शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

काट्याच्या वाडीची गादी आणि पेशवाई वस्त्रे

By admin | Updated: July 1, 2016 04:46 IST

शरद पवार यांच्यासारखा निधर्मी, नि:जातीयवादी, तत्त्वनिष्ठ आणि कधीही खंजीर न बाळगणारा नेता इत:पर होणे नाही, यावर तमाम ‘राष्ट्रवाद्यां’ची अपरंपार श्रद्धा आहे.

शरद पवार यांच्यासारखा निधर्मी, नि:जातीयवादी, तत्त्वनिष्ठ आणि कधीही खंजीर न बाळगणारा नेता इत:पर होणे नाही, यावर तमाम ‘राष्ट्रवाद्यां’ची अपरंपार श्रद्धा आहे. ते त्यांना कवतिकाने जाणता राजा म्हणूनही अधूनमधून संबोधीत असतात. पवार केवळ निधर्मीच आहेत असे नव्हे तर ते निरीश्वरवादीदेखील आहेत आणि त्याच्या जोडीला निरक्षरवाद्यांचे पाठीराखे आणि त्यांच्यात आपले समर्थक पाहाणारे व म्हणूनच त्यांच्यावर मन:पूत प्रेम करणारे पुढारीदेखील आहेत. त्यांच्या ठायी असलेल्या अगणित अलौकीक गुणांपैकी एक म्हणजे ते कधीही भूतकाळात रमत नाहीत. वर्तमानकाळ हाच खरा भविष्यातील ऐश्वर्याच्या शिखराकडे घेऊन जाणारा सोपान या सिद्धांतावर त्यांची अलोट श्रद्धा आहे. त्यांच्या या सश्रद्ध भावनेकडे वाकुडेपणाने बघणारे आणि पवारांना संधीसाधू अशी उपाधी जोडणारे लोक भले असतीलही पण पवार अशांचे म्हणणे कधीच मनावर घेत नाहीत. निंदकांकडेही लोण्याच्या ममतेने बघण्याची कला त्यांना अवगत आहे. संतांच्या भूमीत बागडल्याचाच बहुधा तो परिणाम असावा. इतके सारे गोमटे असताना त्यांच्यासारखा नेता अचानक भूतकाळात आणि तेही इतिहास काळात व त्यातही परत मराठेशाहीच्या इतिहासात शिरुन तिथे का रममाण व्हावा हे भल्या भल्यांच्याही आकलनापलीकडचे ठरले आहे. तूर्तास दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या सत्ताधीशांना महाराष्ट्रातील जनतेच्या शिवशाहीवर (अस्सल, बेगडी नव्हे!) असलेल्या प्रेमाचा आणि थोरल्या महाराजांच्या वंशजांप्रती असलेल्या आदरभावाचा आठव पडला आणि त्यांनी छत्रपतींच्या करवीरकर वंशजास अत्याधुनिक काळातील मनसबदारी म्हणजेच राज्यसभेतील एक गादी आदरपूर्वक बहाल करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हेतु फार शुद्ध आणि प्रामाणिक होता वा आहे असा आरोप कोणीही सांप्रतच्या दिल्लीश्वरांवर करणार नाही. पण त्यांनी एक बेरीज करुन पाहिली. ती आपण करु शकलो नाही या उद्वेगाने असेल वा अन्य काही कारणानी असेल पवारांचा पित्तप्रकोप अचानक उसळून वरती आला. मराठेशाहीत छत्रपतींनी पेशवाई वस्त्रे बहाल केली पण आज पेशव्यांनी छत्रपतींना वस्त्रे बहाल केली, असे काहीसे ते म्हणाले. थोरल्या महाराजांचे चौथे वंशज छत्रपती शाहू महाराज यांनी बाळाजी विश्वनाथ बल्लाळ यास पेशवाईची म्हणजे मराठेशाहीची वस्त्रे प्रदान केली होती, त्याचाच संदर्भ बहुधा पवारांनी दिला असावा. इतिहासातील छत्रपती शाहू महाराज जन्माने मराठे होते आणि बाळाजी विश्वनाथ हा बामण होता आणि आज करवीरकर मराठा छत्रपतीस देवेन्द्र फडणवीस नावाच्या बामणाने मनसबदारीची वस्त्रे बहाल केली गेली, असा जो काही संदर्भ पवारांच्या वक्तव्यामधून निघतो, तो निव्वळ योगायोग समजावा आणि कोणत्याही जीवित वा मृत व्यक्ती अथवा संस्थेशी तिचा संबंध जोडण्याचा प्रयत्न कोणी करु नये हेच खरे. कारण पवार असे जातीयवादी बोलतीलच कसे? पवारांच्या वक्तव्यावर फडणवीसांनी उगाचच खुलासा करताना छत्रपतींना आपण काही वस्त्रे बहाल केली नाहीत, तर दिल्लीश्वरांकडून आलेली वस्त्रे केवळ छत्रपतींकडे सुपूर्द करण्याचे काम केले असे म्हटले. खरे तर त्याची काहीही गरज नव्हती. कारण फडणवीस आणि बाळाजी विश्वनाथ दोघेही बामण असले तरी तो कोकणातला चित्तपावन आणि फडणवीस वऱ्हाडातले बहुधा देशस्थ (वर्णावरुन तरी तसेच वाटते). त्यामुळे टिपण जमत नाही. त्याहून महत्वाचे म्हणजे पवार अशी अनैतिहासिक चूक कशी करतील? ते जातीयवादी नसले तरी त्यांना केवळ जातीपातीची नव्हे तर उप आणि पोटजातींचीही खडा न खडा जाण असते. त्याशिवाय का कोणी असेच स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेईल? या राजाने दिल्लीचे तख्त फोडण्याचा (याचा नेमका अर्थ कोणी तरी कधी तरी सांगा रे) अनेकवार प्रयत्न करुन पाहिला. कपाळमोक्षाशिवाय काहीही हाती लागले नाही. आपल्या मार्गात सोनिया बाईसाहेब ही फिरंगीण आडवी येते म्हणून त्यांनी तिला एकाकी पाडण्याचा निर्णय घेतला तो फिरंग्यांचा द्वेष करण्याच्या एतद्देशियांच्या जन्मसिद्ध अधिकारातून. पण त्यात तेच एकाकी पडले हे अलाहिदा. पण मुद्दा ते तेव्हांही देशवादी असतील पण धर्म वा जातवादी नव्हे! ऐंशीच्या दशकातील त्या कुप्रसिद्ध ‘खंजीर’ प्रकरणात ‘इन्द्राय स्वाहा:, तक्षकाय स्वाहा:’ या न्यायाने त्यांनी वसंतदादा या स्वजनाचा घात करुन भटजींच्या पक्षातील लोकांच्या ओठाला सत्तेच्या मधाचे चाटण लावले ते का पवार जातीयवादी म्हणून? अगदी अलीकडात त्यांनी नरेन्द्र दामोदर मोदी नावाच्या बारा बलुतेदारांपैकी एक असलेल्या व्यक्तीस आणि नंतर अरुण जेटली या उच्चवर्णीयास काट्याच्या वाडीच्या गादीवरुन कुर्निसात करीत महावस्त्रे प्रदान केली ती काय जातीयवादातून? छे, छे! पवार असतील स्ववादी, स्वकुटुंबवादी, स्वकन्यावादी, स्वपुतण्यावादी पण त्यांना आता या वयात मनस्ताप देत नका रे उगाच ढकलू जातीयवाद्यांच्या कळपात!