शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
3
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
4
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
5
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
6
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
7
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
8
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
10
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
11
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
12
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
14
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
15
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
16
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
17
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
18
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
19
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
20
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?

घुमानचे सूर घुमू दे.!

By admin | Updated: November 15, 2014 00:47 IST

पंजाबच्या गुरूदासपूर जिल्ह्याच्या बटाला तालुक्यातील घुमान या जेमतेम 2क् हजार लोकवस्तीच्या तीर्थक्षेत्री एप्रिल महिन्यात होणा:या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे.

पंजाबच्या गुरूदासपूर जिल्ह्याच्या बटाला तालुक्यातील घुमान या जेमतेम 2क् हजार लोकवस्तीच्या तीर्थक्षेत्री एप्रिल महिन्यात होणा:या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे. राजकारणापल्याड असलेल्या माणसाला फारशी किंमत न देणा:या नवी दिल्लीत घडलेला पुढचा प्रसंग मात्र अपवाद ठरणाराच म्हणावा लागेल. केंद्रीय मंत्री हरसीमरत कौर बादल यांच्या दालनात त्यांच्या भेटीसाठी या संमेलनाचे निमंत्रक व सरहद या संस्थेचे प्रमुख संजय नहार, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी हे दोघे उभे होते. त्यांच्या हाती संमेलनाची काही कागदपत्रे आणि ‘नामदेव बाणी’ही सीडी होती. हरसीमरत आल्या आणि सीडीवरील नामदेवांचे चित्र पाहताच त्यांनी सीडीला अभिवादन केले नि मागचापुढचा कोणताही विचार न करता त्यांनी गिरीश गांधी यांना चरणस्पर्श केला.!! हरसीमरत कौर म्हणाल्या, की आपण नामदेवांच्या जन्मभूमीतून आलेला आहात, आमचा माथा म्हणून झुकतो. नामदेवांच्या सर्व रचना आम्हाला प्रात:स्मरणीय आहेत. आमच्या घरी नियमित त्या ऐकल्या जातात. त्यांनी काही ओळी म्हणून दाखवल्या.. प्रसंग काही मिनिटांचाच पण या आपुलकीने क्षणभरात महाराष्ट्र ते पंजाब यातील अंतर  कमी झाले. नामाचा हो टाहो.!!  नामदेवांच्या आठ रचनांची सीडी त्यांना नहार यांनी भेट दिली. संमेलनाबद्दल सांगितले. संमेलनाची पद्धत, परंपरा, महाराष्ट्र बाहेर झालेली संमेलने आणि घुमानचे महत्त्वही सांगितले. 
आता घुमानबद्दल कमालीची आस्था असलेले संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला व संतोषसिंग मोखा यांच्या संकल्पनेतून ‘नामदेव बाणी’ही सीडी तयार झाली. यापूर्वी कोणत्याही साहित्य संमेलनाआधी वातावरण निर्मिती करणारी अशी सीडी निघाली नव्हती. शिखांच्या साहित्यात नामदेवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचे प्रकटीकरण या संमेलनातून होऊ शकते. मराठी प्रकाशकांनी घुमानमध्ये पुस्तकविक्री होणार नाही, म्हणून मक्षिकापात केला असला तरी परिस्थिती तशी नसेल. 2क् हजार लोक येतील असा अंदाज आहे. नागपूर, पुणो व मुंबईतून सवलतीच्या दरात विमानसेवा आणि दोन रेल्वेगाडय़ा या ठिकाणांवरून सुटणार आहेत. स्वातंत्र्यकाळात लाल-बाल-पाल तसेच भगतसिंग- राजगुरू हा पंजाब-महाराष्ट्र असा संबंध जोडला गेला. तुटणा:या धाग्यांचीच भरमार असताना जुळणारे धागे घुमानच्या निमित्ताने विणले जातील. 
ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीनंतर संत नामदेवांनी महाराष्ट्र सोडला. आधी दक्षिणोची आणि नंतर उत्तरेची यात्र केली. काशी, पुष्कर, हरिद्वारला असताना त्यांना दिल्लीच्या बादशाहाने कैद करून दरबारात नेले. तेथून नामदेवमहाराज पंजाबातील भूतविंडमध्ये आले. कीर्तन, भजनाच्या माध्यमातून अनेक अनिष्ट रूढी, परंपरा, व्यसने आणि चालीरीती, अवडंबराच्या विरुद्ध प्रबोधन केले. पंजाबात नहरांच्या (पाण्याचे पाट) आसपास ते कीर्तन-भजन करत. त्यांच्या उपदेशाने अनेकांना आयुष्याचा मार्ग सापडला. प्रवचने व कीर्तनांमधून त्यांनी गावातील अनेक वाईट चालीरिती, व्यसनांविषयी लोकांचे प्रबोधन केले. भिट्टवालंमधील दुष्काळ घालवण्यासाठी तलाव, विहिरी पाडण्यासाठी लोकांना उद्युक्त केले आणि दुष्काळ संपला. भिट्टवाल आणि आसपासच्या सखोवाल, धारिवाल या गावांमध्ये नामदेवांना मानणा:यांची संख्या वाढू लागली. शेवटची काही वर्षे ते भिट्टवालच्या शेजारीच असलेल्या जंगलात राहण्यासाठी गेले. जंगलाचं रूपांतर एका गावात झालं. त्याचं नाव घुमान. घुमानजवळ ते जिथे तप करीत, तिथे आता तिपयाना साहीब गुरुद्वारा आहे, तर जिथे त्यांनी समाधी घेतली असे शीख बांधव समजतात, तिथे मुख्य गुरुद्वारा आहे. नामदेवांच्या नावाचे असे पाच गुरुद्वारे आहेत. ज्याप्रमाणो ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली, त्याचप्रमाणोच नामदेवमहाराजांनीही येथे समाधी घेतल्याचे अनेक दाखले पंजाबात दिले जातात. संशोधन अजूनही जारी आहे. आपण मात्र ते विठ्ठलाच्या ओढीने महाराष्ट्रात परत आले आणि  त्यांनी पंढरपूरला पायरीच्या चि:याशी समाधी घेतली, असे मानतो. प्रवाद अनेक आहेत. ते जिथे गेले तिथली बोली स्वीकारली. गुजरातीत लिहिले, खडी बोलीत लिहिले, पंजाबीतही लिहिले. पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश तसेच पाकिस्तानातही नामदेवांची मंदिरे आहेत. अशा उत्सवी पाश्र्वभूमीवर साहित्य संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी तयार केलेली नामदेवबाणी आता पंजाब, दिल्लीतील बडय़ा नेत्यांकडे पोहोचली आहे. त्यांच्यात संमेलनाबद्दल उत्सुकता आहे. दिल्लीत जिथे मराठी नेते, प्रशासनातील अधिकारी मराठी बोलायला बिचकतात, लाजतात तिथे नामदेवांनी मराठीची पताका उंचावली आहे. 
 
 रघुनाथ पांडे
विशेष प्रतिनिधी, 
लोकमत समूह, नवी दिल्ली