शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

नेता अन् पोलीस... कहानी पुरी फिल्मी है !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 08:27 IST

- सचिन जवळकोटे भूतलावर चित्रपटगृहं जोरात सुरू झाल्याची खबर कानी पडली.  इंद्रांनी विचारलं, ‘बॉलिवूडमध्ये नवीन कलाकृतींची निर्मिती आता मोठ्या वेगात ...

- सचिन जवळकोटे

भूतलावर चित्रपटगृहं जोरात सुरू झाल्याची खबर कानी पडली.  इंद्रांनी विचारलं, ‘बॉलिवूडमध्ये नवीन कलाकृतींची निर्मिती आता मोठ्या वेगात सुरू झाली असेल ना?’ तेव्हा मुनी गंभीरपणे म्हणाले, ‘निर्मिती सध्या फक्त ब्रेकिंग न्यूजचीच. तब्बल बावीस दिवस तुफान चालला अंधार कोठडीतल्या छोट्या ताऱ्याचा चित्रपट.’ 

आता मात्र इंद्रांना उत्सुकता सहन होईना. त्यांनी नारदांना तत्काळ भूतलावर पाठवलं. बॉलिवूडचा करंट रिपोर्ट सादर करण्याचा आदेश दिला. मुनी मुंबईत पोहोचले. तिथल्या एका फिल्म स्टुडिओत बोर्ड लावलेला, ‘नो एन्ट्री फॉर  मीडिया कॅमेरा’. ज्या कॅमेऱ्यावर बॉलिवूडनं आजपर्यंत शेकडो कलाकार मोठे केले, त्याच कॅमेऱ्याची आता ॲलर्जी झालीय, हे पाहून मुनी दचकले. आतमध्ये सर्वत्र सन्नाटा. नो लाईट, नो ॲक्शन. सारेच मोबाईलमधल्या बातम्यांमध्ये गुंतलेले. नाही म्हणायला चेन्नईचा एक प्रोड्युसर कम डायरेक्टर लुंगी सावरत कलाकारांचा शोध घेत होता. मुनींनी त्याला विचारलं, ‘पिक्चरचं टायटल काय?’ 

‘चोर-पुलीस’ त्यानं डायरीतलं नाव वाचून दाखवलं. तेव्हा गालातल्या गालात हसून मुनींनी सल्ला दिला, ‘ही खूप जुनी थीम झाली. आता ‘नेता-पुलीस’ असा पिक्चर काढा. वाटल्यास त्यात खरेखुरे नेते घ्या, अभिनेते म्हणून.’ डायरेक्टरला कल्पना आवडली. मुनींना घेऊन तो अगोदर दादरमध्ये ‘रौतां’कडं गेला. मात्र, त्यांनी मोठ्या ठसक्यात सांगितलं, ‘पिक्चरचे डायलॉग मीच लिहिणार. अख्ख्या पडद्यावरही मीच दिसणार. मधे-मधे कुणी लुडबूड करायची नाही.’

‘अय्यऽऽय्यो... कादर खानपेक्षाही किचकट आहे की तुमची अट...’ म्हणत डायरेक्टर थेट ‘वर्षा’वर पोहोचले. तिथं नेहमीप्रमाणं ‘थोरले काका बारामतीकर’ होतेच. ‘कमळवाल्यांना संभ्रमात अन् हातवाल्यांना भ्रमात ठेवून सरकार कसं चालवायचं’ याचा रोजचा दुपारचा क्लास म्हणे आत सुरू होता. काहीवेळानं निरोपानंतर दोघंही आत गेले. डायरेक्टरनं हळूच नारायणदादा कणकवलीकरांचा विषय काढला, ‘आजकाल त्यांची लेकरं कुणालाही काहीही बोलतात.’  मात्र, उद्धवांच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही. कदाचित त्यांना अशा तक्रारींची रोजच सवय झाली असावी. मात्र, ते नेहमीप्रमाणे शांतपणे एकच बोलले, ‘पिक्चरचा पहिला भाग व्हिलनचा असतो. शेवटचा भाग हिरोचा. मधल्या इंटरव्हलमध्ये तुम्ही पॉपकॉर्न खात ज्या मनोरंजक जाहिराती बघता ना, तसंच त्यांचं समजा. टाईमपास म्हणून द्या सोडून.’ 

डायरेक्टरनं उद्धवांना तर मुनींनी थोरल्या काकांना धन्य-धन्य होऊन नमस्कार केला. दोघंही बाहेर पडले. वाटेत ‘अजितदादा’ भेटले. त्यांना पिक्चरमध्ये काम करण्याची आयडिया आवडली. मात्र, नावात ‘पोलीस’ शब्द असल्याचं कळताच दचकून त्यांनी विचारलं, ‘पण हा रोल कोण करणार... ईडीवाल्यांचा कुणी नाही ना त्यात?’  तेवढ्यात तिथं जमलेले किरीटभाई अन् मलिकभाई यांच्यात वाद सुरू झाला. सोमय्या म्हणत होते, ‘पोलिसाचा रोल वानखेडेच करणार.’ नवाब आग्रह धरत होते, ‘नाहीऽऽ हा रोल वाझेच करणार.’ 

मुनी कानात पुटपुटले, ‘किती मोठ्ठा योगायोग पाहा. दोन्ही अधिकाऱ्यांचं नाव स अक्षरापासूनच सुरू. आडनावही वा अक्षरापासून. व्वाऽ या अधिकाऱ्यांनी नेमका कोणता रोल करावा, हेही नेतेच ठरविणार.’ त्याचवेळी फडणवीस पुढं सरसावले, ‘तुम्ही परमबीर सिंगांना फ्लॅशबॅकमध्ये दाखवणार असाल तर आमच्या नागपूरच्या अनिलभाऊंनाही रोल मिळायलाच हवा.’ मात्र, डायरेक्टरच्या डोक्यात वेगळंच गणित. ‘हे दोन्ही किरीटभाई अन् मलिकभाई नेते ॲक्टिंगमध्ये भलतेच माहीर दिसताहेत. यांनाच घेऊ की नेत्यांच्या रोलसाठी.’  हे ऐकताच अजितदादांनी खूष होऊन मलिकभाईंना हळूच सांगितलं, ‘तुम्ही ॲक्टिंग एवढी जोरात करा की, साऱ्या जगाचं लक्ष तुमच्या डाॅयलॉगबाजीकडंच गेलं पाहिजे. माझं जरंडेश्वर अन् ईडी प्रकरण मीडियानं विसरलं पाहिजे.’ मलिकभाईंनीही डोळे मिचकावले, ‘तेच तर करतोय ना सध्या.’ 

मुनी अवाक्. कुठलं प्रकरण कधी अन् कुणी उकरून काढायचं, याचंही परफेक्ट पाॅलिटिकल टेक्निक असतं, हे त्यांना प्रथमच कळलं. एवढ्यात समोरच्या ‘मन्नत’मधून तरुणाचा आवाज आला. तो आपल्या अभिनेता पित्याशी बोलत होता, ‘पापाऽऽ मै अंदर बहोत अपसेट था. मला खूप उशिरा बाहेर काढलं तुम्ही जेलच्या सेटवरून. त्या सीनमधल्या ऑफिसरनी का नाही पॅकअप लवकर केलं?’तेव्हा बाप कळवळत होता, ‘डॉन को पकडना नामुमकीन है, लेकिन बेटे को छुडाना बहोतही मुश्कील था... त्यांची ॲक्टिंग अन् यांचं पॉलिटिक्स खरं असेल बेटा... लेकीन तुम्हारी कहानी फिल्मी नहीं है !’ नारायणss नारायण ss 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी