शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

कर्मयोगिनी प्रीतिसुधाजी म.सा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 03:36 IST

आपल्या नावाप्रमाणेच समस्त मनुष्यजातीत प्रेम आणि आपुलकीची भावना निर्माण करणाऱ्या, जैन धर्माचा संदेश सर्वत्र पोहोचविणाºया वाणीभूषण प्रीतिसुधाजी म.सा. या बुधवारी (दि.१) वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहेत.

- साध्वी मधुस्मिताजीआपल्या नावाप्रमाणेच समस्त मनुष्यजातीत प्रेम आणि आपुलकीची भावना निर्माण करणाऱ्या, जैन धर्माचा संदेश सर्वत्र पोहोचविणा-या वाणीभूषण प्रीतिसुधाजी म.सा. या बुधवारी (दि.१) वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. ज्या ठिकाणी त्यांनी दीक्षा घेतली, त्या अहमदनगर येथे त्यांचा यंदाचा चातुर्मास सुरू होत आहे. त्यानिमित्त...विचार व वाणीचा अमोघ संगम असलेल्या आणि जनकल्याणासाठी झटत समाजजीवन उन्नत करण्यासाठी परिश्रम घेणाºया साधू-साध्वींच्या मालिकेत प्रीतिसुधाजी म.सा. यांचे नाव अग्रक्रमाने घेता येणारे आहे. अशा प्रीतिसुधाजींचा जन्म पिंपळगाव बसवंत येथील व्यावसायिक रायसोनी कुटुंबीयात १ आॅगस्ट १९४३ रोजी झाला. वास्तविक संन्यासींचा जन्म हा त्यांच्या दीक्षा मुहूर्तापासूनच होत असतो. त्या क्षणापासून आपले प्रापंचिक जीवनातील नाव, गाव तसेच परिचय यांचा गीतेतील ‘जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही...’ यानुसार परित्याग करत नवीन जीवन धारण केले जात असते. साध्वी प्रीतिसुधाजी यांनी प्रापंचिक बंधनांचा त्याग करत ७ मार्च १९६२ रोजी जैन भगवतीची दीक्षा घेतली. राष्टÑसंत आचार्यसम्राट श्री आनंदऋषीजी म.सा. आणि श्री उज्ज्वलकुमारीजी म.सा. हे त्यांचे गुरु.बालपणापासूनच अत्यंत कुशाग्रबुद्धीच्या असलेल्या प्रीतिसुधाजींनी ज्ञान-विज्ञान, धर्म, दर्शन, समाजशास्त्र आदी विविधांगी विषयांमध्ये सखोल अध्ययन करतानाच हिंदी, संस्कृत, प्राकृत, मराठी तसेच गुजराती या भाषांवर प्रभुत्व मिळविले. आपल्या प्रवचनांमध्ये त्यांनी नेहमीच सामाजिक, धार्मिक तसेच राष्टÑीय विषयांना प्राधान्य दिलेले आहे. आपल्या सहज आणि सोप्या वाणीतून त्या साधकांशी संवाद साधतात. त्यामुळे त्यांचा विचार साधकांच्या थेट हृदयाला जाऊन भिडतो. महाराष्टÑातील विविध जिल्ह्यांसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, पश्चिम बंगाल याठिकाणी त्यांनी यात्रा केल्या. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी भारतीय संस्कृतीचे संस्कारही प्रत्येक विद्यार्थ्याच्या ठायी रुजावेत यासाठी त्यांनी भारतीय संस्कृतीचे धडे देणाºया इंग्रजी माध्यमाच्या शाळा स्थापण्यासाठी प्रेरणा दिली. त्यातूनच राहाता येथे साध्वी प्रीतिसुधाजी इंग्लिश मीडियम स्कूल आकारास आली. धुळे तसेच जळगाव येथे महावीर इंग्लिश मीडियम स्कूल तसेच संगमनेर येथील मांची हिल येथे ज्ञानगंगा विद्यापीठ साध्वी प्रीतिसुधाजी महाराज नगर या ठिकाणीही संस्काराचे धडे दिले जात आहेत. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी उभारी मिळावी यासाठी १९७३ मध्ये नाशिक येथे साध्वी प्रीतिसुधाजी शिक्षण फंडाचीही स्थापना झाली. त्याचा लाभ आज शेकडो विद्यार्थी घेत आहेत. आपल्या ओघवत्या वाणीतून त्यांनी अनेक व्यसनी आणि मांसाहारींना व्यसनमुक्त व शाकाहारी बनण्यासाठी प्रेरित केलेले आहे.भगवान महावीर यांच्या ‘अहिंसा’ या प्रमुख सिद्धांतातून प्रेरित होऊन त्यांनी १९८२ मध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागरण करत मुंबईत गोहत्याबंदीचे अभियान सुरू केले होते. या अभियानाचे परिणामही दिसून आले होते. ठिकठिकाणी गोरक्षण संस्था स्थापन झाल्या. गाय केवळ जनावर नाही तर ती एक शक्ती आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे, हा विचार त्यांनी पटवून दिला. त्यांच्या प्रेरणेतून स्थापित झालेल्या गोरक्षण केंद्रात आजमितीला हजारो गोवंशांचे संगोपन केले जात आहे. अनेक ठिकाणी त्यांनी धर्मस्थानके उभी राहण्यासाठी प्रेरणा देत श्रीसंघ-समाजाला धर्मध्यान व चातुर्मासासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. देशभरातील अनेक मान्यवरांनी त्यांचे मार्गदर्शन घेतलेले आहे. जनकल्याणासाठी सदोदित अग्रेसर असणाºया साध्वी प्रीतिसुधाजींचा सहवास समस्त समाजाला प्रेरणादायी ठरत आलेला आहे आणि तो यापुढेही कायम राहील.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर