शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रचंड क्षमतेचा जाणता राजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 04:07 IST

Sharad Pawar Birthday : सन १९८० मध्ये माझी शरदराव पवार यांच्याशी प्रथम भेट झाली. त्यानंतर मी सामुहिक विवाहाची चळवळ सुरु करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राची पदयात्रा केली.

- शांतीलाल मुथा (अध्यक्ष, भारतीय जैन संघटना)सन १९८० मध्ये माझी शरदराव पवार यांच्याशी प्रथम भेट झाली. त्यानंतर मी सामुहिक विवाहाची चळवळ सुरु करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राची पदयात्रा केली. पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर ७ जानेवारी १९८८ रोजी ६२५ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते आवर्जून उपस्थित होते. या चळवळी विषयी त्यांच्याशी बोलत असताना ते चळवळीची कार्यपध्दती समजून घेण्याचा प्रयत्न करीत होते. याचे मला आश्चर्य वाटत राहीले.  १९९३ साली लातूर भूकंपात मी दहा हजार लोकांना दररोज जेवण पुरविण्याचे काम करीत होतो. त्यावेळी त्यांचे व्यवस्थापन कौशल्य जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. त्यांनी सोलापूर जिल्ह्यात तळ ठोकला होता. सवयंसेवी संस्थांना गावांचे वाटप करून काम करण्याबाबत ते मार्गदर्शन करीत.  भूकंपात अनेक लहानग्यांचे आई-वडील मृत पावले होते. काही बेघर झाले. अशा मुलांच्या मानसिकतेवर भूकंपाचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याचे पवार साहेबांच्या कानावर घातले. तसेच भूकंपग्रस्त १२०० मुलांना पदवी पर्यंत शिक्षण देण्यासाठी पुण्यात आणण्याचा प्रस्ताव  दिला. या प्रस्तावास नोकरशहांकडून कडाडून विरोध झाला. असे असतानाही पवार साहेबांनी या प्रस्तावास मान्यता दिली.  इतक्यावरच न थांबता पिंपरी चिंचवड महानगपालिकेची एक नवी इमारत त्यांनी भाडेतत्वावर उपलब्ध करून दिली. या मुलांना भेटण्यासाठी पवार साहेबांनी अनेकदा या प्रकल्पाला भेट दिली. या प्रकल्पातील सर्व मुलांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आम्ही पूर्ण करू शकलो याचा मला आणि पवार साहेबांना मनस्वी आनंद आहे.गेल्या चाळीस वर्षांपासून माझे आणि पवार साहेबांचे घनिष्ट संबंध आहेत. त्यांनी माझे काम समजावून घेत त्यात सहभाग नोंदविला आहे. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास असणारा, विविध विषयांची माहिती ठेवणारा, विषय समजून घेणारा, त्यावर उपाय योजना करणारा हा देशाचा जाणता राजा आहे. अशा प्रचंड ताकदीचा आणि क्षमतेचा नेता आपल्या जिल्ह्यात, आपल्या गावामध्ये आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार