शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

पोस्टात हरवलेले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 04:04 IST

परवा तुझा वाढदिवस झाला. पेपरात फोटो पाहिले. इतके वाईट फोटो आजवर मी पाहिले नव्हते. कुणी काढले रे ते? तुझ्यासारख्या फोटोग्राफरचे असले फोटो? वाढदिवस तुझा, पण नेमकं कोण कुणाला शुभेच्छा देतोय हेच कळत नाही!

<p>- नंदकिशोर पाटीलप्रिय दादूस,सप्रेम नमस्कार!परवा तुझा वाढदिवस झाला. पेपरात फोटो पाहिले. इतके वाईट फोटो आजवर मी पाहिले नव्हते. कुणी काढले रे ते? तुझ्यासारख्या फोटोग्राफरचे असले फोटो? वाढदिवस तुझा, पण नेमकं कोण कुणाला शुभेच्छा देतोय हेच कळत नाही!मी देखील शुभेच्छा देण्यासाठी बांद्र्याला येणार होतो. पण माहिमला ट्रॅफिक जॅम असल्याने येऊ शकलो नाही. दादर ते बांद्रा तसंही खूप अंतर. त्यात मेट्रोच्या नावाखाली सरकारनं मुंबईतील सगळे रस्ते उखडून टाकलेले. शिवाय, फूटपाथवर जिथं-तिथं भैये पसरलेले. पायी चालणं मुश्कील तिथं गाडी कशी काढणार? मला सांग, कुणी मागितली होती रे यांना मेट्रो? कुणीही येतो अन् मुंबईवर हातोडा मारून जातो. अहमदाबाद, सुरत, गांधीनगरात का नाही खोदत? रस्ते खोदायची एवढीच हौस असेल, तर सीमेवरचे खोदा ना! अतिरेक्यांना घुसता येणार नाही. तुमच्या सोंगासाठी आमची मुंबई कशाला तोडताय? मराठी माणसाला गणपतीसाठी कोकणात जायला धड रस्ता नाही. मुंबई-गोवा महामार्ग कधीपासून उखडून टाकलाय. रोज अपघात होतात. माणसं मरतात. पण त्याचं कुणालाच सोयरसुतक नाही. कोकण रेल्वेत तर परप्रांतीयांचाच भरणा अधिक. पाय ठेवायलाही जागा नसते. मुंबईत तर जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय. कधी कोणता पूल कोसळेल याचा नेम नसतो. सगळे कसे मराठी माणसांच्या जीवावर उठले आहेत.दादू, तुला हे सगळं सांगण्यामागं कारण असं की, आपण आता सावध राहायला हवं. (आपण म्हणजे, फक्त तू अन् मी नव्हे!) गेली पंचवीस एक वर्षे तुझ्याकडे मुंबईची मुनसीपाल्टी आहे. काय दिवे लावले तिथे? मी बघ. अवघ्या पाच वर्षात नाशकाचा चेहरामोहरा बदलून टाकला. शहराच्या विकासासाठी नुसती सत्ता असून चालत नाही व्हिजन असावं लागतं. आता तू म्हणशील-‘नाशकात एवढा मनसे विकास झाला, तर मग लोकांनी का नाकारलं?’ तेच सांगतो. मराठी माणूस इथेच कमी पडतो. तिकडे बघ. गुजरातेत काही न करता तिथले लोक पुन्हा-पुन्हा त्यांना निवडून देतात. आपण सारे कपाळकरंटे. खेकडावृत्तीचे. एकमेकांचे पाय ओढण्यात वाक्बगार! अरे हो. खेकड्यावरून आठवलं. तुझा तो धाकटा चिरंजीव खेकड्यावर संशोधन करतोय म्हणे! धन्य आहे!! कुणी सुचवला रे हा विषय त्याला? स्वत:ला छावा म्हणवून घ्यायचं अन् फावल्या वेळात खेकडे पकडायचे!जळलं मेलं लक्षण. पंतांची मुलं गगनचुंबी टॉवर उभारताहेत अन् आपली मुलं खेकडे पकडताहेत...बरं दिसतं का हे? स्वर्गातदेखील बाळासाहेबांना वेदना होत असतील... तरी मी सांगत होतो. शिववडा काढू नको. वडापाव खाऊन मराठी तरुणांना भव्यदिव्य स्वप्नं कशी पडणार?असो. दादू तू वाराणसीला जाणार आहेस म्हणे. मला सांग, कुणी दिली तुला ही आयडिया? जिवंतपणी कुणी काशी करतं का? काय करणार तिथं जाऊन, तर गंगेत डुबकी मारणार! पोहता येतं का? त्यापेक्षा अयोध्येला जा. राममंदिरासाठी जमविलेल्या विटा शाबुत आहेत का ते बघून ये. जमलंच तर एखादी वीट रचून ये. तेवढंच काहीतरी ‘काँक्रिट’ काम लोकांच्या लक्षात राहील.वाढदिवसाच्या पुन:श्च शुभेच्छा!तुझा भाऊ-राज दादरकर(तिरकस)