शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

Killari Earthquake : मूकवेदनेला ‘लोकमत’चा आवाज अन् मायेची फुंकरही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 11:23 IST

Killari Earthquake : २५ वर्षांपूर्वी ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे नियतीच्या प्रलयंकारी, महाविध्वंसक तांडवात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावं उद्ध्वस्त झाली. हजारो घरं जमीनदोस्त झाली.

राजेंद्र दर्डा 

२५ वर्षांपूर्वी ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे नियतीच्या प्रलयंकारी, महाविध्वंसक तांडवात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावं उद्ध्वस्त झाली. हजारो घरं जमीनदोस्त झाली. माणसांच्या मरणाचं तर तांडवच त्या अंधारपहाटी सुरू होतं. थोडीथोडकीनव्हे तब्बल १०,००० माणसं धरतीमातेनं आपल्या पोटात घेतली. हुंदक्यांचा प्रवासच सुरू झाला. निसर्गानं दु:ख करायलाही सवड दिली नाही. धरणीकंपात उद्ध्वस्त झालेली घरदारं, मोडून पडलेली माणसं नि सोडून गेलेले नातलग... सगेसोयरे... आणि त्यानंतर कोसळत राहिलेला धुवाधार पाऊस, दु:ख उधळायला आसवांना वेळ तरी कुठं होता? आपल्या वाटेला आलेले जखमांचे क्रूस आपल्याच खांद्यावर ते वाहून नेत होते. ‘सांडोनि प्रबोधनाची संगती, चालों नये इतर पंथी’चा वसा घेतलेल्या ‘लोकमत’नं मातीशी नातं सांगत अशा पिचलेल्या, मोडून पडलेल्या माणसांना पुन्हा उभं करण्यासाठी आपली वज्रमूठ आवळली. नियतीलाच ठणकावून सांगितलं.

‘तुम्हें शौक है जहां बिजलियाँ गिराने काहमें जिद है वहीं आशियाँ बनाने की’

औरंगाबादेतील अनेक सहकारी मित्र, आमचे वाचक आणि समाजसेवी संस्थांच्या सहयोगातून ‘लोकमत भूकंपग्रस्त निधी’ उभा राहिला. अज्ञात भुकेलेल्यांची नि:शब्द आव्हानं समोर उभी होती. मात्र, ‘लोकमत’नं त्याच उद्ध्वस्त वस्तीत आपल्या परीनं आनंदाचं घरटं बांधलं. अन्नधान्य, कपडे, उबदार रजया, कंदिल, घासलेट, गॅसबत्त्या, स्टोव्ह, धोतरजोड्या, आट्याची नि साखरेची पोती...अगदी काड्यांच्या पेट्यांपासून डोईवरच्या फेट्यांपर्यंत जगण्याची अशी सामुग्री घेऊन ‘लोकमत’चे काही ट्रक्स औरंगाबादहून घेऊन आम्ही सास्तूरकडं रवाना झालो. तिथं आधीच पोहोचले होते ‘लोकमत परिवारा’तील बिनीचे सैनिक. ‘लोकमत’चे जयप्रकाश दगडे, विजयकुमार बेदमुथा, राम अग्रवाल, जगदीश पिंगळे, श्यामसुंदर बोरा, मधुकर यादव यांनी अनेक दिवस त्याठिकाणी तळ ठोकून वाचकांसाठी ‘आॅन दी स्पॉट’ रिपोर्टिंग केलं. औरंगाबादहून मदतीचे ट्रक ज्या वेळेस पोहोचले त्या वेळेस भूकंपग्रस्त आया-बाया-बापे केविलपणे होऊन तिथं रांगेत उभे होते. काही तालेवारांनी भूकंपामध्ये सर्वस्व गमावलं होतं; पण ते संकोचामुळं पुढं येत नव्हते. त्यामुळं शेवटी मदतीचा एक ट्रक त्या १५-२० सधन भूकंपग्रस्तांच्या शेतात नेऊन उभा केला नि तिथं ‘लोकमत’नं त्यांच्याभोवती ओंजळ धरून त्यांना मदतीचा हात पुढं केला.

लोकमत वृत्तपत्र समूहानं भूकंपग्रस्त निधीतून बांधलेल्या चार प्रशस्त आणि सुसज्ज अंगणवाड्यांचे लोकार्पण त्यावेळी मुख्यमंत्री असलेले मनोहर जोशी यांच्या हस्ते २३ आॅगस्ट १९९६ रोजी संपन्न झाले. या प्रत्येक अंगणवाडीत दोन खोल्या, एक सभागृह, एक स्वयंपाकगृह आणि एक संडास-बाथरूम यांचा समावेश होता. शासकीय नियमाप्रमाणे ४०० चौरस फुटांच्या अंगणवाड्या उभारणे आवश्यक होते; परंतु ‘लोकमत’नं एक हजार चौरस फुटांच्या वर अंगणवाड्या उभारल्या. सामाजिक बांधिलकी प्रमाण मानणाऱ्या लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने बांधण्यात आलेल्या चार टूमदार अंगणवाड्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यावेळी हस्तांतरित करण्यात आल्या. त्या सोहळ्याचे साक्षीदार होते उस्मानाबाद जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुरेश नवले, गृहनिर्माणमंत्री चंद्रकांत खैरे, क्रीडा व पाटबंधारे राज्यमंत्री गुलाबराव गावंडे. ‘लोकमत’च्या सामाजिक जाणिवेला मुजरा करण्यासाठी आपण आलो आहोत, असं मुख्यमंत्री मनोहर जोशी म्हणाले आणि सास्तूरकरांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात ‘लोकमत’बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या अंगणवाड्या आपल्यासाठी केवळ इमारती नाहीत, दु:खितांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची जाणीव त्यात मला दिसते, असंही मुख्यमंत्री म्हणाले. सास्तूर भागातील चिमुकल्या बछड्यांसाठी या अंगणवाड्या उभारून ‘लोकमत’नं आपल्या सामाजिक ऋणातून मुक्त होण्याचा हा छोटासा प्रयत्न केला.(लेखक लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ आहेत)

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूरLokmatलोकमत