेशातून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची नावे घेत निष्ठावंत कार्यकर्त्यांची अगतिकता प्रभावीपणे मांडली आहे. काँग्रेसमधून कुणी भाजपामध्ये जाते आहे, भाजपामधून कुणी काँग्रेसमध्ये तर कुणी मनसेमधून शिवसेनेमध्ये जात आहे. राष्टÑवादीचा नेता भाजपाच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे. पक्ष, विचार, कार्य याच्याशी काहीही देणेघेणे नसलेली ही मंडळी केवळ स्वार्थी आणि संधीसाधू असल्यासारखी वागाताना दिसत आहे.महाराष्टÑाची सत्ता मोजक्या १००-१२५ घराण्यांभोवती केंद्रित असल्याचा आरोप नेहमी होत असतो. ही घराणीदेखील नातेसंंबंधाने जोडलेली आहेत. एका घरातील सदस्य हे वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये सक्रीय असतात, त्यामुळे केंद्र व राज्यात कोणत्याही पक्षाची सत्ता येवो, या मंडळींना कधीही अडचण येत नाही. त्यांच्या सहकारी संस्था, शिक्षण संस्था, उद्योग-व्यापार बिनबोभाट सुरु असतो. अलिकडे समाजमाधम्यांवर ही घराणी आणि त्यांच्या नातेसंबंधांवर प्रकाशझोत टाकणारी माहिती प्रसारीत होत असते. आणि शेवटी कार्यकर्त्यांना आवाहन केलेले असते की, तुम्हाला मोदी, गांधी, पवार, ठाकरे हे कुणी ओळखत नाही, तरीही तुम्ही त्यांच्यासाठी भांडतात, वाद घालतात. स्वत:च्या पोटाचे आधी बघा आणि मगच राजकारणात पडा...निवडणुका आल्या की, हा संदेश हमखास प्रसारीत होतो.अर्थात आता नेत्यांप्रमाणे कार्यकर्तेदेखील हुशार झाले आहेत. नेते टोप्या बदलतात, मग कार्यकर्त्यांनी बदलल्या तर काय हरकत आहे, असे म्हणत दिवसा एका तर रात्री दुसऱ्याच उमेदवारासाठी काम केले जाते. रात्री ढाब्यावर प्रतिस्पर्धी उमेदवाराला रणनीती अवगत केली जाते. अर्थात त्यासाठी पुरेसा मोबदला घेतला जातो, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे निवडणुकीत उमेदवारदेखील सावध आणि चाणाक्ष झाले आहेत. कार्यकर्त्यांकडे किती अधिकार द्यायचे याची मर्यादा आखली गेली आहे. नातेवाईक, मित्र हा महत्त्वाचा गट, त्यानंतर संस्थेमधील कर्मचारी आणि नंतर कार्यकर्ते अशा क्रमाने जबाबदारीचे वाटप केले जाते.राजकारण हे सेवा करण्याचे साधन आहे, असे तत्त्वज्ञान अलिकडे कोणी मनावर घेत नाही. ना नेते ना कार्यकर्ते. त्यामुळे पक्षांतरावर तात्पुरती टीका होते आणि नंतर धूळ खाली बसते तसे वातावरण पूर्ववत होते.यातून राजकारणाचा दर्जा, विश्वासार्हता कमी होत आहे, याचे सोयरसूतक मात्र कुणाला राहिलेले नाही. लोकशाही राज्यव्यवस्थेत प्रामाणिक, तळमळीचे लोकप्रतिनिधी नसतील, तर ते देश आणि समाजाच्यादृष्टीने हानीकारक ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव