शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चला तर खेळ मांडू या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 04:24 IST

शारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन व आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे, म्हणजे शारीरिक शिक्षण. शारीरिक शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ शरीरापुरतेच मर्यादित नाही, तर शरीराबरोबरच मन, भावना, विचार इत्यादींवर होणारे संस्कारसुद्धा त्यात अंतर्भूत आहेत.

- डॉ. शुभांगी दातारशारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन व आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे, म्हणजे शारीरिक शिक्षण. शारीरिक शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ शरीरापुरतेच मर्यादित नाही, तर शरीराबरोबरच मन, भावना, विचार इत्यादींवर होणारे संस्कारसुद्धा त्यात अंतर्भूत आहेत. २४ जानेवारी हा शारीरिक शिक्षण दिवस आहे. तो अनेक शाळांमध्ये साजराही होतो. त्यानिमित्ताने कवायती करून घेतल्या जातात, पण हा दिवस तेवढ्यापुरता न ठेवता मुलामुलींच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकासासाठी याचा उपयोग कसा करता येईल, याचा वेध घेण्याचा प्रयत्न...खेळ आपले व्यक्तिमत्त्व घडवितात, स्वत:ची एक ओळख देतात,इतरांशी कसे वागायचे, बोलायचे हे टीम गेम्स शिकवतातच की. स्वत:च्या क्षमता ओळखायला तर मदत करतातच, पण स्वावलंबीदेखील बनवतात. आपली संज्ञानात्मक कौशल्ये विकसित करतात तशीच आपली विचारक्षमताही वाढवतात.१० वर्षे मी क्रीडा मानसतज्ज्ञ म्हणून अनेक खेळाडूंच्या मानसिक आरोग्याविषयी म्हणजेच सराव करत असताना आपला उत्कृष्टतेचा ध्यास कसा जपायचा याविषयी मार्गदर्शन करत आहे. आमच्या या उपक्रमाचे नाव आहे ‘मिशन एक्सलन्स.’ खेळाडूंबरोबर काम करताना इतर पौगंडावस्थेतील मुलांसोबतदेखील मी समुपदेशनाचे काम करते. आपण वर काही प्रातिनिधिक उदाहरणे पाहिली. हे काही अनुभव वारंवार येतात. या सगळ्या मुलांशी आणि पालकांशी बोलताना त्याचा एक लसावि काढला तर लक्षात आलेली आणि प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे यापैकी एकही जण ना मैदानी खेळ खेळत किंवा काही व्यायाम प्रकार करत. मग हेच कारण असेल का या सगळ्या समस्यांचे? तर नक्की हे एकच कारण जरी नसले तरीदेखील हे एक अत्यंत महत्त्वाचे पण काहीसे दुर्लक्षित कारण नक्कीच आहे.बघा ना शाळा, क्लास, अभ्यास... मग दमणूक आणि झोप. पूर्ण दिवसभरात व्यायाम किंवा कसरत कुठेच दिसत नाही. मग प्रश्न येतो वेळेचा आणि खरेच कुठे काढणार वेळ? एकामागोमाग एक परीक्षा आणि गृहपाठाची धडपड. पण मग आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचे काय? मेंदूला तरतरी येण्यासाठी शरीराची हालचाल हवी आणि त्यासाठी कोणता ना कोणता खेळ किंवा व्यायाम हवाच. त्याशिवाय स्फूर्तिदायक उत्साह कुठून येणार? आता विषय निघालाच आहे तर व्यायामाचे फायदे तरी बघू.खरे तर खेळाचे शारीरिक, मानसिक आणि स्वत:च्या विकासासाठी अनेक फायदे आहेत. कारण खेळातली सगळी कौशल्ये ही जीवन कौशल्येच नाहीत का... जसे की एकाग्रता, यश-अपयश हाताळण्याची सवय, त्याचा सामना, वेळेचे नियोजन, ध्येय निश्चिती इत्यादी. खेळ खेळल्याने एक शिस्त येते, निर्णय क्षमता वाढते, आपले स्नायू बळकट होतात, स्वास्थ्य सुधारते तसेच दिवसभर उत्साही वाटते. कदाचित आपण करत असतो त्याहून अधिक एक-दोन गोष्टी जास्तच करता येतात. वेगवेगळ्या खेळांचे वेगवेगळे फायदे सांगितले तर माझा मुद्दा अधिक स्पष्ट व्हायला मदत होईल. टेबल टेनिस, बॅडमिंटनसारख्या खेळांनी आपले हात आणि डोळ्यांचा समन्वय साधण्याचे कौशल्य सुधारते तर ज्युडो कराटेसारख्या खेळांनी आपले स्नायू तर बळकट होतातच, पण आपण डावपेचांचे कौशल्य वाढवतो. गोल्फसारखा खेळ एकाग्रता शिकवतो तर फुटबॉल आणि क्रिकेटमध्ये स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंगवर भर असतो. कबड्डी, खो खो आपल्याला वेगवान हालचाली आणि निर्णय क्षमतेचे महत्त्व पटवून देतात तर स्विमिंग व अ‍ॅथलेटिक्सने वेगाचे कौशल्य कसे हाताळायचे यावर भर असतो. खेळ आपले व्यक्तिमत्त्व घडवितात, स्वत:ची एक ओळख देतात, इतरांशी कसे वागायचे, बोलायचे हे टीम गेम्स शिकवतातच की. स्वत:च्या क्षमता ओळखायला तर मदत करतातच, पण स्वावलंबीदेखील बनवतात. आपली संज्ञानात्मक कौशल्ये विकसित करतात तशीच आपली विचारक्षमताही वाढवतात.इमोशनल इंटेलिजन्स हा विषय आजकाल किती आणि कसा महत्त्वाचा आहे हे आपण सर्वजण जाणतोच. खेळामुळे त्याची बरीचशी कौशल्ये आपण आत्मसात करू शकतो. पाहा बरे कोणती...आपल्या भावना ओळखणे, त्या कशा हाताळायच्या, नको त्या भावनांचा निचरा करायचा, सहवेदना कशी एक्स्प्रेस करायची आणि संवाद कसा सुधारायचा, आशावाद जागा कसा ठेवायचा आणि त्यातून प्रेरणा कशी घ्यायची अशी एक ना अनेक, आहे की नाही खेळणे इंटरेस्टिंग. अभ्यास, शाळा, क्लास तर थोडे दिवस आहेत, पण खेळ आयुष्यभरासाठी आहे. चला तर मग खेळ मांडू या. म्हणजे माझा हा मांडलेला खेळ यशस्वी होईल.

हल्ली रोहन अभ्यासात मागेच पडत चाललाय. त्यात हे नववीचे वर्ष. बरे शाळा, क्लास आणि टेस्ट सीरिज सगळे व्यवस्थित चालू आहे, पण दरवेळी मार्क मात्र कमीच...आता आठवीच्या मुलाच्या काय डबा खा म्हणून मागे लागायचे का? पण म्हणे याला भूकच लागत नाही. सकाळी ६.३० ला स्कूलबस येते आणि सगळे करून हा ७.३० ला येतो रात्री. आॅफिसच्या घाईत मी तीन तीन डबे करून देते. इतकी काळजी वाटते ना...काय बिनसलंय माहीत नाही पण सर्वेश इतका चिडचिड करतो. कोणाशी धड बोलत नाही. अभ्यासाची काही तक्र ार नाही, पण सतत एकटा एकटा असतो. इतके वजन वाढलेय त्याचे...आता आठवीत जाईल ना... म्हणून घेऊन आले. म्हटले एकदा अभ्यास, शाळा, क्लास आणि इतर गोष्टींचे टाइम टेबल लागले की बरे...(लेखिका क्रीडा समुपदेशक आहेत.)