शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जावेद, लता, शबाना... आणि पाकिस्तान! कितीही कडवे असू दे, खरे आहे ते...

By विजय दर्डा | Updated: February 27, 2023 08:46 IST

लाहोरमधल्या फैज महोत्सवात जावेद अख्तर यांनी आपल्या खास झोंबणाऱ्या शैलीत पाकिस्तानला आरसा दाखवला, हे उत्तमच झाले!

- विजय दर्डा चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

जिधर जाते हैं सब, जाना उधर अच्छा नहीं लगता मुझे,पामाल रस्तों का सफ़र अच्छा नहीं लगता,ग़लत बातों को ख़ामोशी से सुनना, हामी भर लेना,बहुत हैं फ़ायदे इसमें मगर अच्छा नहीं लगता...- सुप्रसिद्ध गीतकार, शायर आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांचा हा शेर त्यांना स्वत:लाच सर्वाधिक लागू पडतो. पाकिस्तानात जाऊन  झोंबणाऱ्या शैलीत ते खुलेआम खरे ते बोलले, ते त्यांचे व्यक्तिमत्त्वच आहे. बऱ्याच वर्षांपासून त्यांची आणि माझी मैत्री आहे, त्या हक्काने मी सांगतो, कितीही कडवे असू दे, खरे आहे ते तोंडावर स्पष्ट सांगायला जावेदभाई मागेपुढे पाहात नाहीत. सुप्रसिद्ध शायर फैज अहमद फैज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  लाहोरमध्ये आयोजित केलेल्या सातव्या फैज महोत्सवात एका प्रेक्षकाने जावेदभाईंना  म्हटले ‘हिंदुस्थानात जाऊन सांगा, पाकिस्तान मित्र आहे, तो प्रेम करणारा देश आहे.’

त्यांच्याजागी दुसरा कुणी असता तर प्रसंग साजरा करायचा म्हणून सहज म्हणाला असता, ‘जी जरूर’.. पण विचारणाऱ्याच्या मनातला हेतू बरोबर ओळखून जावेदभाई म्हणाले, ‘एकतर आपण दोघांनी एकमेकांवर दोषारोप करू नयेत. वातावरण निवळले पाहिजे, हे तर खरेच! आम्ही  मुंबईत राहातो. आमच्या शहरावर झालेला दहशतवादी हल्ला आम्ही पाहिला आहे. हल्ला करणारे नॉर्वे किंवा तुर्कस्थानातून आलेले नव्हते. ते लोक  इथे पाकिस्तानात खुलेआम फिरत आहेत...’

जावेद अख्तर इथेच थांबले नाहीत. ते म्हणाले, ‘हिंदुस्थानने तर नुसरत फतेह अली खान, मेहंदी हसन यांच्यासारख्या पाकिस्तानी कलाकारांचे जोरदार स्वागत केले; पण पाकिस्तानने लताजींना कधी प्रेमाने बोलावले नाही...’

- खरेतर, ही प्रत्येकच भारतीयाच्या मनातली भावना होय! दक्षिण आशिया एडिटर्स फोरमचा अध्यक्ष या नात्याने आणि संसदीय प्रतिनिधी मंडळात सहभागी होऊन पाकिस्तानात अनेकदा जाण्याची संधी मला मिळाली.  एकदा माझ्याबरोबर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि पंजाब केसरीचे तत्कालीन संपादक अश्विनीकुमार चोपडाही होते. अशाच एका भेटीत पाकिस्तानचे तत्कालीन प्रमुख परवेज मुशर्रफ यांना मी विचारले होते; ‘आपण कधीच लताजींना का नाही बोलावले? मेहंदी हसन, गुलाम अली, साबरी बंधू, नुसरत फतेह अली खान किंवा अबिदा परवीन; या सगळ्यांचा हिंदुस्थानात भरपूर सन्मान झाला.’ 

- ‘लताजींचा कार्यक्रम करावा इतके मोठे मैदान आमच्याकडे नाही’, असे सांगून परवेज मुशर्रफ यांनी उत्तर देण्याचे टाळले होते.एका लाहोर दौऱ्याच्या वेळी तेथील पत्रकारांनी मला विचारले होते, दोन्ही देश एकदमच स्वतंत्र झाले. दोघांत फरक काय आहे?मी म्हणालो, ‘आमच्याकडे गांधीजी आहेत, आपल्याकडे नाहीत. आमच्याकडे वृत्तपत्रे स्वतंत्र आहेत, आपल्याकडे वृत्तपत्र स्वातंत्र्य नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आमचा कोणीही नेता आपले घर भरण्यासाठी अन्य कुणाच्या हातचे बाहुले बनून आपल्या देशाची विक्री करत नाही!’

पाकिस्तानी जनता भले भारताशी मैत्रीच्या गोष्टी करत असेल; पण तेथील राज्यकर्त्यांची संपूर्ण दुकानदारी भारत विरोधावरच चालते. भारत विरोधाची ही मात्रा जनतेला चाटवणे बंद केले गेले, तर त्या भुकेल्या देशात विद्रोह उसळेल. आज तिथे पिठासाठी रांगा लागत असून सगळीकडे हाहाकार माजला आहे. भारताने पाकिस्तानला मदत केली पाहिजे, असे सगळे जण म्हणत असले तरी  बिलावल यांच्यासारख्या बालीश राजकारण करणाऱ्या नेत्यांनी भारताविरुद्ध आग ओकणे थांबवलेले नाही. असे असताना मैत्रीच्या पोकळ गप्पांचा काय उपयोग?

जावेदभाई पाकिस्तानमधून बाहेर पडताच तिथले एक अभिनेते, निर्माते इजाज असलम यांनी ट्वीट केले, ‘जावेद अख्तर यांच्या मनात जर इतकी घृणा आहे तर त्यांनी इथे यायलाच नको होते. तरीही उपकार माना, आम्ही त्यांना इथून सुरक्षितपणे जाऊ दिले. पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे, असे त्यांना वाटत असेल तर ते आमच्या देशात आलेच का?’ 

- आपल्या घरी आलेल्या पाहुण्याच्या बाबतीत  बोलताना ही अशी भाषा? या उद्धटपणामुळेच पाकिस्तान आज संकटात सापडला आहे. फैज महोत्सवामध्ये कुणा अज्ञात प्रेक्षकाचा हवाला देऊन सूत्रसंचालकाने जावेदभाईंना विचारले, ‘शबाना आजमी यांच्याशी आपली मैत्री जास्त आहे की प्रेम?’

जावेदभाई सहज म्हणाले, ‘ज्यामध्ये मैत्री नाही, ते प्रेम कसले? आणि ज्यात सन्मान, आदर नाही ती मैत्री तरी खरी कशी?’ - पुढे ते हसून म्हणाले, ‘हमारी दोस्ती इतनी अच्छी, की शादी भी कुछ ना बिगाड पायी! एकमेकांबद्दल काही वाटत नसेल, आत्मसन्मान सांभाळला जात नसेल तर दोन माणसे कधीही आनंदी राहू शकत नाहीत. वर्षानुवर्षे दोघांतला एक नाखुश राहिला आहे. तेव्हा हे खरे, की वाईट सवय लागली आहे. बहुत तकलीफ होगी, लेकिन सुधर जाइए!’  

रीतिरिवाजांच्या बहाण्याने घराच्या चार भिंतीत कैद करून ठेवले जाते, स्त्रियांना केवळ उपभोगाची वस्तू मानले जाते; या अस्वस्थ वास्तवावर त्यांनी नेमके बोट ठेवले. ते म्हणाले, ‘ये  दुनिया इन्सानोंका क्लब है, किसीके पास भी इसकी स्थायी सदस्यता नही है। पहिल्यांदा इथे आलेल्या माणसांनी जे घडवले त्याचा फायदा आपल्याला मिळतो आहे. किमान जे परंपरेने मिळाले, ते तरी नष्ट करू नका!’जावेदभाई, वसुधैव कुटुंबकम् हे जीवनाचे सूत्र असलेल्या  एखाद्या भारतीय माणसाकडेच विचारांची अशी विशालता असू शकते. तरीही लोक आपल्यावर हल्ला करायला टपलेले असतात, याचे वाईट वाटते! तुम्हीच लिहिले आहे ना...पंछी नदियां पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके,सरहदें इन्सानों के लिये है, सोचो तुमने और मैने क्या पाया इन्सां होके...

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरPakistanपाकिस्तान