शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

जोहार मायबाप जोहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:32 IST

सर्वसामान्यांना जेव्हा कामामुळे, कलहामुळे मानसिक ताण येतो तेव्हा हेच कलाकार आणि त्यांना रसिकांपर्यंत पोहोचवणारी पडद्याआडची मंडळी मनावर फुंकर घालून दिलासा देतात.

एकदा एक रुग्ण डॉक्टरकडे जातो व गेल्या काही दिवसांपासून आपले मन उदास झाल्याची कैफियत मांडतो. डॉक्टर त्या रुग्णाचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यावर त्याला सांगतात, गावात आलेल्या सर्कसमधील विदूषकाचा खेळ पाहा आणि लोटपोट हसून मनातील खिन्नता पळवून लावा. डॉक्टरांच्या सल्ल्यावर तो रुग्ण खिन्न हसतो आणि म्हणतो, डॉक्टर मी तुमच्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने आलो होतो. पण तुम्ही मला निराश केले. सर्कशीत लोकांना मनमुराद हसवणारा तो विदूषक मीच आहे! ही कथा कोरोना काळात नाट्य, चित्रपट, सिरियल्स, वेबसिरीज, संगीत आदी मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून लोकांचे मन रिझवणाऱ्या हजारो कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ वगैरे मंडळींच्या मानसिक अवस्थेचेच वर्णन करणारी आहे.

सर्वसामान्यांना जेव्हा कामामुळे, कलहामुळे मानसिक ताण येतो तेव्हा हेच कलाकार आणि त्यांना रसिकांपर्यंत पोहोचवणारी पडद्याआडची मंडळी मनावर फुंकर घालून दिलासा देतात. कोरोनामुळे गेले नऊ महिने मनोरंजन क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. बडे स्टार्स आतापर्यंत मि‌ळविलेली लोकप्रियता व पैसा यांच्या जोरावर अजून काही काळ तग धरू शकतात; मात्र छोट्या भूमिका करणारे कलाकार, उमेदवारी करणारे युवा कलाकार, मेकअपमन, स्पॉटबॉय, कपडेपट सांभाळणारे, बॅकस्टेज वर्कर्स वगैरे असंख्य लोकांची अवस्था हलाखीची झाली आहे. काहींनी लॉकडाऊनच्या काळात छोटी कामे करून कुटुंबाचे पोट भरले; मात्र कलेच्या क्षेत्रातील व्यक्तीचा स्वाभिमान अंमळ मोठा असतो. चेहऱ्याला रंग लावलेला भले छोटा का कलाकार असेना, त्याने त्याची ओळख तयार केलेली असते. तो बाजारात बसून कांदे-बटाटे विकू शकत नाही. नायकाच्या चेहऱ्याला रंगरंगोटी केलेले हात विटा उचलण्यास धजावणार नाहीत.

अभिनेते व निर्माते प्रशांत दामले आणि अन्य काही मातब्बर कलाकारांनी लॉकडाऊनच्या काळात सामान्य बॅकस्टेज वर्कर्सच्या घरातील चूल पेटती राहील, याची काळजी घेतली. सोनू सूद सारख्या स्टार्सनी तर आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता गेल्या महिना-दीड महिन्यांपासून चित्रपट व नाट्यगृहे खुली झाली आहेत. कोरोना काळात चित्रपट निर्मितीच थांबली असल्याने नवे चित्रपट रिलीज झाले नाहीत. नव्या वर्षात १०० च्या आसपास मराठी चित्रपट झळकणार आहेत. हिंदीतील २० ते २२ चित्रपट, जे मागील वर्षात एकतर रिलीज झाले नाहीत किंवा चित्रीकरण अपूर्ण राहिल्यामुळे दर्शकांपर्यंत पोहोचले नाहीत ते नव्या वर्षात आपल्या भेटीला येत आहेत. याखेरीज नव्याने मुहूर्ताचे श्रीफळ वाढवल्याने आकाराला येतील ते चित्रपट वेगळेच!

नाट्यगृहे, चित्रपटगृहे खुली होऊनही अजून रसिकांचा अपेक्षित प्रतिसाद लाभलेला नाही. एकतर कोरोनाच्या भयाचे भूत मानगुटीवरुन उतरलेले नाही. शिवाय ५० टक्के आसन व्यवस्थेच्या अटीमुळे कोंडी झाली आहे; मात्र दर्जेदार नाट्यकृती अथवा चित्रपट यांची निर्मिती होण्याकरिता गुणग्राही रसिकांचा मायेचा हात कलाकारांच्या पाठीवर पडलाच पाहिजे. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट कलाकारांच्या अंगावर मूठभर मास चढवतो.

मनोरंजन उद्योगाला सावरणे ही त्या क्षेत्रातील मंडळींबरोबरच सरकार व रसिकांचीही जबाबदारी आहे. सुप्रसिद्ध चित्रपट व मालिका निर्माते नितीन वैद्य यांनी कोरोनामुळे मनोरंजन व्यवसायासमोर निर्माण झालेल्या समस्या व त्यावरील उपाययोजनांचा फेसबुकवर ऊहापोह केला आहे. २००५ ता १५ दशकभरात मराठी चित्रपटांच्या निर्मिती व प्रदर्शनावर एकूण ६०३ कोटी रुपयांचा खर्च झाला असून निर्मात्यांच्या हातात १६२ कोटी रुपये पडले आहेत. मराठी चित्रपटांना ४४१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. रिझर्व्ह बँकेने चित्रपट व मनोरंजन व्यवसायाला कर्ज मंजूर करण्याच्या यादीत शेवटच्या स्थानी ठेवल्याने बँका व वित्तसंस्था कर्ज देत नाहीत. त्यामुळे खासगी उद्योजकांच्या पैशावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने मनोरंजन क्षेत्राला बँकांचे कर्ज मिळवून देण्याकरिता प्रयत्न करण्याचा आग्रह वैद्य यांनी धरला आहे.

राज्य सरकार चित्रपटांना देत असलेले अनुदान हातात पडायला दीर्घ कालावधी लागतो. भारतामधील दूरचित्रवाणी व्यवसाय ४० हजार कोटींच्या घरात गेला आहे; मात्र गोरेगावची चित्रनगरी सोडल्यास नव्या सोयीसुविधांची चित्रनगरी उभी न केल्याने त्याचा फटका बसत आहे. अनेक शहरांमधील नाट्यगृहांची दुरवस्था हा तर संतापजनक अध्याय आहे. नव्या वर्षात मनोरंजन व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्याचा सरकारचा विचार असेल तर सोयीसुविधा देणे ही सरकारची जबाबदारी आहे. ...तिसरी घंटा होऊन नांदीचे सूर आ‌‌‌ळवले जात आहेत अन्‌ पडदा बाजूला होताच टाळ्यांचा कडकडाट सुरू आहे, हे चित्र आता अपरिहार्य आहे.

टॅग्स :cinemaसिनेमा