शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

जालियनवालाबाग हत्याकांडातील काश्मिरींच्या योगदानाचे विस्मरण नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 03:37 IST

१३ एप्रिल १९१९ रोजी पंजाबमध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिराजवळ असलेल्या जालियनवालाबाग हत्याकांडाला भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ब्रिटिशांविरुद्ध सारा देश पेटून उठला आणि ब्रिटिश सरकारच्या भारतातील अंताचा प्रारंभ झाला. या घटनेचे स्मृती शताब्दी वर्ष १३ एप्रिल २०१८ या दिवशी सुरू होत आहे.

- संजय नहार१३ एप्रिल हा दिवस खरे तर बैसाखी उत्सवाचा दिवस. बैसाखी हा उत्तरेतील विशेषत: पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी रब्बी पिकाच्या कापणीनंतर नव्या वर्षाचे स्वागत करतात तो दिवस. याच दिवशी १६९९ साली शीख धर्माचे दहावे आणि अंतिम गुरू गोबिंदसिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली होती; त्यामुळे हा उत्सव पंजाब आणि आजूबाजूच्या प्रदेशांमधील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. याच दिवशी अमृतसरमध्ये लाखो लोक जमतात आणि शीख धर्म स्थापनेचा उत्सव म्हणूनही साजरा करतात.याच दिवशी शिखांचा आणि पंजाबी जनतेचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग आणि केलेले बलिदान अतुलनीय आहे. त्याची सर्व इतिहासकारांनी योग्य ती दखल घेतली आहे. मात्र काश्मिरी लोकांचा स्वातंत्र्यलढ्यात असलेल्या सहभागाची क्वचितच चर्चा होताना दिसते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याची दिशा ठरविणाऱ्या जालियनवालाबाग हत्याकांडाच्या वेळी या बागेत सरकारचा निषेध करण्यासाठी जमलेल्या हजारो पंजाबी बांधवांबरोबरच काश्मिरींचाही सहभाग असल्याचे अनेक पुरावे आजही उपलब्ध आहेत.भारतात विशेषत: पंजाब आणि बंगालमध्ये कोणत्या परकीय शक्तींच्या मदतीने ब्रिटिशांना विरोध केला जात आहे याचा अभ्यास करून या आंदोलनांना थांबविण्यासाठी नेत्यांना कुठल्याही गुन्ह्याशिवाय तुरुंगात डांबणे, माध्यमांवर बंधने तसेच कुठलीही बाजू ऐकून न घेता शिक्षा देणे अशी तरतूद असलेल्या आणि भारतीयांच्या अधिकारांवर घाला घालणाºया रौलेट अ‍ॅक्टविरुद्ध आंदोलन करा, असे आवाहन करणाºया महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पंजाबमध्ये आंदोलन करणाºया डॉ. सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या नेत्यांना १० एप्रिल १९१९ रोजी अटक करून काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. त्यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ आणि रौलेट अ‍ॅक्टला विरोध करण्यासाठी १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसरच्या जालियानवालाबागेत डॉ. महम्मद बशीर यांनी एक सभा निमंत्रित केली. या सभेच्या अध्यक्षस्थानी लाला कन्हैय्या लाल भाटिया होते. या सभेत हजारोेपेक्षा अधिक काश्मिरी मुस्लीम सहभागी झाल्याची माहिती उपलब्ध आहे. त्या काळात अमृतसरमध्ये राहणाºया काश्मिरींची संख्या एकवीस हजारपेक्षा अधिक होती.डॉ. सत्यपाल आणि किचलू यांच्यापैकी सैफुद्दीन किचलू यांचा जन्म एका काश्मिरी मुस्लीम कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील पश्मिना शाली आणि केशराचा व्यवसाय करत असत. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामधील हे किचलू कुटुंब मूळचे काश्मिरी पंडित कुटुंब नंतर अठराव्या शतकाच्या शेवटी त्यांनी इस्लाममध्ये प्रवेश केला होता. आपल्या मूळच्या ब्राह्मण आणि आपण भारतीय असण्याचा किचलू यांना अभिमान होता.डॉ. सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांच्या अटकेच्या निषेधार्थ जमलेल्या या जमावावर जनरल डायर यांच्या आदेशाने अत्यंत अमानुष गोळीबार करण्यात आला. सरकारने या गोळीबारात ठार झालेल्या ३७९ मृतांची यादी जाहीर केली, तर अमृतसरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एकूण ४८४ मृतांची सूची उपलब्ध आहे. जालियनवालाबाग संग्रहालयामधील ३७९ मृतांच्या यादीत १४ काश्मिरींची नावे आहेत. यातील सर्वात लहान मोहम्मद इस्माईल हा सात वर्षाचा मुलगा होता तर गुलाम मोहम्मद हा जान मोहम्मद काश्मिरींचा ४४ वर्षांचा मुलगा होता. प्रत्यक्षात काश्मिरींची संख्या यापेक्षा खूप अधिक असल्याचे अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे. पंडित मदन मोहन मालवीय यांनी जालियनवाला बागेतील एकूण मृतांची संख्या तेराशेपेक्षा अधिक असल्याचे तर अमृतसरचे तेव्हाचे सिव्हिल सर्जन डॉ. स्मित यांनी ही संख्या अठराशेपेक्षा अधिक असल्याचे म्हटले आहे.आज काश्मिरी भारताच्या बरोबर नाही ते देशद्रोहीच आहे अथवा या सापांना दूध पाजू नका, पर्यटक म्हणूनही काश्मीरला जाऊ नका, असा सामाजिक माध्यमांमधून प्रचार करणारे काश्मिरींचे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी आणि नंतरचे योगदान विसरताना दिसतात. १९१९ नंतरच्या कालखंडात स्वातंत्र्य चळचळीत अनेक आंदोलनांमध्ये काश्मिरी लोक वेळोवेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी पंजाबी जनतेबरोबरच आपला सहभागही दिला होता. याचा वस्तुनिष्ठ अभ्यास होणे आवश्यक आहे.भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भाषा, धर्म, भौगोलिक सलगता आणि निर्णय घ्यायचा अधिकार या मुद्यांवर काश्मिरी जनता पाकिस्तानात जाऊ शकली असती; मात्र आपले नाते पाकिस्तानपेक्षा भारताशी अधिक आहे हे अनेकदा बहुसंख्य काश्मिरींनी आपल्या कृतीतून दाखविले आहे. गेल्या २८ वर्षांत काश्मीरमध्ये पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी कारवाया सुरू झाल्यावर देशासाठी शहीद झालेल्या काश्मिरी मुस्लीम पोलीस आणि निमलष्करी दलातील सैनिकांची संख्या ३००० पेक्षा अधिक आहे. अतिरेक्यांनी ज्यांना ठार केले असे हजारो काश्मिरी आहेत. खरेतर शहिदांना जात, धर्म नसतो, मात्र आपण जेव्हा एखाद्या राज्याचे लोक देशद्रोही आहेत असे सहज म्हणतो तेव्हा त्यामागची कारणे, परिस्थिती आणि आंतरराष्टÑीय हस्तक्षेप याचा अभ्यास न करता प्रतिक्रिया व्यक्त करतो तेव्हा वेगळेपणाची भावना तीव्र होत जाते. म्हणूनच आम्हाला या देशाने वेगळे पाडले आहे, एकटे सोडले आहे, असे त्या राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती एक आठवड्यापूर्वी जाहीरपणे म्हणाल्या, त्यावेळी देश आपण सर्वजण एक आहोत आणि देश काश्मिरींच्या बरोबर आहे, हे सांगणारी चळवळ अथवा नेते पुढे आले नाहीत.या पार्श्वभूमीवर यावर्षी जालियनवाला बाग हत्याकांडाची स्मृती शताब्दी सुरू होताना काश्मिरी जनता ही यात सहभागी होती. याची आठवण ठेवायला हवी. याच हत्याकांडानंतर काश्मीर ते कन्याकुमारी सगळा देश स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध पेटून उठला. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना मिळालेली सर पदवी परत केली तर तरुणांमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्फुल्लिंग चेतविले. त्यातूनच भगतसिंग आणि उधमसिंग निर्माण झाले. धर्म, जात, भाषा आणि पंथ यामध्ये विभागलेले भारतीय एकत्र आले आणि महात्मा गांधींनीही ब्रिटिशांविरुद्ध असहकार आंदोलन पुकारले.काश्मिरी असलेले सैफुद्दीन किचलू आयुष्यभर स्वातंत्र्यसैनिक म्हणूनच जगले. त्यांनी काश्मिरी मुस्लिमांना भारतीय राष्टÑीय मुख्य प्रवाहाशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या योगदानाची यानिमित्ताने देशाने योग्य ती दखल घ्यायलाच हवी.(लेखक सरहद या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)