निष्ठेचा दीपस्तंभ निमाला
By admin | Published: November 25, 2014 12:14 AM2014-11-25T00:14:01+5:302014-11-25T00:14:01+5:30
मुरली देवरा यांच्या काळाच्या पडद्याआड जाण्याने राजकारण आणि समाजजीवनाची बहुआयामी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने एक जातिवंत उद्योजक हरपला.
Next
मुरली देवरा यांच्या काळाच्या पडद्याआड जाण्याने राजकारण आणि समाजजीवनाची बहुआयामी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने एक जातिवंत उद्योजक हरपला. वाजली तर निष्ठा आणि मोडली तर बंडाळी, अशा बदललेल्या राजकारणातही निष्ठेची ज्योत प्रज्वलित ठेवणारा दीपस्तंभ निमाला. विद्वेषाला थारा न देणारा संयमी, मृदुभाषी नेता गेला. सुसंवादाचा पूल बांधण्याचे व्रत घेतलेला एक दिलदार यजमान अनंतात विलीन झाला. मुंबईसारख्या मायानगरीने तिचा एक अनभिषिक्त राजा गमावला. एका व्यक्तीच्या जाण्याने इतके सारे होणो, ही त्या व्यक्तीच्या बहुआयामी महतीची साक्ष आहे. मुंबईवर दीर्घकाळ आपला प्रभाव ठेवणा:या मोजक्या नेत्यांच्या मांदियाळीत मुरली देवरा यांचे स्थान अढळ होते. काँग्रेसपुरता विचार करावयाचा झाल्यास स. का. पाटील आणि रजनी पटेल यांच्यानंतर मुंबईवर देवरा यांच्याइतकी पकड अन्य कोणत्याही नेत्याला ठेवता आली नाही. 1981 पासून 2क्क्3 सालार्पयत तब्बल 22 वर्षे ते मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. ते किती वर्षे या पदावर राहिले, याच्या बरोबरीने त्या काळातील राजकीय संक्रमणही तितकेच महत्त्वाचे आहे. आणीबाणीनंतर सत्तेत आलेल्या जनता राजवटीचा अस्त करताना इंदिरा गांधी यांचे नेतृत्व नव्या तेजाने तळपले. त्यानंतर अल्पावधीतच देवरा यांचा मुंबईच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला. तेव्हा मिळालेले स्थान त्यांनी अढळपदासारखे निगुतीने जपले आणि जोपासले. दिल्लीपासून गल्लीर्पयत सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांनी ठेवलेले संबंध त्यांच्या सर्वसमावेशक राजकारणाचा पोत दाखवीत राहिले. संघर्षापेक्षा समन्वयावर अधिक भर देणा:या या नेत्याने यथावकाश जगभरातील अनेक देशांत सुहृद मिळविले. त्यांना मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले तेव्हा ते लोकप्रतिनिधीही नव्हते. किंबहुना 1978ची विधानसभा आणि 198क्ची लोकसभा निवडणूक त्यांना पराभवाची चव चाखवून गेली होती. पुढे देशाचे राजकारण मंडल आणि कमंडलूने ढवळून काढल्याच्या काळात ते अनेकदा लोकसभेवर निवडून गेले. 199क्च्या दशकात दोन निवडणुकांत विजयाने त्यांना हुलकावणी दिल्यानंतर ते सार्वत्रिक निवडणुकांपासून दूर राहिले. पण त्यांचे राजकीय व्यक्तित्व जय अथवा पराजयाच्या तागडीत तोलण्याच्या पलीकडचे होते. जयाचा उन्माद नाही, पराभवाने खचणो नाही, अशी विलक्षण स्थितप्रज्ञता कमावलेल्या या नेत्याने आपले अवघे आयुष्य काँग्रेसला वाहिले होते. स्निग्धता आणि कठोरता यांच्या संतुलनातून साकारलेल्या त्यांच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वानेही अव्याहत विश्वास दाखविला. नेहरू-गांधी घराण्याच्या नावाचा जप करण्यापेक्षा आपली निष्ठा ते कृतीतून व्यक्त करीत राहिले. काँग्रेसची शताब्दी मुंबईत भव्य स्वरूपात साजरी करताना त्यांनी मुंबईच्या विकासासाठी राजीव गांधी यांच्याकडून विशेष पॅकेज मिळविले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे संपूर्ण परिवारासहित हजर राहणो, ही देवरांच्या वादातीत निष्ठेला मिळालेली मानवंदना आहे. देवरांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार, मनोहर जोशी, विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे असे अनेकानेक भिन्न प्रकृतीचे मुख्यमंत्री झाले. त्या कोणाशीही देवरांचा संघर्ष झाला नाही. किंबहुना त्यांनी काँग्रेसचे हित प्रधान मानून त्यात तडजोड न करता व्यापक हितासाठी आवश्यक असलेली समन्वयाची पूरक भूमिका निभावली. उद्योगपतींपासून मुंबईच्या एखाद्या मोहल्ल्यातल्या दरिद्रीनारायणार्पयत कोणीही त्यांच्यार्पयत पोहोचू शकत होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे आणि काँग्रेसचे मुंबईतील राजनैतिक दूत ही त्यांची ओळख बनली. संसदीय पातळीवरील चर्चासत्रंपासून मुंबईच्या विकासासाठी जागतिक बँकेकडून मोठे अर्थसाह्य मिळविण्यार्पयत अनेक पातळ्य़ांवर ते प्रभावी कार्य करीत राहिले. प्रसारमाध्यमांमधील वार्ताहरापासून संपादक आणि मालकार्पयत स्नेहपूर्ण संबंध असतानाही ते प्रसिद्धीच्या आहारी गेले नाहीत. पत्नी हेमा यांचे मराठीपणही त्यांनी मनस्वीपणो जपले. त्यांचे आयुष्य जगण्याला अर्थ देणारे होते.
मरणं प्रकृति: शरीरिणां, विकृति: जीवनम् उच्यते बुधै:
मरण ही प्रकृती आहे आणि जगणो ही असाधारण गोष्ट आहे, हा रघुवंशातील सिद्धांत त्यांनी आचरणात आणला, हीच त्यांची महती.