शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

...ही तर गैरमार्गाची खरी सुरुवात

By किरण अग्रवाल | Updated: March 28, 2019 09:11 IST

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व राजकीय पक्ष फार पूर्वीपासूनच लागले होते हे खरे; पण मातब्बरांकडून स्वकीयांना धक्के देत पक्षांतरे घडून येऊ लागल्याने व नाकाबंदीमध्ये नोटांनी भरलेल्या गोण्या व मद्याच्या बाटल्या आदी सापडू लागल्याने आता खरी धुळवड उडून सुरुवात होऊन गेल्याचे म्हणता यावे.

 

किरण अग्रवाल

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व राजकीय पक्ष फार पूर्वीपासूनच लागले होते हे खरे; पण मातब्बरांकडून स्वकीयांना धक्के देत पक्षांतरे घडून येऊ लागल्याने व नाकाबंदीमध्ये नोटांनी भरलेल्या गोण्या व मद्याच्या बाटल्या आदी सापडू लागल्याने आता खरी धुळवड उडून सुरुवात होऊन गेल्याचे म्हणता यावे. विशेषत: ही सुरुवातच आहे, ‘आगे आगे देखो, होता है क्या’, असेही म्हटले जात असल्याने काय काय घडणार या निवडणुकीत आणि कुठे नेऊन ठेवणार आपल्या आदर्श लोकशाही प्रक्रियेला, याची चिंताच बाळगली जाणे स्वाभाविक ठरावे.लोकशाहीचा उत्सव म्हणवणाऱ्या निवडणुकीचा बिगुल वाजून त्यासंबंधीच्या पहिल्या चरणाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या सुरुवातीच्या काळातच राज्यात मातब्बर राजकीय घराण्यातील डॉ. सुजय विखे पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सारख्यांनी आपापल्या पक्षांचे बोट सोडून भाजपाचा झेंडा हाती घेतला. अजूनही काही जण त्या वाटेवर तर काही विरोधी पक्षांच्या वाटेवर आहेत, त्यामुळे निष्ठा आणि संधी विषयीची चर्चा घडून येत आहेच, शिवाय आजवरच्या त्यांच्या पक्षाने त्यांना काय कमी दिले याबाबतचा ऊहापोह घडून येणेही क्रमप्राप्त ठरले आहे. अर्थात, राजकारणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरे, बंडखोऱ्या घडून येत असतातच, त्यात तसे नावीन्यही नसते. पण या सांधेबदलामुळे आरोप-प्रत्यारोपांची जी राळ उडते ती निवडणुकीत रंग भरणारीच ठरत असल्याने प्रचाराचा माहौल गडद होण्यास अगर तापून जाण्यात मदत घडून येते. कारण, यात नेत्यांचे निभावून जाणारे असले तरी त्यांच्यासाठी परस्परांशी शत्रुत्व ओढवून बसलेल्या स्थानिक पातळीवरील समर्थक-कार्यकर्त्यांची अडचण झाल्याखेरीज राहत नाही.महत्त्वाचे म्हणजे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा एरव्हीपेक्षा सक्रिय होतात. यातही पोलिसांच्या नाकेबंदी व वाहन तपासणीसारख्या मोहिमा सुरू होत असल्याने बऱ्याच ठिकाणी ‘अनपेक्षित’पणे काही बाबी आढळून येत आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत देशात सुमारे ५४० कोटी रुपयांची रोकड, अमली पदार्थ, दागदागिने, भेटवस्तू व मद्य आदी माल हस्तगत झाला आहे. महाराष्ट्रातीलच अलीकडची उदाहरणे द्यायची तर अशाच नाकेबंदीतून बीड-अहमदनगर रस्त्यावर एका मर्सिडीज कारमध्ये पाच गोण्या भरून सुमारे दोन कोटींची रक्कम निवडणूक पथकास आढळून आली आहे, तर रामटेक मतदारसंघात ५० लाखांची व यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातही दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम एका वाहनात हस्तगत झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील गुजरात सरहद्दीवर जिलेटिन, डिटोनेटरचा साठा पकडला गेला असून, मालेगावमध्येही १६ धारदार तलवारींसह शस्रसाठा सापडला आहे. याच दरम्यान त्र्यंबकेश्वरनजीकच्या आंबोली घाटात गुजरातमधून आलेल्या वाहनात विदेशी मद्याचा मोठा साठाही पकडण्यात आला. यंत्रणा सक्रिय झाल्याची ही लक्षणे आहेत.अर्थात, आढळलेल्या रोख रकमेचा किंवा स्फोटके, शस्रसाठा वा मद्यसाठ्याचा थेट निवडणुकीशी संबंध नसेलही; परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवळल्या गेलेल्या चौकशी व तपासणीच्या फासामुळे हे प्रकार समोर आले हे नाकारता येऊ नये. यातील शंकेचा अगर शक्यतेचा मुद्दा यामुळेच उपस्थित होतो की, पैसा व मद्यापासूनच्या सर्व हस्तगत बाबींच्या वापराचा निवडणुकीशी राहणारा संबंध नाकारता येणारा नाही. त्यामुळे प्रारंभातच या बाबी हस्तगत होऊ लागल्याचे पाहता, निवडणुकीला खरी सुरुवात होऊन गेल्याचा अर्थ त्यातून काढला जाणे अप्रस्तुत ठरू नये. गैरमार्गाचा अवलंब यापेक्षा वेगळा कोणत्या माध्यमातून घडून येऊ शकतो, असाच प्रश्न यातून उपस्थित व्हावा.यंदा तर अधिकच अटीतटीने निवडणूक लढली जाण्याचे संकेत आहेत. त्यातून ‘यशासाठी काहीपण’ होण्याची किंवा केले जाण्याची शक्यता चर्चिली जात आहे. आचारसंहितेची बंधने कितीही कडक असली तरी त्यातून मार्ग काढणारे कमी नाहीत. त्याचा प्रत्यय आजवरच्या निवडणुकांत अनेकांना आला आहे. तेव्हा, यंदाही ‘उडदामाजी काळे गोरे’ घडून येण्याची शक्यता चिंतेचे कारण ठरून गेली आहे. अशात यंत्रणा अधिक सख्त झाल्या तर गोंधळींना अटकाव बसेलच, शिवाय आपल्याच उज्ज्वल भविष्यासाठी, सुशासनाकरिता व विकासाची स्वप्ने पूर्ण करून घेण्याच्या दृष्टीने आपल्या एका मताचे मोल कसे अनमोल आहे व कसल्याही प्रलोभनाला बळी न पडता विचारपूर्वक मताधिकार बजावणे किती गरजेचे आहे, याची जाणीव जागृती घडवली गेली तर त्याचा परिणामही नक्कीच दिसून येऊ शकेल. लोकशाही व्यवस्थेला डागाळू पाहणाऱ्या व गैरमार्गाचा अवलंब करू पाहणाऱ्यांना रोखण्यासाठी तेच गरजेचे आहे.  

टॅग्स :black moneyब्लॅक मनीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक