शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

कल्याण करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:21 IST

पूजा संपन्न झाली़ नवदाम्पत्याने पुरोहिताच्या पायावर डोके टेकवले़ कल्याणमस्तु! कल्याणमस्तु! असा भरभरून आशीर्वाद पुरोहितांनी दिला़ धर्मकृत्य करणाऱ्यांना आशीर्वाद लाभतो़ धर्मकृत्य करणे ज्याला शक्य होत नाही तो कुणापुढे नतमस्तक होणार? त्या गरिबाला कोण आशीर्वाद देणार? ज्याला नतमस्तक होणे जमेल नाही त्याचा वाली कोण? रखवाला कोण? ‘जन हे सुखाचे। दिल्या घेतल्याचे’ आशीर्वादसुद्धा काहीतरी दिले तरच मिळतो.

- डॉ़ गोविंद काळेपूजा संपन्न झाली़ नवदाम्पत्याने पुरोहिताच्या पायावर डोके टेकवले़ कल्याणमस्तु! कल्याणमस्तु! असा भरभरून आशीर्वाद पुरोहितांनी दिला़ धर्मकृत्य करणाऱ्यांना आशीर्वाद लाभतो़ धर्मकृत्य करणे ज्याला शक्य होत नाही तो कुणापुढे नतमस्तक होणार? त्या गरिबाला कोण आशीर्वाद देणार? ज्याला नतमस्तक होणे जमेल नाही त्याचा वाली कोण? रखवाला कोण? ‘जन हे सुखाचे। दिल्या घेतल्याचे’ आशीर्वादसुद्धा काहीतरी दिले तरच मिळतो़ ‘कल्याण या आशीर्वादे। जाती द्वंद्वे नासोनि’ अशी आशीर्वादाची महती तुकाराम महाराज गातात़ जीवनातील किंकर्तव्यमूढतेचे द्वंद्व नाहीसे करण्याची ताकद केवळ आशीर्वाद या चार अक्षरात आहे़‘कल्याण’ शब्दाची परम कल्याण करणारी ताकद समर्थांनी ओळखली नव्हे तर अनुभवली होती़ माणुसकीचा गहिवर दाटून आल्यामुळेच तर त्यांना रामरायाला साकडे घालावे लागले़ विशालबुद्धीच्या व्यासांनासुद्धा वैताग आला असावा असे अनुमान करण्यास जागा आहे़ कळत नकळत का होईना पण ते लिहून गेले ‘न कश्र्चित् श्रुणोति माम्’ माझे कुणी ऐकतच नाही अशी खंत ते व्यक्त करतात़ समर्थ तर एक पाऊल व्यासांच्याही पुढे होते़ जनसामान्यांची चिंता समर्थांना अधिक लागली होती़ ते लिहिते झाले ‘अपराधी जन चुकतची गेले। तुझा तुची सावरी । कल्याण करी रामराया’ चुकीच्या मार्गावर पाऊल पडले! हजारो अपराध जनसामान्यांकडून झाले तरी त्यांना सावरले पाहिजे़जनहिताच्या चार गोष्टी सांगितल्या पाहिजेत़ त्यांचे दु:ख कोण हरण करणार? सगळेच हाताबाहेर चालले आहे़ चारशे वर्षांपूर्वी समर्थांनी जनसामान्यांची होणारी ससेहोलपट ओळखली होती़ ‘कोठे जावे काय करावे / आरंभिली बोहरी’ बोहरी म्हणजे सर्वनाश़ जनसामान्यांचे जगणे फार कठीण होत चालले आहे़ कठीण करिता कठिणची झाले’ अशावेळी रामराया तूच धावून आले पाहिजेस़ त्यांचे दु:ख निवारण केले पाहिजे़ समर्थ पुढे लिहितात़ ‘दास म्हणे आम्ही केले, पावलो/दयेसी नाही सरी’़आपदाम् अपहर्तारम् / दातारं सर्व संपदाम्’ हाच तर तुझा लौकिक़ यासाठी तर तुझा डंका पिटायचा. ‘राम राम इति गर्जनम़्’ आताचा काळ तर खूपच अवघड़ रामनामाचे सर्वांनाच वावडे़ राम भेटणार तरी कोठे? तुकोबाराय सरळ रामदूताला म्हणजे हनुमानालाच शरण गेले़ दूताच्या भक्तीची ताकद त्यांना माहीत होती़ ‘शरण शरण हनुमंता / तुज आलो रामदूता/ काय भक्तीच्या या वाटा/ मज दावाव्या सुभटा/

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकMaharashtraमहाराष्ट्र